"शब्द", शब्द हा एक शब्द नसून आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा महत्वपूर्ण शब्द आहे.... मला समजलेला शब्दाचा अर्थ शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कविता स्वरचित स्वलिखित आहे.
***** शब्द *****
शब्द अडकलेल्या
स्वप्नांची मोकळीक
शब्द गोड
शब्द खेळरचना
आपुलकीची
शब्द प्रेम
शब्द माया
शब्द कोऱ्या पानांवरील
सुंदरस्वप्न
शब्द गोड
शब्द हिरवळ
शब्द सुकलेल्या
आयुष्यात हसरे फुल
शब्द खोलवर
रुतलेल्या भावनांची
आसवे
शब्द मनशांती
शब्द तलवारीवरील
धार
शब्द जीवनाचे
सार्थक
शब्द कौतुकास्पद
शब्द भक्ती
शब्द मानवी
सुमधुर
अस्तित्वाचे गीत !!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-*** शब्द ***
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you !!
*************************************