..... काही भावना शब्दात मांडताच येत नाही. अशीच ही एक भावना एक प्रेयसी आपल्या प्रेमाबद्दल व्यक्त होत आहे.
कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!!
.... बंद मूठीतील .....
बंद मूठीतील
त्याचा हात तळहातावर येताच
भान हरपून जाणारी
त्याच्या स्पर्शाने .....
प्रेम माझे त्याच्या ओठांवरील
ओठापर्यंतचे माझ्या
प्रेम माझे स्पर्शाचे
मिठीत घेतलेल्या त्या क्षणांचे
प्रेम मर्यादापलीकडे प्रेमाचे
उरल्या सुरल्या मर्यादापर्यंतचे
प्रेम माझ्या तळहातावरील रेषेचे
पण त्यात विसरून गेले
त्याच्या तळहातावरील भाग्यरेषा
बंद मुठीतील ....
पाहिलेच ना मी कधी भाग्यरेषा
प्रेमाची बंध मूठीतील
प्रेम त्याचे त्याच्या विचारांशी आता
अमर्यादित प्रेमाची भाषा
बदललेली मन गाभाऱ्यातील
प्रेमाला आता अर्थ तळ हातावरील
भाग्यरेषेच्या भाषेची
प्रेम मर्यादापलीकडील प्रेमाची
स्पर्शाचे सुगंधित गंधहीन
झालेल्या प्रेमाची....
प्रेम माझ्या तळहातावरील भाग्यरेषेचे
बंद मूठीतील ....!
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया.
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.