savitalote2021@bolgger.com

मराठी लेख विद्रोही साहित्य मराठी कविता विविध योजना पुरस्कार Dr. Ambedkar National Award लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख विद्रोही साहित्य मराठी कविता विविध योजना पुरस्कार Dr. Ambedkar National Award लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार /Dr. Ambedkar National Award


"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार," याबद्दल थोडक्यात माहिती आपण बघू या.....!!!
( Dr.  Ambedkar National Award," let's see brief information about it.....!!!)

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ,समाजसुधारक ,कायदेपंडित, तत्त्वज्ञानी,राजकारणी इत्यादी होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळ उभी करून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले.          डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,"आधुनिक  भारताचे निर्माते होय". डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आयुष्याचा एक -एक क्षण समाज कार्यामध्ये दिला. समाज परिवर्तन घडवून आणले.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी मूलमंत्र आहे. देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले योगदान दिले त्यामुळे त्यांना भारताचे शिल्पकार म्हणतात.
                 त्यांच्या याच कार्याला मानाचा मुजरा देण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ,"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार," भारत सरकारने घोषित केला. त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण बघूया...!!!
          "डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार," केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने ,"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार", प्रदान करण्यात येते. 
         समाजात सामाजिक समरसता आणि सक्षमीकरण  निर्माण करण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष 1992 मध्ये ही समिती गठीत करण्यात आली. त्या वर्षापासून हा पुरस्कार मागासवर्गीयांच्या विशेष कामगिरीबद्दल योगदानाबद्दल दिला जातो .
       डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा समाजात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी आणि  शोषित पीडित मागासवर्गीयांसाठी केलेल्या कार्याबद्दल योगदान देण्यासाठी प्रदान केला जातो.  

"समितीचे सदस्य कोण असते "
(Who is the member of the committee?)
        या समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात .भारताचे मुख्य न्यायाधीश ,शिक्षणतज्ञ, पत्रकार, सार्वजनिक जीवनात योगदान देणारे दोन सदस्य असतात.

( The committee is chaired by the Vice President of India. The Chief Justice of India, an educationist, a journalist, two members who contribute to public life.)

     डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा शोषित पीडित आणि मागासवर्गीयांसाठी विशेष योगदानासाठी दिला जातो.
         सामाजिक संस्था व्यक्ती व समाजातील मागासवर्गीय प्रति असलेल्या विकास कामांमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.
       हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीच्या कार्याबद्दल समाजात सकारात्मकतेचा परिणाम झालेला असतो. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार प्रदान केला जातो.
       या  पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये रोख आणि ट्रॉफी,प्रशस्तीपत्र असे आहे.
( The form of this award is ten lakh rupees in cash and trophy, citation.)

      हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती(#President of India) यांच्या हस्ते प्रदान करण्यात येते.
      डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा समाजामध्ये सकारात्मक भूमिका निभवतो कारण हा पुरस्कार समाजातील त्या वर्गाशी संबंधित आहे त्या वर्गाला विकास प्रवाहामध्ये आणण्याचे काम जो व्यक्ती संस्था गट या व्यक्ती समूह करतात त्यांच्या कार्याला सन्मान करण्याचे काम हा पुरस्कार करते.
        समाजात एक सकारात्मक बाजू त्यांच्याबद्दल मांडण्याचे काम करते.जेणेकरून त्यांच्या कार्यामध्ये त्यांना आर्थिक पाठबळ मिळेलच;सोबत त्या व्यक्ती किंवा संस्था यांचा संघर्ष ही कमी करण्यास मदत होईल आणि त्यांचे कार्य हे योग्य पद्धतीने तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचेल. हा डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यामागचा प्रमुख उद्देश होय.

          आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!

     ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


=======================================================
(picture google वरून डाऊनलोड करण्यात आले आहे.)

(Let us see brief information about "Dr. Ambedkar National Award".....!!!)



 Dr.  Babasaheb Ambedkar was an Indian economist, social reformer, jurist, philosopher, politician, etc. Dr.  Babasaheb Ambedkar started Dalit movement and got them their justice rights.  Dr.  Babasaheb Ambedkar "is the creator of modern India".  Dr.  Babasaheb Ambedkar gave every moment of his life in social work for social change.  Changed the society.
 Dr.  Babasaheb Ambedkar Indian Constitution is the basic mantra for the freedom of every individual in India.  Dr. in different areas of the country.  Babasaheb Ambedkar contributed so much that he is called the architect of India.
 To honor his work, the Government of India announced the "Dr. Ambedkar National Award" on the occasion of his birth centenary.  Let's see the brief information about it...!!!

Dr.  Ambedkar National Award," on behalf of the Dr. Ambedkar Foundation under the Union Ministry of Social Justice and Empowerment, "Dr.  Ambedkar National Award".
 This award is given to individuals or organizations working to create social harmony and empowerment in the society.
 Dr.  This committee was formed in 1992, the birth centenary year of Babasaheb Ambedkar.  Since that year, this award has been given for the special achievements of the backward classes.
 Dr.  Ambedkar National Award is given for contribution towards social harmony in the society and for the work done for the oppressed and backward classes.

 "Who is the member of the committee"
 (Who is the member of the committee?)
 The committee is chaired by the Vice President of India. The Chief Justice of India, an educationist, a journalist, two members who contribute to public life.
 Dr.  Ambedkar National Award is given for special contribution to the oppressed victims and backward classes.
 This award is given to social organizations and individuals who work in various fields in the development work of the backward classes in the society.
 The work of the recipient of this award has a positive effect on the society.  This award is given in recognition of his work.
 The form of this award is Rs.10 lakh cash and trophy, citation.
 This award is conferred by the President of India.



Dr. Ambedkar National Award plays a positive role in the society because the award honors the work of individuals, organizations, groups of individuals who work to bring that class into the stream of development.
 It works to project a positive side about them in the society, so that they will get financial support in their work, help to reduce the struggle of that person or organization and their work will reach the grassroots people in a proper way.  This is the main purpose behind conferring the Dr. Ambedkar National Award.


         If you liked today's accounting information don't forget to share and like. Make sure to let me know how you feel about my page in the comment box.  You have a conscious reaction to come.  Make sure to report any mistakes in the comment box...!!❤💕 Thank you!!!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
       Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=========================================================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...