*** भारतीय संविधान दिवस ***
(Indian Constitution Day)
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कायद्याविषयक, अर्थ इत्यादी क्षेत्रात बहुमूल्य काम केले आहे
भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये आणि चर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला होता. आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान बाबासाहेबांनी दिले. भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब होते.
डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या सोबत विद्वत्ता कल्पनाशक्ती तार्किक भाषा शैली वक्तृत्व आणि आज पर्यंत मिळविलेले सर्व ज्ञान पणाला लावून आणि अनुभवावरून भारतीय संविधानाची निर्मिती त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तयार केले. राष्ट्राच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे प्रचंड ज्ञान त्यांच्याजवळ होते. त्यांनी संविधान तयार करताना कुठेही अस्पष्ट गोंधळलेल्या शब्दात संविधान तयार केले नाही तर मुद्देसूद आणि सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत संविधानाची निर्मिती केली म्हणून आधुनिक भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास देशातील त्या समाजव्यवस्थेविरुद्ध होता जिथे अन्याय अत्याचार स्वातंत्र्याला कुठेही स्थान होते. प्रवास अनुभव त्यांनी अनुभवले होते आणि समोरच्या पिढीने देशातील भावी पिढीने विकासात्मक विचार प्रवाहात आणि आधुनिकतेमध्ये समाजातील तळागाळातील जनतेचा सहभाग असावा हा दृष्टिकोन सामोर ठेवून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर सोपी होती त्या जबाबदारीला योग्य पद्धतीने न्याय दिला.
देशभरात संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे म्हणजे संविधानिक मूल्यांच्या आचरण करणे होय. संविधानात मूलभूत हक्क अधिकार नागरिकांचे अंतर्भूत आहे. संविधानाच्या प्रास्तविकेत समाविष्ट आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ,राष्ट्रीय एकता, एकात्मता, धर्मनिरपेक्षता ,समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थापित करणे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही.
भारतीय संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका दीर्घ कालावधी संविधान पूर्ण करण्यासाठी लागला. भारतीय संविधान इंग्रजी आणि हिंदी भाषेत हाताने लिहिले गेले. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.
संविधान सभेची स्थापना 6 डिसेंबर 1946 रोजी झाली. काही कारणास्तव सभेवर बहिष्कार सुद्धा टाकण्यात आला, तरी 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष हरेंद्रकुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष आणि बी एन राव यांना घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केले. सुरुवातीला या सभेवर 389 सदस्य होते. फाळणीनंतर 299 सरकारी प्रांतातील चार मुख्य आयुक्त प्रांतांचे आणि 93 राज्यातील होते. जवाहरलाल नेहरूंनी एक वस्तुनिष्ठ ठराव सादर करून मूलभूत तत्वे मांडली आणि हीच राज्यघटनेचे प्रस्तावना आहे. कारण वस्तुनिष्ठ ठराव सर्वनुमती मंजूर करण्यात आला होता.
22 जुलै 1947 रोजी नवीन राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला.... देशाची फाळणी झाली.... देश दोन भागात विभागला गेला.... भारताचे वर्चस्व आणि पाकिस्तानचे वर्चस्व अशा देश विभागला गेला आणि भारताला स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवशी फाळणीचे दुःख मनात घेऊन, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करावा लागला. यासाठी काही राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी मतभेद असू शकतात किंवा विचार प्रवाहाच्या त्या विचारसरणीमुळे अखंड भारताला दोन भागांमध्ये विभागल्या गेले असावे पण भारताला स्वातंत्र्य मिळाले ही मुक्तता म्हणजे संपूर्ण भारत वर्षासाठी एक जल्लोष होता. उत्साह होता.
29 ऑगस्ट 1947 रोजी समिती सभेमध्ये डॉ. बी आर आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि समितीमध्ये अन्य सदस्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली.
या मसुदा समितीच्या 44 सभा झाल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले.
24 जानेवारी 1950 संविधान सभेचे अखेरची बैठक झाली. भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली आणि मान्यता मिळाले. त्यावेळी भारतीय राज्यघटनेस 395 लेख, आठ अनुसूची व 22 भाग असलेली राज्यघटना होती. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अस्तित्वात आली आणि खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य भारताची राज्यघटना मिळाली ही राज्यघटना तयार करण्यासाठी दोन वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. यासाठी 64 लाख रुपयांचा खर्च लागला.
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठी लिखित संविधाना आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय तसेच प्रज्ञाशील, करुणा, मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवली गेली आहे. राज्यघटनेत एक प्रस्ताविका बारा अनुसूची 25 भाग 448 कलमे 5 परिशिष्टे आहेत. भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीचे सदस्य म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. . त्यानंतर बाबासाहेबांनी जी भाषणे समितीच्या बैठकीमध्ये केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयावर प्रभुत्व बुद्धिमत्ता दूरदृष्टी देशप्रेम अशा विविध विषयावरील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव पंडित नेहरू पटेल प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करताना बाबासाहेब यांना सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सर्व सदस्यांना वाटले आणि त्यांनी बाबासाहेबांवर एवढी मोठी जबाबदारी बाबासाहेबांना दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताची पहिले कायदा आणि न्यायमंत्री होते. डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटना तयार केली. ती देशातील नागरिकांना स्वातंत्रपणे वास्तव करता यावे, कुणीही कोणावरही अन्याय करू नये. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, मी प्रथम भारतीय आणि अंतिम ही भारतीयच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून ते निर्णय सार्थक सिद्ध केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातील एक श्रेष्ठ घटनाकार संविधानकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण जगात त्यांना ओळखले जा.ते भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि विषय संपला असे झाले नाही तर भारताच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोठे योगदान भारतीय संविधान तयार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केले.
भारतीय संविधान हे लवचिक आहे. त्यामुळे काळानुसार परिस्थितीनुसार वेळेनुसार त्यामध्ये बदल करता येतो आणि त्यामध्ये सुधारणा करता येते.
आपली राज्यघटना प्रस्तावना मूलभूत मूल्य अधिकार, कर्तव्य, तत्त्वज्ञान, लोकनेते यांच्या आधारे बांधली गेलेली आहे. सामाजिक, आर्थिक विचार, राजकीय विचार, न्यायिक विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य समान संधी राष्ट्रीय एकात्मता अखंडता याची खात्री देणारी सर्व बंधुता वाढविणे इत्यादी विशेषण राज्यघटनेत आहे.
भारतीय राज्यघटना पूर्णपणे हाताने लिहिली गेली आहे. आजूबाजूंनी नक्षीकाम केलेले आहे. भारतीय संविधान म्हणजे राष्ट्रीय कायदा जो कायदा घराघरात पोहोचविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणाद्वारे केलेले आहे. लोकशाही ही फक्त कागदावरच राहिली नाही तर लोकशाही बाबासाहेबांच्या शब्दांमुळे समाजमान्य झालेली आहे. समाजाच्या त्या तळागाळापर्यंत लोकशाही पोहोचलेली आहे. त्यातील तत्त्वज्ञान कर्तव्य अधिकार जबाबदाऱ्या पोहोचलेल्या आहे. तिथे नागरिकांना स्वतःचा आणि राष्ट्राचा विकास करता येईल. प्रत्येक नागरिकांना मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार आहे .
भारतीय समाजव्यवस्थेमध्ये स्त्री आणि पुरुष असा भेदभाव राज्यघटनेत केला गेला नाही. गरीब - श्रीमंत असा भेदभाव केला गेला नाही. लहान - मोठा असा भेदभाव केला गेला नाही. प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेला नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. त्यांना त्यांचे मत मांडण्याचे आणि व्यक्त करण्याचे अधिकार आहे.
भारतीय लोकशाहीमध्ये चारही स्तंभ स्वातंत्र्य आहे. कारण यामुळेच भारतीय लोकशाही बळकट सशक्त आणि उपयोगिता पूर्ण होत असते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते. भारतीय संविधान म्हणजे देशाच्या नागरिकांना त्यांच्या स्वातंत्र्याची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेतलेली आहे म्हणून उच्चपदस्थ अधिकारी व भारतातली कोणताही सर्वसामान्य नागरिक या सर्वांना एकच अधिकार आहे.
भारतीय सविधान म्हणजे भारतीय लोकशाहीचा लख्ख प्रकाश आहे. लोकशाही घराघरात गुण्यागोविंदाने नांदत आहे. याचे सर्वस्व श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश हा देशातील नागरिकांना संविधानाचे महत्त्व व मसुदा समितीने संविधानाच्या स्थापनेसाठी केलेले अथक प्रयत्नांची जाणीव करून देणे हा आहे. संविधान दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्या ठिकाणी संविधानाबद्दल माहिती दिली जाते. ठिकठिकाणी संविधानाचे वाचन केले जाते.
अनेक सरकारी आणि संस्थेमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे मोठ्याने वाचन केले जाते. वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. निबंध स्पर्धा घेतल्या जातात. लेखन कौशल्य संबंधित संविधाना संबंधीचे विविध उपक्रम राबविले जातात. लोकनाट्यद्वारे चौकाचौकात ग्रामसभेत पंचायत समिती जिल्हा परिषदे येथे वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. राष्ट्र उभारणीसाठी राज्यघटनेची भूमिका किती महत्त्वाची होती या संदर्भात कार्यशाळा घेतली जातात.
सामुहिक वाचन यांचे नियोजन केले जाते. अशा प्रकारे विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. देशाचे नागरिक म्हणून भारतीय संविधान आपल्या प्रगतीसाठी किती महत्त्वाचे आहे हे नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याचे हे एक संविधान दिन साजरा करणे हे माध्यम आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांगीण विकासाची ती पाठशाळा आहे. त्या शाळेत एकदा प्रवेश केला की आयुष्यभर व्यक्ती हा विद्यार्थीच राहतो. संविधानाचे महत्त्व आणि भारतीय लोकशाही टिकविण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे भारतीय संविधानामुळे कळते आज आजूबाजूंनी जी परिस्थिती उभी आहे ती फक्त देखावा आहे. कारण भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही आणि कुणीही भारतीय लोकशाहीला नष्ट करू शकत नाही. कारण भारतीय संविधान हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचे एकमेव पुस्तक आहे.
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .