savitalote2021@bolgger.com

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पुन्हा भेटावेस तू

पुन्हा भेटावेस तू 

पुन्हा भेटावेस तू
अशी इच्छा हृदयी
येऊन गेली
या बंदिस्त मनाच्या स्मृतीआठवणीत

पुन्हा भेटावेस तू 
तेच कळया जुळवून माळरान गुंफीत 
केसात माळावे तुझ्या हाताने 
मनाच्या आनंदात फुलावे 
पुन्हा मिळून 

पुन्हा भेटावेस तू 
नयनी भाषेच्या सोबत 
शब्दविना सांगावे तू 
तुझे शब्द 

पुन्हा भेटावेस तू 
मला माझे अस्तित्व सांगण्यासाठी 
येणाऱ्या वादळ वाटेवरून सावरण्यासाठी भेटावेस तू!
           सविता तुकाराम लोटे 

सुकलेले शब्द

सुकलेले शब्द 

ओंजळभरच सूकलेले शब्द
गोळा करता करता 
सुकलेलेच शब्द 
पूजा करीत राहिले 
सुकलेल्या शब्दगंधाची
नकळत 
त्यांच्याही
गंध दरवळू लागला 
दहादिशा सुगंधित 
करून माळ गुंफीत पुन्हा 
ओंजळभर सुकलेले शब्दांची
                  सविता तुकाराम लोटे 

भीती


भीती 
तहानेने व्याकूळ
आत्महत्या करीत आहेत 
शेतकरी समाज
दया न येती
सरकार अभिमानाने सांगती
कृषिप्रधान देश आमुचा 
परी भीती मनात 
काय? 
आम्ही कृषिप्रधान 
दोन वेळच्या जेवणासाठी 
करावी लागते रात्र-दिवस 
कष्ट डोंगराएवढे दुःख 
मनात ठेवून जाता आहे 
प्राणज्योत संपवून 
भीती वाटते मनी
असेच चालले तर 
आम्ही कसे सांगू
कृषिप्रधान देशवासी ! 
आम्ही 
        सविता तुकाराम लोटे 

वणवा पेटला

        वणवा पेटला 
वणवा पेटला... 
उगवता सूर्यासारखा 
वणवा पेटला ...
हिरवा गर्द रानफुलांच्या अंताचा 
वणवा पेटला...
अस्तित्वाच्या पालापाचोळ्याचा 
वणवा पेटला...
निसर्गरम्य अद्भुत 
श्रीमंतीचा!
       सविता तुकाराम लोटे 

निशब्द

     निशब्द  

वाईटपणाचा सीमा 
गाठल्या 
गहिवरून 
असंख्य संवेदना सोसण्याची 
बेसावध प्रयत्न आपोआपच 
वलय 
फरक करून 
अनपेक्षित 
मनमोकळा शब्द 
भेटण्यासाठी ...
मिळवायचे होते 
वास्तव सुंदर 
सदाफुलीसारखे 
टवटवीत,
पण मौनच!
अस्वस्थ कल्लोळ सावलीचा
टवटवीत फुललेला 
अबोल ...
शब्दांच्या घागरी
मूक.... 
घमेंडखोर...
कळायचाही आधी
अंत... 
तळ्याकाठावरिल भ्रमासारखे 
गहिवरून 
निशब्द!!!
          सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

प्रश्न

प्रश्न 
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे राहतात 
आवासून...

वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जात
प्रश्न चिन्हांची साखळी 
आवासून...

अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार  
गुरफटून टाकतात
आवासून...

मानगुटीला 
प्रश्न चिन्हांची शांत जळत 
असलेली सहवेदना 
सूर्यास्त सूर्योदयाच्या 
पहिल्या किरणांच्या
उत्तर साखळीने

       सविता तुकाराम लोटे 



हळवा शब्द

      


  हळवा शब्द   
          रुणझुण आवाज न करता आपले बालपण निघून जावे आणि कधी लहानपणाला निरोप घेतो हे सुद्धा कळत नाही. हळव्या नयनांमध्ये मोठी स्वप्न जागा घेतात.
      सोबत नवीन विश्वामध्ये मध्ये पाय ठेवण्याचा पंख्याला नवीन विश्वामध्ये उडविण्यासाठी बळ निर्माण करणाऱ्या आजच्या नवीन विश्वासाचे नवीन पंख घेतात. पाखरांना आकाश बेधुंद उडण्यासाठी नवीन पंखाला शक्ती देतात.
      नवीन सितीज निर्माण करून देतात. आपले पालक वाऱ्याच्या झुळकीने सारखा शब्दाला वादळ आपले पंख तुटू न देण्यासाठी तळ हाता सारखे जगतात मायेने पालक.
         जगु द्यावे त्यांना नवीन विश्वास 
         पाठीशी स्तंभ म्हणून आणि मुक्तपणे

                       सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

प्रवास

    
प्रवास  
         मनातील विचारांना घेऊन जातो पण आपला प्रवास कुठे घेऊन जातो तर आपल्या मनातील प्रवास आपल्या माणसाजवळ घेऊन जातो ते शब्दात सांगू शकत नाही आजूबाजूला असलेल्या प्रवासांचे मन सुद्धा तसेच असते.                 कारण ते सुद्धा आपल्या मनात आपला प्रवास करीत असतं येणाऱ्या शब्दांना येणाऱ्या अनुभवाला मोकळी वाट देऊन जातात आणि ते ऐकताना आपला प्रवास पूर्ण झाला हे सुद्धा कळत नाही मनाला त्यांचा एक अनुभव नवीन अनुभव साठी तयार करीत.
          आपला प्रवास अंड करीत अविरत चाललेला त्यांचा प्रवास आपला प्रवास मनातला धावण्याचे सामर्थ्य आनंद देत चालू असतो हसत हसत आणि हसतच
    शब्दांच्या चिंब प्रवासात 
    भिजून मनातील कोपरा  
    करीत नवीन पाऊल वाट जुळवत
                 सविता तुकाराम लोटे 
-------------------@-----------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...