savitalote2021@bolgger.com

शनिवार, १४ जानेवारी, २०२३

#वाळवी *** (#Valvi ) #Desert



#वाळवी ***
            (#Valvi )

           कधी चाफाचा सुगंध अनुभवल्यानंतर सुगंधी निशिगंधाचा सुगंध मनाला प्रफुल्लित करणार नाही असे होत नाही. मनही त्याच खिडकीजवळ सतत जात असेल तर मनाला एक प्रकारची वाळवी लागते. एकच विचार आणि एकच वाट एकटी एकटी वाटत राहते.
         वाटते की लाकडाला ज्याप्रमाणे वाळवी पोखरून काढते तसे विचार मनाला मेंदूला पोखरून काढेल.  मन रिते होत जाते आणि शेवटी उरते एकच वाट एकटी पोखरलेली.(Thoughts will wear out the mind as the sand wears out the wood.  The mind becomes empty and in the end there is only one path left alone.)
             एक शब्द आणि एक विचार अश्रूंसोबत भावनांना उत आणते. शब्द ओठांशी थांबतात. हळवे करून जाते. मनाला लागलेली वाळवी शब्द शिवाय सर्व काही सांगून जाते. अशावेळी काय करायचे हा प्रश्न येऊन जातो.
            पण वाळवी तर थांबली पाहिजेच विचार तर थांबले पाहिजेत...! (But if the drought should stop, then the thoughts should stop...!) वाटेवर दुःखांच्या बाजारात चुका समजून सकारात्मकतेकडे पावले जायलाच हवी. चूक मान्य केली की पुष्कळदा वाट सापडते. खुंटलेली असली तरी ती आपली असते. पण त्या वाटेला विचारांचे वाळवी लागली तर सारा जन्म बेशुद्ध अवस्थेत निघून जातो आणि आयुष्य कवडीमोल भावात वाळवी लिलाव करते. 
               म्हणून काही जुन्या आठवणी पावसाच्या पुरा सोबत वाहून जाऊ द्या. सकारात्मक विचार सरणीची वाळवी मनाला लागू द्या. उन्हाचे चटके पायाला जखमा देऊन जरी जात असला तरी अनुभवाची शिदोरी देऊन जाते.
            मनात मनाला कळस गाठू द्या सकारात्मक वाळवीचे. ती पोखरेल पण चांगल्या विचाराने. ती झुंजायला मदत करेल. सकारात्मक विचारसरणीची वाळवी कडक ऊन पडले तरी सावली देत  राहील.             स्वतः स्वतःवर प्रेम करत राहीले तर इतरांवर सुद्धा प्रेमाचा वर्षाव करत राहील. 
        सुगंध मग कुठल्याही फुलांचा असो..! चाफा निशिगंधा मोगरा जाई जुई रातराणी आणि सर्व सुगंध आपले असेल.
    #वाळवी सकारात्मक असावी. नकारात्मक वाळविला जागीच औषधीचा कडू डोस देऊन तेथेच थांबवा.(Valve should be positive.  Stop the negative dried up there by giving a bitter dose of medicine on the spot.)

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

---------💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


***#Desert***

         After experiencing the aroma of chaffa, there is no time that the fragrance of aromatic nishigandha does not make the mind happy.  If the mind is constantly going near the same window, the mind has to dry up.  A single thought and a single path feels lonely.
           It is thought that the mind will be eroded by the brain just as the sand is eroded by the wood.  The mind becomes empty and in the end there is only one path left alone.
            A word and a thought evokes emotions with tears.  Words stop at the lips.  Makes it soft.  Everything is said without words that touch the mind.  In such a case, the question arises as to what to do.
        But if the drought should stop, then the thoughts should stop...!  On the way, in the market of sorrows, mistakes must be understood and steps should be taken towards positivity.  
            Admitting a mistake often leads to hope.  Even if it is stunted, it is ours.  But if that path becomes dry of thoughts, the whole birth passes away in unconsciousness and life is auctioned off at a bargain price.
         So let some old memories wash away with the flood of rain.  Apply positive thought patterns to your mind.  Even if the heat of the sun leaves bruises on the feet, it also leaves a lot of experience.
        Let the mind reach the peak of positive thoughts.  She will pour but with good thoughts.  She will help you fight.  The forest of positive thinking will continue to provide shade even if the sun is hot.   If you continue to love yourself, you will continue to shower love on others.
          The fragrance is any flower..!  Chafa nishigandha mogra jai jui ratrani and all fragrance will be yours.
 Valve should be positive.  Stop the negative dried up there by giving a bitter dose of medicine on the spot.


             ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

         The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
        If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
 The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
       Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤


-------------------------------------


16 ते 17 वर्षाचा लढा अनेकांनी गमावले प्राण आणि झाला नामविस्तार ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,"Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University."

      16 ते 17 वर्षाचा लढा अनेकांनी गमावले प्राण आणि झाला नामविस्तार ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,"
(  16 to 17 years of struggle many lost their lives and the name was changed to "Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.")

       सोळा वर्षाच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ", असे नामांतर करण्यात आले. एक धगधगती संघर्षाची चळवळ शांत झाली. 1976 ते इ.स.1994 या दरम्यान ही चळवळ चालू होती. 27 जुलै 1978 मध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृह आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. पण काही कारणास्तव या निर्णयाला जातीचा रंग देण्यात आला आणि एक चळवळ उभी झाले.
  या चळवळीमध्ये  अनेकांना आपले जीव गमवावे लागले. अनेकांना तुरुंगात जावे लागले. समाजाने  एकत्र येऊन उभारलेली ही चळवळ म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा होय.
        


        ही चळवळ कुणाच्याही अस्मितेला ठेच लावणारी नव्हती. कुणालाही कमी लेखणारी नव्हती. ही चळवळ बाबासाहेबांच्या विचाराने ज्या घराघरात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित केला त्या महामानवाला देण्याचा मानाचा मुजरा होता.
        तसे न होऊ देण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. पण नामांतराची चळवळ सुरू झाली आणि 16 ते 17 वर्ष प्रदीर्घकाळ हा संघर्ष चालू राहिला. नामांतर ही चळवळ एक साधारण आंदोलन होते पण प्रखर विरोधामुळे ही चळवळ एका लढा मध्ये रूपांतरित झाले.
       दलितांना एकटे पाडले जात होते. त्यांची कोंडी केली जात होती. त्यांचा छळ केला जात होता. अत्याचार केले जात होते.तरीही चळवळ थांबली नाही.
         ग्रामीण भागातील बरेचसे स्थलांतर झाले होते. तरीही चळवळ सोळा वर्ष चालू राहिले आणि शेवटी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले.
         💕 नामांतर ही चळवळ फक्त नावासाठी नव्हती तर समता स्वातंत्र्य बंधुता या तत्त्वाला समोर नेण्याची होते. 14 जानेवारी हा मोठा उत्साहाने नामांतर दिवस म्हणून साजरा केला जातो. 
      विचारांच्या लढाईला कितीही विरोध झाला तरी समानतेच्या विचाराला असमानतेचे विचार हरवू शकत नाही आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा होय.

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



=====!!!!!!!======!!!!!!!====!!!!!!======

     (16 to 17 years of struggle many lost their lives and the name was changed to "Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University.")

-------------------------------------

          After sixteen years of struggle, Marathwada University was renamed as "Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University".  A fiery struggle movement was silenced.  This movement was going on between 1976 and 1994 AD.  On 27 July 1978, both the Houses of the Legislature and the Marathwada University passed a resolution naming Babasaheb.  But for some reason this decision was given a caste color and a movement arose.
 Many lost their lives in this movement.  Many had to go to jail.  This movement, built by every section of the society, is the fight to change the name of Marathwada University.

       This movement was not meant to offend anyone's identity.  She did not look down on anyone.  This movement was a tribute of honor to the great man in whose house Babasaheb's thought ignited the light of knowledge.
 A lot of effort was made to prevent that from happening.  But the name change movement started and the struggle continued for 16 to 17 years.  The name change movement was a simple movement but due to intense opposition, the movement turned into a struggle.
 Dalits were being isolated.  They were being confused.  They were being tortured.  Atrocities were being done. However, the movement did not stop.
 There was a lot of migration from rural areas.  Still the movement continued for sixteen years and finally Dr. Marathwada University.  Babasaheb Ambedkar Marathwada University was named.
         The name change movement was not just for the name but to bring forward the principle of equality, freedom, brotherhood.  14th January is celebrated as Naamantar Day with great enthusiasm.
 No matter how much opposition there is in the battle of ideas, the idea of ​​equality cannot defeat the idea of ​​inequality and the best example of this is the Marathwada University name change fight.

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lote
           Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

 ,

❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...