*** आधुनिक सावित्री ***
किती वर्ष झाली फेऱ्या मारतांना
पण, तुला सांगू एक...
नको त्या परंपरावादी रुढी प्रथा
आजच्या क्षणाला,
वटपौर्णिमेच्या साताजन्माचा
तू ऑफिस मध्ये जाताना म्हणतो
नीट राहा काळजी घे
हे पुरे आहे साता जन्मासाठी
तू लक्षात ठेवतो मला
मी घरी आहे गृहलक्ष्मी
या नात्याने संसार सांभाळतांना
तुला नको असते नवीन वस्तू
मिस्किलपणे हसत म्हणतो
घे तुझ्यासाठी एखादी दागिना
कोणत्या तरी दिवाळीला तेव्हा
तू माझा सत्यवान असतो
खडूस खोडकर आणि प्रेमळ
राहू दे आज नको देऊ डब्बा
थकली तू ...तापाने. करतो मी!!
तेव्हा तेच फक्त माझ्यासाठी
अभिमानाचे सौभाग्याचे प्रतीक
ते शब्द... फिके पडतात;
सर्व सौभाग्याचे अलंकार
त्या क्षणांना!
भांडते मी ...
सतत बारीक-सारीक कारणाने
तेव्हा तू जवळ येत बोलतो
sorry, आवरतो मी पसारा
तुझा -माझा Love you
तू मला जवळ घे
तेव्हा विसरते मी माझ्यातील
आधुनिक स्वतंत्र सावित्री,
तुझ्याजवळ येत
मी ही बोलते sorry
पण एक सांगू मला आवडते
तुला रागवायला ...तुझ्या मिठीत
येण्यासाठी !!
मग कशाला सात फेऱ्या आणि उपवास
मी आधुनिक स्वावलंबी सावित्री
तू आधुनिक स्वावलंबी सत्यवान
आपले नाते विश्वासाची सप्तपदी
ऊन पावसाळा झेलत सुख दुःखात
उभा संसार
तू माझ्याच तर सावलीही माझीच
वटवृक्षसारखा संसाराची !
तुझ्या माझ्या संसार वटवृक्षाला सावली
माझ्या -तुझ्यातील सावित्री सत्यवानाची
विश्वासातील विश्वासाची
साताजन्माच्या रेशीमगाठी !!!!!
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote