......हल्ली एकटाच प्रवास ....
✍️©️®️सविता तुकाराम लोटे
हल्ली एकटाच प्रवास
चालू आहे इथे
आता कोणीच नाही
एक अलौकिक स्मशान
शांतता....
शब्दांसोबत
संवादसोबत
व्याकूळ भावानेसोबत
आनंदासोबत
आपलेपणासोबत....
हल्ली प्रवास एकटीचाच
होत आहे जगण्याचा
प्रवासासोबत, सोबत मात्र
स्मशान शांतता घेऊन
कदाचीत
आता मी एकटीच
वाहत्या पाण्याबरोबर
साचलेल्या पाण्याबरोबर
हल्ली प्रवास एकटीचाच
आपलेपणाच्या
शांततेबरोबर
दुःखी पण
हळवेपणाने....!!!!