मनाच्या खोलदरीत भावना हळव्या होऊन आपल्याच भाव विश्वात आपला भावना अथा अथांग सागरासारखे मनाच्या खोलदरी साठवून ठेवतात उगाचच त्यादरीला कधी वादळ येते कधी वारा स्पर्शून जातो कधी गोंधळ घालून जातो असे का व्हावे हे कळत नाही पण उगाचच स्वतःच स्वतःला सांत्वन देत मनाच्या खोल डोळ्यात भावनांचा संवेदना बोचट करत राहते कधीतरी हा खेळ थांबेल वाळवंटातही हिरवळ फुलेल एकदाची पण मनाच्या अनाथ अथांग सागरामध्ये संवेदनाची कोणती संवेदना चालू असे माहित नाही तिथे उभी असते प्रत्येक वेळी कधीतरी पतंगासारखे उडणारे आपलेच हृदय आपल्याच भावना काळोखातले चांदणे चकाकी होतं मन अथांग सागरासारखे खूप आपल्या सोबत ठेवत असते लख्ख प्रकाश देत त्यावर ताण सागरामध्ये वेचून घ्यावी इतके शांतता उरलेली असते पण मनातील भावना धुंद होत असतात कधीतरी भावना ओठांवर शब्द म्हणून येतच नाही उरते फक्त एक भिजलेले विझलेले स्वप्न उरते फक्त तळमळ उरते फक्त पायात रुतलेला काटा खोल अथांग दरीत मनाचा ठाव ठिकाणही न लागू देता गळून पडतात स्वप्नाची माळ घरातल्या जळमटीसारखे मनाच्या अथांग सागरात जळमट लागते आणि तिथे फुलतच नाही जाई मोगरा गुलाब कुंदा चाफा अबोली प्राजक्ता...!! वाहून जाते जोहीकडील शांतते मनाच्या अथांग सागरात बेचैन होत असते मनातील भावना..! मनाला कुठेही चौकट नाही भावनेला कुठेही चौकट नाही जाणिवेला कुठेहीीी चौकट नाही पडलेल्या गाठीला कुठेही बंधन नाही जोडलेल्या नात्यांना कुठलीही बांधील की नाही उमलताात फक्त वेदना मनाच्या खोल अथांग सागर तिथे कशाचाही ठाव ठिकाणा नसतो अप्रतिम अशी एक संवेदना त्याा डोहामध्ये संवेदनहीन होत जाते आणि मनात फक्त उरतो वरवरची शांतता शांत सागरातील पाण्यासारखे त्याला कधीही अशांततेचेेे स्वरूप प्राप्त होईल तीी चौकट अथांग सागर का निर्माण करत अस
मनातील अथांग सागर झेप घेते उंच उंच तिला ओढ असते स्वप्नांच्या वाटेची धुंद झालेले दवबिंदूच्या साक्षीने का होईना अश्रूंच्या प्रवासातला नवीन वाळण हवे असते रस्ता गाठण्यासाठी मनातील अथांग सागर योग्यांना खुणा कुणालाच दाखवत नाही तो जणू महासागरच असतो शांत पण आज खोल अथांग असतो तो त्याला नातं अंत ला सुरुवात विचारांच्या भावनेच्या लाटेवर तो आपली भरती घेत असते आहोटी आली की ते मनातच ठेवत असते तिचे छोटेसे विश्व प्रखर दिव्यांनी पेटलेले असते गुंफलेल्या ठणठणीत मोकळेपणा सागरात हेलकावे खात असते भरकटलेला किनारा शोधत असते लाटांचा शोध मुळात नसतोच तरच ते फक्त तटस्थपणे बेचिराख झालेली अवचित मनाने फक्त शांतता शोधणे पण मनाच्या खोलदरीत ते शांतता कधी लाटांच्या वादळाबरोबर महाप्रलयाची संकल्पना रचत असते माहित नाही विचारांच्या आणि भावना संवेदनाच्या तटस्थपणे स्वीकारलेले शब्द आता प्रलयरुपी शब्दांसोबत आपल्या सोबत घेत असते वाट पहात फक्त उलट सुलट लाटन सोबत खेळत असते जगण्याचा मोह माहित नाही कुठे कमी होतो निरागसपणा मनाचा कुठे संपतो मनाच्या अथांग सागरात थेंब आता प्रलयाचेही रूप कधीही घेऊ शकते पण मनाला सतत पालवी शांतपणे पण बंदिस्त अवस्थेत आठवतात उन्हाळे पाण्याविनाच गेलेले आठवतात उन्हाळे घामाच्या धारेने वाहिले आठवतात उन्हाळे हजार पटीने सोसलेले पण शांतपणे समुद्रकिनारा जवळच असून सुद्धा भरकटलेला किनारा शोधावा अशिती अवस्था असते हलकीच पण पापण्यांनी भरलेले हलकेच पण अश्रूंनी भरलेले हे कळत नकळत उभ्या असतात लाटा आपल्या येण्याची आणि जाण्याची दोन्हीही अवस्था बघण्यासाठी अंतर्मनात पापणी मिळतात काळीज चिरं होते विसरतात तोही अथांग सागर कधीतरी उन्हाळे उन्हाळी पेटलेले शब्दांनी पेटलेले विसरतात तोही अथांग सागर आठवणींच्या महापुरात आठवणी साठलेल्या विसरतात तोही अथांग सागर शब्द शब्दांचे दुःख असो किंवा आनंद संवाद चालूच असतो अथांग मनाच्या सागरात कधी कधी वाटते समर्पित व्हावे त्या सागराबरोबर कधी कधी वाटते समर्पित हा विद्य कधी कधी वाटते समर्पित व्हावे
विजलेल्या भिजलेल्या क्षणांसोबत पण अथांग मन सगळे कसे आपलेसे करून टाकते समजत नाही त्या मनाला शोध घ्यावा तर कशाचा थकलो तर कशाने रंग रंगावर तर कशाने किनारा का सापडावा जर किनारा सापडावा असे वाटत असेल तर किनारा हरवला आहे हे तरी कुठे माहित आहे नवा रंग भरावा असे वाटत असताना हातात खूप काही रंग आहे नवीन रंगांची काय आवश्यकता आहे रिते झालो नाही अजून ओंजळीत खूप काही आहे रंगलेल्या गप्पा आठवणींच्या रंगलेल्या गप्पा स्वप्नांच्या फुललेला सुगंध गंधाळलेला फुललेला गुलाब टवटवीत लाल मनाचा साचलेले रूप बालपणाचे भिजलेलं हृदय गोड आठवणींचे हे सुद्धा आता अथा सागरात आहेच की मनाच्या खोल मनात काय संवेदना चालू आहे हे पाहत असताना फक्त आपण अस्ववेदना का बघत असतो रीत झालेल्या भावना का बघत असतो सर्वच खिडक्या उघड्या आहे काचे बंद असलेल्या खिडक्या सुद्धा उघडाच आहे प्रकाशाची चाहूल तर प्रत्येक खिडकी मधून येत आहे तर मग सरलं काय अथांग सागर मनाच्या अंधाऱ्या वाटेवर का चालत आहे प्रकाश तर चारही बाजूने आहे तर मग मनाच्या आता सागराला तीच भेट का मिळते जी आपली कधीच झालेली नसते आपल्यातील नकारात्मक दिशेलाच आपण आपले अस्तित्व का मानायचे हे आता सागराला कळले पाहिजे शोधून काहीही सापडत नाही कणाकणात फक्त सत्याची चाहूल असते पाण्याचा प्रत्येक थेंब फिल्टर पाण्यापेक्षा ही स्वच्छ असते कारण पाणी कोणतेही रंग रूप घेऊन येत नाही पाणी कधीही कोणत्याही साच्यात आपले अस्तित्व नष्ट करत नाही तहान भागविणे हा त्याचा धर्म धर्म तो कोणत्याही स्वरूपात असो तसेच माणसाची ही मनाच्या खोल अथांग सागरात गर्दी फक्त जाणीवची असते त्याला कोणत्याही स्वरूपात रंगात आकारात साच्यात बंदिस्त करू शकत नाही न उमटलेल्या भावना जर इतके महत्त्व मन देत असेल तर मनाच्या अथांग सागरात फक्त दगड माती धोंडे शेवाळ उपयोगी न पडणाऱ्या वस्तूच आहे असे वाटते पाण्याचा एक थेंब मोती होतो पाऊस पडून गेल्यावर दवबिंदूच्या स्वरूपात पाऊस आपले अस्तित्व ठेवून जातो तर मग मन अथांग सागरात आपण आपले अस्तित्व का ठेवू शकत नाही प्रत्येक वेळी भरकटलेला किनारा शोधावा हा हट्टाहास का असतो म्हणून मनाच्या अथांग सागराला सुद्धा आता सकारात्मकतेची चाहूल क्षणोक्षणी देऊन बघा मनाची चौकट खुली करा भरतीची लाट येऊ द्या वादळाची लाट येऊ द्या लाटेचे स्वरूप महाप्रलय असले तरी मनाच्या अथांग सागराला सांगा तटस्थपणे हे शनिक आहे येणारा प्रत्येक क्षण आपला असेल आपला असतो म्हणून मनाच्या खोल अथांग सागरात काय चालू आहे हे एकदा तपासणी तितकेच महत्त्वाचे आहे भरकटलेला किनारा त्यावेळेस सापडतं सापडतो ज्यावेळी आपल्याला माहीत असते आपली वाट भरकटलेली आहे आणि ही वाट आपण शोधायची मनाच्या अथांग खोल सागराला भावना शून्य रीत होऊ द्यायचे नाही कारण
भरकटलेल्या मनातला अथांग सागराला
किनारा सापडत नाही शांततेचा...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या.
-------------------------------------