savitalote2021@bolgger.com

सोमवार, २४ मे, २०२१

गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार




    गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," मनाला सुसंस्कृत करणे हे मानवी अस्तित्वाचे सर्वश्रेष्ठ ध्येय असले पाहिजे. त्याप्रमाणे जीवनाचे तत्वज्ञान हे सरळ साधे सोपे असावे जीवनाचे मूलभूत नियम स्वातंत्र्य समता बंधुभाव यावर आधारित आहे ."
          गौतम बुद्धांनी बौद्ध  धम्मात मध्यम मार्गाचा वापर करून मानवतावाद संपूर्ण जगाला दिला. गौतम बुद्ध म्हणतात," पाणी जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली हे मात्र शांत असते त्यामुळे शांत राहायला शिका."
  
         मानवी जीवनावर तीन गोष्टींचा प्रभाव पडतो धर्म कला संस्कृती ! बौद्ध धम्मात कला साहित्य आणि संस्कृती यांना अत्यंत महत्त्व आहे. या तीनही गोष्टी माणसाच्या भावना मन संवेदना तरल बनवत असते. 

         सत्याच्या शोधामुळे नवनिर्मिती होते.  ती अप्रतिम आणि सर्वश्रेष्ठ असते कलाकारांच्या आयुष्यापेक्षा त्यांच्या कलेला अधिक महत्त्व असते. धर्म आणि कला या दोघींची अभिव्यक्ती म्हणजे संस्कृती होय. जीवनातले सगळे चढ-उतार म्हणजे आपल्या निकोप वाढीसाठी लागणारे अनुभवाचे खतपाणी आहे. 
    ज्याला चांगलं मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाचे काही तत्त्वे पाळली पाहिजे ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे .माणसाच्या चांगल्या आणि वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मानदंड म्हणजे  पंचशील   होय.

1. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि
( मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो )

2. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि  ( मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो)

3. कामेसु विच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि (मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त प्रतिज्ञा करतो.)

4. मुसावाद वेरमणि सिक्खापदं समादियामि (मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो)

5. सुरमेरय मज्ज पमाद्ट्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि 
( मादक तसेच इतर सर्व मोहात पडणाऱ्या वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.)
      मानवी व्यक्तिमत्व काया  वाचा मन या तीन घटकांनी बनलेले आहे.   
     

    भगवान बुद्धाने सदाचाराचा जो मार्ग सांगितला आहे यालाच अष्टांगिक मार्ग म्हणतात.

1. सम्यक दृष्टी 
2. सम्यक संकल्प 
3. सम्यक वाचा  
4. सम्यक कर्मांन्त 
5. सम्यक आजीविका 
6. सम्यक व्यायाम 
7. सम्यक स्मृती 
8. सम्यक समाधी

   भगवान बुद्ध म्हणतात ,अविद्येचा विनाश हा  सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.आकांक्षा महत्वकांक्षा उदात्त आणि प्रशंसनीय असावी. बोलावे जे सत्य असे योग्य वर्तन. जगण्यापूर्ती मिळविण्याचे योग्य मार्ग. व्यायाम , मनाची सतत जागृती, चित्ताची एकाग्रता होय. जगात सर्व वस्तू  परिवर्तनशील आहेत अनित्य आहेत त्यामुळे माणसाने त्यांच्याविषयी आसक्ती ठेवता कामा नये. यास सत्य म्हणतात . गौतम बुद्धाने सम्यक साधने वर भर दिलेला आहे. कारण कुठलेही अवडंबर मन शांत घेऊ शकत नाही.  मनाला यातना मुक्त करू शकत नाही. आंतरिक शांती हीच मनाला परिपूर्ण शांती देत असते. अष्टांगिक मार्ग प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.

भगवान बुद्धने  परिव्राजकांना दहा शील मार्ग समजावून सांगितले.शीलमार्ग म्हणजे गुणांचे पालन करणे होय

1.नीतिमत्ता 
2.दान 
3.उपेक्षा   
4.ऐहिक सुखाचा त्याग 
5.योग्य प्रयत्न 
6.शांती 
7.सत्य 
8.दृढनिश्चय 
9.दयाशीलता 
10.मैत्री (बंधुभाव)
 
        भगवान बुद्धाच्या या धम्मतत्वांचा ज्या परिव्राजकांनी पहिल्यांदा स्वीकार केला त्यांना पंचवर्गीय भिक्खू म्हणतात. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन याच धम्माच्या तात्विक आधार आहे.
        बुद्धांनी रूढी परंपरा अंधविश्वास त्यांचे खंडन करून एक सहज सोपा मध्यम मार्ग सांगितला आहे.
    
     दुःख ही टाळता येण्याजोगे अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून जायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे
   तुम्ही जर योग्य दिशेने वाटचाल करत असेल तर चालत राहायला हवं त्या दिशेने गौतम बुद्ध म्हणतात.

    
       बुद्धाच्या रूपाने जगाचे वैचारिक क्षेत्र झाले बुद्धाच्या संपूर्ण तत्वज्ञानाला मानवतेची जोड आहे  सील बुद्धाचे नीतिशास्त्र आहे संमेक आजीविका बुद्धाचे अर्थशास्त्र आहे.
       बौद्ध धम्म जीवनातला प्रत्येक गोष्टी साठे गोष्टीसाठी प्रतिनिधित्व करतात मनाला विकसित करतात.
           बुद्ध धम्म मानवी मनाला जीवन जगण्यासाठी मार्गदाता बनते जीवनातील  सर्व वेदना भावना यांना प्रवाहित करते बुद्ध म्हणतात.        
          वेदना भावना संवेदना या मनाच्या सहचारिणी आहे तर मेंदू दृश्य स्वरूपाचे कार्य करते म्हणून मेंदू आणि मन यांना एकत्रित कार्य करण्याचे बळ हे बौद्ध तत्त्वज्ञान आपल्याला देते.               
       मानवाला मानव म्हणून जगण्याचे स्वतंत्र बुद्ध धम्माने दिले आणि आजही बुद्ध धम्म सर्व जगालातीच शिकवण देत आहे.
            आपला आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही आपल्याकडे आहे त्यामध्ये आनंदी राहा.
       
            बुध्दं सरणं गच्छामि
             धम्म सरणं गच्छामि
               संघ सरणं गच्छामि


     ✍️ सविता तुकाराम लोटे 


----------------------------------

 



    
   






मन शांत

-------मन शांत ------

मन शांत असेल 
असा क्षण नाही 
हृदयाला असेल ठाव 
आता ....

तो क्षण एखादी 
विचारांची शृंखला सतत 
शाश्वत ... अबोल 
उत्तरांच्या अपेक्षेने 

नवेपणाने सजलेले 
फुललेले पाकळीसारखे 
उमलत असलेले शब्द  
नयनातील शांत !!!

       सविता तुकाराम लोटे 



---------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...