savitalote2021@bolgger.com

मराठी लेख सुविचार मराठी कविता चारोळी विद्रोही साहित्य योजना विविध योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख सुविचार मराठी कविता चारोळी विद्रोही साहित्य योजना विविध योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

**ओळखी - अनोळखी **



** ओळखी - अनोळखी **
          अनोळखी व्यक्ती कधी ओळखीची होते कळत नाही तर ओळखीची कधी अनोळखी होतात ही कळत नाही तर मग ओळखीचे कोण हे ही कळत नाही.
            जगण्याच्या या वाटेवर ओळखी आणि अनोळखी यातील पुसटची रेषा आता स्पष्ट दिसायला लागली आहे. ओळखीचे लोक जेव्हा अनोळखी होतात तेव्हा दुःख चिडचिड आणि नको असलेल्या सर्वच भावना आपले डोके वर करतात.           
              कारण कधीतरी आपण त्या व्यक्तींना अमूल्य वेळ दिलेला असतो आणि आता आपल्या आयुष्यात ते ती वेळ आलेली असते. तिथे आपल्याला खरोखरच कुणाची तरी मदत लागते.  ती मदत ओळखीचेच लोक करू शकतात.
              कारण आपण त्यांच्या त्या कठीण परिस्थितीत त्यांना दिलेली असते. पण विषय आता अनोळखी झाल्याच आहे. केलेल्या त्या वेळेच्या नाही.
          अशावेळी वाटते की अनोळखी व्यक्ती बरे!! चार-पाच मिनिटं बोलता क्षणात ओळखी होतात. विचारांची देवाण-घेवाण होते. संवाद होतो. हव्या पाण्यावर गप्पा होतात. ऊन- पाऊस यातील फरक त्या वेळ करतो.
           ज्यावेळी अनोळखी व्यक्ती अनोखीच राहून आपल्याला निस्वार्थ पणे मदत करीत असतो. त्यावेळी माणुसकी आहे याचे दर्शन होते.  तशाही प्रसंगात ओळखीचे लोक अनोळखी होऊन आपल्या सभोवती फिरत असतात.
       असो, प्रत्येक व्यक्ती स्वतः स्वतःवर काही संस्कार करतात. अशा कठीण प्रसंगी ते संस्कार आपल्याला दिसतात. म्हणून आपली वेळ आपली असते चांगली आणि वाईट दोन्हीही आणि दोन्हीही वेळ निघून जाते.
         वेळे सोबत कधी ओळखीची होऊन तर कधी अनोळखी होऊन. पण ती जाते हे नक्की.
       कडू आहे पण सत्य आहे.
          कडुलिंबाचा पानांचा स्वभाव कडू असला तरी ते औषध आहे. अनेक रोगांवरील.
             तशीच ही वेळ सुद्धा. असे अनुभव - अनुभव जपून ठेवा. कधी ते अनुभव ओळखीचे ठेवा तर कधी ते अनुभव अनोळखी सुद्धा करा...💕!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका . तुम्हाला असा कधी अनुभव आला असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद...!!

** Acquaintance - Stranger **
 You don't know when a stranger becomes an acquaintance, you don't know when an acquaintance becomes a stranger, and then you don't know who is an acquaintance.
 On this path of living, the blurred line between the known and the unknown is now clearly visible.  When familiar people become strangers, sadness, anger, and all sorts of unwanted emotions rear their heads.
 Because sometime we have given precious time to those persons and now that time has come in our life.  There we really need someone's help.  Only acquaintances can help.
 Because we have given them in their difficult situation.  But the subject has become a stranger now.  Not of that time.
 In that case, it seems that a stranger is better!!  After talking for four to five minutes, acquaintances are made in a moment.  There is an exchange of ideas.  Communicate.  There is a chat about the desired water.  That time makes the difference between heat and rain.
 

When a stranger helps us selflessly by being unique.  At that time it was seen that there is humanity.  In such cases, familiar people turn into strangers and move around us.
 However, each person performs some rituals on himself.  We see those sanskars on such difficult occasions.  So our time is ours both good and bad and both times pass.
 Sometimes becoming familiar and sometimes unfamiliar with time.  But sure she goes.
 Bitter but true.
 Although neem leaves are bitter in nature, they are medicinal.  against many diseases.
 This time too.  Keep such experiences.  Sometimes keep those experiences familiar and sometimes make them unfamiliar too...💕!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.  If you have ever had such an experience, be sure to share it in the comment box.  

Thank you...!!

 =========================================================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...