सांजवेळ... सांजवेळ परतीचा क्षण निळ्या निळ्या आकाशात सोनेरी झालर पसरलेली असते. आकाशातील सप्तरंग बरोबर वाऱ्याची झुळूक सुद्धा अंगाला रोमांचित करून जाते. सूर्य दूर पलीकडे जाताना दिसते. सुखदुःखची साक्षी असलेला सूर्यमित्र दुसऱ्या दिवसाला साथ देण्यासाठी आशावाद निर्माण करून परत भेटीचे आश्वासन देऊन जाते, सांजवेळ.
आकाशात पक्ष्यांच्या किलबिलाटात होत असते. पक्षी परतीचा वेळ असतो. आकाशातील रंगाबरोबर दिवसाचे सर्व अनुभव सांगत जात असावे जणू. दाही दिशा आपल्याशा वाटतात दिवसाचे चक्र संपून आकाशात मुक्त भरारी घेत परतात आपल्या घरट्याकडे.
सकाळी टवटवीत फुललेला मनुष्यप्राणी सांजवेळी घरी जाताना विचार करीत असते. दिवसाचा सांजवेळ अशावेळी असते की यावेळी न दिवस न रात्र तरी पण मनाने आनंदाने फुललेले असते. दिवसभराच्या कष्टाची चिन्ह जरी चेहर्यावर दिसत असले तरी घरच्यांकडे जाण्याची ओढ निराळीच असते.मनुष्यप्राणी परतात असते. सर्व हेवे-दावे सोडून.
नवविवाहितांना अति ओढ असते. नववधूची नवजात मुल असेल तर त्याच्याबरोबर खेळण्याची ताई चिमणी पाखरांचे बालगीत त्यांचे बोबडे बोल मनाला घराकडे नेतअसतात. सांजवेळी सर्व विसरून परतिचे पाय घरटंकडे नेत असतात हीच सांजवेळ!
दगड मातीची इमारत घर बनते जेव्हा त्यात आपली वाट पाहणारे माणसं असतात. इमारतीला घरपण येत असतं. आपल्या माणसां मुळे दिवसभर कष्ट करून थकलेल्या शरीराला विसावासाठी आपल्या माणसांसाठी घरी परततात असते. सांजवेळी पण घर जेव्हा इमारत असते. आपली माणसे नसतात तेव्हा संचार घरीच असतं. निळ्या आकाशाखाली त्याला साथ देत असते. हीच सांजवेळ सुखदुःखाची मूक साक्षीदार असते. हीच सांजवेळ वेळ प्रसंगी आधार देते, मित्र बनते नव्या स्वप्नांना आकार देते; क्षणभंगुर चिंता दूर करते सांजवेळ!!
दिवसातल्या कोणत्याही वेळेपेक्षा सांजवेळ मधुर स्मृती घेऊन येतात. गतकाळातील आठवणींना सुर देण्याचे काम करते. आनंदाचे आगर आणि सुखाचे सागर कोणत्याही शब्दांनी वर्णन केले तरी सांजवेळेचे सौंदर्य पूर्णपणे चित्रित करता येत नाही. सांजवेळ विविध रंगांनी भरलेले असते.
सांजवेळ आमच्या जीवनातील सत्य असते. रानावनातून गोठ्याकडे, आकाशातून घरट्याकडे, शेतातून घराकडे ,धाव घेणाऱ्या पाखरांना गाईंना आणि माणसांना सांजवेळ मातेप्रमाणे आपल्या कुशीत घेत आधुनिक जगात भावनाशून्य यंत्रेप्रमाणे धावणाऱ्या माणसाला स्वप्न फुलविण्यासाठी वेळ देत असते सांजवेळ...
सांजवेळ सांजवेळ... जीवन कल्पनेला फुलवीत असते ही सांजवेळ.
20.2.2007
सविता तुकाराम लोटे
----------------------------------