savitalote2021@bolgger.com

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

आयुष्य एक प्रवास

*** आयुष्य एक प्रवास ***


       खरंच हा एक प्रवास आहे... आयुष्याचा!!नेहमी वाटत राहते, आयुष्याचा प्रत्येक दिवस वेगळा असतो. कधी भरभरून देणारा... कधी खाली - रिता तर कधी खूप काही घेऊन जाणारा... खूप काही देऊन जाणारा... पण तरी प्रत्येक दिवस हा नवीन अनुभव घेऊन येतो.

             प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून शिकत असतो. तर कधी कधी इतरांच्याही अनुभवातूनही जगायला शिकवित असते. प्रत्येक अनुभव वेगळा असतो. अडचणी, समस्या, प्रश्न आयुष्याच्या पावलोपावली एक नवीन कोड देऊन जाते.  त्या कोड्यामध्येही न डगमगता... न खचता ...निराश न होता... त्या कोड्यांना सोडवावी लागतात.

            आयुष्याचा प्रवास सुरु झाला तो आई बाबांपासून. शब्दांची ओळखही नसलेल्या आपण सर्व तो प्रवास आईचा स्पर्श पासून सुरू करतो आणि बाबांचे तत्त्वे, नियम, नीतिमत्ता आणि मूल्यशिक्षण यामध्ये चालू होतो. 

        खर तर त्यात एक व्यक्तिमत्व घडत असते. वडील कितीही रागीट असले तरी आई इतकीच माया करणार असते. आई-बाबा आयुष्याच्या प्रवासात ते जहाज आहे तेथे अस्तित्वाची... आपलेपणाची... आपल्या असण्याची  जाणीव निर्माण करते.

 वळणावळणावर शब्दांसोबत अस्तित्व 
 देऊन जातात नसलेल्या शब्दांना 
 खर आयुष्य तेथेच चालू होते 
 एक नवीन प्रवासाचे...!!!


          आयुष्याचा प्रवास चालू होतो शाळा, कॉलेज,नोकरी, मित्र-मैत्रिणी यांच्यामध्ये..!! आयुष्याला नवीन वळण देत जातात. टप्प्याटप्प्याने अनुभवाची शिदोरी या प्रवासात खूप मिळते. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक.  

         या सर्वांमध्ये आयुष्याला खरा अर्थ देतात ते "आपले छंद". छंद आयुष्याचा प्रवासाला नवीन वळण देत जाते. नवीन मित्र मैत्रिणी भेटतात... नवीन ओळखी होतात... त्यातील काही व्यक्ती खूप जिवलग मित्र मैत्रिणी होता. आयुष्याचा प्रवास असाच चालू होतो,असाच.

          आयुष्याच्या प्रवासात जगताना स्वतः स्वतःला शिकवावे लागते.... रोज येणाऱ्या नवीन अनुभवासोबत. रोज येणारे अनुभव नको असतात. सतत प्रश्न स्वतः समस्या नको असतात.

         मेंदू बधीर होत जाते आणि आयुष्य नावाच्या प्रवास पुस्तकात फक्त कडू सत्‍य समोर येते. ते मनाला नको नकोसे वाटते. तरी समोर एक प्रश्न सत्य असलेले मनाला तोडणारे आणि मनाला कमकुवत करणारे. जगण्याच्या दिशा सतत भडकविणारे असते. 

        तरी  आयुष्य प्रवास पुस्तक ते सत्य जगताना समोर घेऊन येतात. संपलेला प्रवास परत चालू करण्यासाठी. काट्यांनी भरलेले आयुष्य फक्त एकाच क्षणासाठी सोपे होते ते म्हणजे आपली ,"स्वप्ने".

       स्वप्ने खुप असतात त्यावर चालतांना खऱ्या अर्थाने आयुष्य खूप देऊन आणि घेऊन जाते. प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतात कधी होत नाही तरी आयुष्य प्रवास फारच कठीण आहे हा प्रवास समजला तर सरळ सोपी आणि सुंदर होत जाते. 

आयुष्यात सुंदर ओळी लिहितांना 
फक्त सजलेली शब्द नको 
तर सजलेली प्रतिभा व्हवी 
आयुष्याच्या प्रवासाची गीते 
रंगविताना...!!

      

         न समजले तर कठीण!! म्हणूनच आयुष्य प्रवासाच्या रस्त्यांनावर पावले जपून ठेवावे सर्वांनी..!! संकटे कोणते रूप घेऊन येईल कळत नाही.

         आयुष्य प्रवास कठोर परिश्रम आणि कठोर परिश्रम यातूनच जात असते. हा प्रवास चुकीच्या मार्गाने जाणार नाही याची दक्षता मात्र सर्वांनाच घ्यावी लागते. शेवटी हा प्रवास आहे. कधी अपघात होईल माहित नाही.' नजर हटी दुर्घटना घटी', म्हणून प्रवासात चांगला मार्गावरून करा.... वेळ आणि परिस्थितीचा समेळ घालून चालू ठेवा.

          कोणत्याही व्यसनापासून दूर राहा. स्वार्थ व्यभिचारी प्रवृत्तीपासून दूर राहा. वाईट माणसापासून दूर रहा. अनैतिक कार्य करू नका. समाज मान्य( संवैधानिक ) सर्व नियम मान्य करून आयुष्य प्रवास चालू ठेवा. 

       प्रगतीमार्गमधून आयुष्य प्रवास चालू ठेवा. अपयश आले तरी यशाच्या मार्गावर चालण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. कारण यश आणि अपयश हा आयुष्य प्रवासाचा एक एक विश्रांतीचा फुल स्टॉप असतो आणि तो प्रत्येकांच्या आयुष्य प्रवास पुस्तकामध्ये येत असतो.

    जगण्याच्या वाटा अनेक 
    जपण्याच्या वाटा मर्यादित 
    आयुष्य प्रवास जपणाऱ्यामध्ये 
    चालतो म्हणून जपून ठेवा 
    आपली नाते 
    आपली नाळ 
    आपले संस्कार 
    आपली नीतिमत्ता 
    आपली कर्तव्य व जबाबदारी..!!

               आयुष्याच्या प्रवासात कटकटी खूप आहे. दुःख निराशा आहे. तरी आयुष्य प्रवासात रिमझिम पाऊस ....सकाळचा गारवा मन ओलावून देणारा प्रवास सुद्धा आहे. आयुष्याच्या प्रवासात खूप गोष्टी शिकविल्या जातात. नवीन आशेसोबत नवी स्वप्न नवीन झुळूक बनवून आयुष्यात येतात.

      आयुष्यातील प्रवास नवीन नवीन अनुभव घेऊन येत असतात. म्हणूनच आयुष्याचा प्रवास करताना मनमोकळ्या पद्धतीने करा. त्यात कोणतेही हेवेदावे करू नका... ठेवू नका..!! आयुष्याच्या प्रवासात कमी-जास्त होत राहील पण सर्वांना सर्व मिळते असे नाही.

           माझ्याकडे आहे म्हणून गर्व करू नका त्याच्याकडे नाही म्हणून तोंडात येईल ते बोलू नका. कारण आयुष्याचा प्रवास प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. कुणाच्या वाटेला तो खडतर येतो तर कोणाच्या वाटेला तो मऊ गुलाबी पाकळ्यांच्या पायवाटेसारखा येतो. ज्यांच्या वाटेला हा प्रवास आला असेल त्यांनी ते क्षण जपून साठवून ठेवा!! कारण हा प्रवास आपल्या मर्जीने होत नाही. कधी दुःखाचे सावट येईल माहित नाही म्हणून या आयुष्याच्या प्रवासाच्या या क्षणांना हृदयाच्या अतिआत अंतर्मनात जपून ठेवा.


         आयुष्याच्या प्रवासाचे पुस्तक वाचता येत नाही लिहिता येत नाही फक्त ते जगावे लागते कारण  प्रवास चालू असतो.

             आयुष्य प्रवास असंख्या स्वप्नांपासून चालू होतो आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपड व्यक्तीची आयुष्यभर चालू होते कधी आयुष्य स्तब्ध करून जाते. तर कधी आयुष्य खूप मनमोकळ्या गप्पा मारीत बसते.खूप आनंदी होते. खूप दुःखी होते. नकळत आयुष्य प्रवास या दोन गोष्टीवर चालत राहते.

           मनातल्या मनाला कधीच या प्रवासात समजून घेत नाही.... समजत नाही... समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. कारण तो फक्त आपला प्रवास करीत असतो. मात्र सोबत दुःख सोबत आनंद सोबत सुख सोबत अगणित स्वप्नांची मनसाखळी त्यांच्या या प्रवासाचे गणित मीटरमध्ये लागू शकत नाही हा प्रवास जितका सोयीचा आणि मन पूरक होईल याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. शेवटी प्रवासा हा शेवटचा टप्पा तर येणारच.


         आयुष्य एक प्रवास जन्मापासून चालू झालेला. आपल्याला फक्त चालू होण्याचा मार्ग माहित आहे. आपल्याही नकळत चालू होणारा आईच्या गर्भात पण शेवटचा टप्पा क्षण वेळ प्रसंग आणि त्या पर्यंत नेणाऱ्या प्रवासाची कार्यपद्धती नियम माहित नाही.... म्हणून प्रवास चालू ठेवा. कोणतेही हेवेदावे न करता शेवटी आयुष्य प्रवास एकाच वाटेवर संपतो आयुष्यात कितीही वेगवेगळी वळणे व्यक्तीच्या जीवनात असली तरी आयुष्याच्या प्रवास पुस्तकात शेवटचे पान एकच असते.


         निसर्ग सत्य आहे ज्या गोष्टीची सुरुवात झाली ती गोष्ट शेवटच्या क्षणांपर्यंत जाणार. "शेवटी हे आयुष्य प्रवास आहे ". 

              आयुष्य एकाच संपलेल्या प्रवासापर्यंत घेऊन जाते. ते आयुष्याचे शेवटचे पान कोणताही व्यक्ती लिहू शकत नाही.... पाहू शकत नाही आणि कुणी विचारही करू शकत नाही. आयुष्य प्रवास अंतिम टप्पा गाठलेला असतो सुखदुःखाच्या वाटेवर यश अपयशाच्या नावेवर गर्व अहंकार या तलवारीवर आणि आपुलकी जिव्हाळा या मायेच्या सुंदर ओंजळीमध्ये सत्य-असत्य च्या पलीकडे आयुष्य एक प्रवास चालू राहतो.


           आपण असलो वा नसलो तरी आयुष्य प्रवास खूप सुंदर एक कोड आहे. ते सोडविता ही येत नाही आणि कानाडोळा करता येत नाही. आयुष्य फक्त चालू असते. ते हसत घालवा कि रडत आयुष्य खूप सुंदर आहे. 

        आयुष्य प्रवास आहे म्हणून व्यक्ती आहे माणूस आहे. आठवणी आहे... श्वास आहे.... आपले व्यक्तिमत्व आहे.... आपली नीतिमत्ता आहे ...आपले मूल्य आहे... आपले संस्कार आहे... आपले सर्व नातीगोती आहे.... आपण आहो म्हणून सर्व आहे आणि आपण आहो म्हणून आयुष्याचा प्रवास आहे.

आयुष्य अनुभवाचे गाव 

आयुष्य मिळालेले अमूल्य क्षण 

आयुष्य भरभरून देणारे व घेणारे 

आयुष्य स्वप्नांना जागविणारे 

आयुष्य दुःखाची माळ सुखाची फुलछडी 

आयुष्यात ठिगळ गोधडीचे 

आणि गालीचा हसूचा 

आयुष्य प्रवास शेवटचा क्षणपावलांचा 

चोरपावलांनी न माहीत असलेला 

प्रवास क्षणी... 

आयुष्य प्रवास एक गणित 

माझे तुमच्यातील न उलगडलेले 

एक भूमितीय प्रमेय 

निसर्ग नियमांमध्ये बांधले 

तरी खूप सुंदर ..!!

सकाळच्या गारवासारखे 

आयुष्य एक प्रवास संपलेल्या 

क्षणापर्यंत माझा माझ्यासाठी 

चालू झालेला 

रात्र दिवसाच्या खेळासारखा...!!!!


           आयुष्य प्रवास कधी ही संपत नाही. तो इतरांच्या आयुष्यात आठवणींच्या स्वरूपात त्यांच्या आयुष्य प्रवासात सोबत राहतो.


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *** आयुष्य एक प्रवास ***

           अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!
Thank you..!!!

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...