सावली ही कधीही आपल्याला सोडत नाही आणि हीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली सोबती असते. याच भाव विश्वातून ही कविता रचलेली आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
...मी आणि माझी सावली ...
माझी मी असते तेव्हाही ती
माझ्यासोबत असते
माझी मी नसते तेव्हाही ती
माझ्यासोबत असते
माझ्या सावलीला माझा रंग
येतच नाही ....
तिथे सतत असते रंगहीन
तरीही सोबतच असते
काळा सावलीला
जीवनात महत्त्व निराळे
जीवन आहे तोपर्यंत ती सोबत
म्हणून एकटीचा प्रवास कधी होतच नाही
सतत असतो, दोघींचा प्रवास
एकांत जणू नशिबाला आलाच नाही
माझी सावली माझा प्राण
माझे अस्तित्व माझी सखी
आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंतची सोबती
मी आणि माझी सावली...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपले मत नक्की कळवा. धन्यवाद...!!
=============================
...me and my shadow...
Even when I have her
is with me
Even when I don't have her
is with me
My color to my shadow
Not coming...
There is continuous colorless
Still together
Black shadow
Unimportant in life
With her as long as there is life
So you never travel alone
It is continuous, the journey of both
Solitude is not fate
My shadow is my life
My existence my friend
A companion till the last moment of life
Me and my shadow...!!
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
If you like it, don't forget to like and share it and give your opinion in the comment box. Thanks!!💕
******************************************
***************************************