savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

हसू

...हसू ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                     प्रश्न पडतो कितीतरी लोकांना की हसू कुठे गायब झाले. प्रश्न विचारले जातात त्यावर रम्य पहाट आता रम्य का नाही. फुललेला मोगरा सुगंधविनास फुलतो का...?
           पहाट झाली तरी संध्याकाळच का असते. हसू न उलघडणार कोड कितीही प्रयत्न केला तरी. हसू आपलेच माहित नाही कुठे? मी त्याला शोधते गालांवर... ओठांवर.... डोळ्यात.... मनात..... आरशात सुद्धा आणि डोळ्यांच्या अश्रूत सुद्धा.

       पण ते दिसतच नाही. माहित नाही. हरवले आहे.हसून, पण का? याही प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत. सापडेल का कुणाला ते हसू तर शोधून द्या.

        कुठे असते त्या गावचा पत्ता द्या.... पत्ता मिळाला की मी त्या पायवाटेवर अलगद पाय ठेवून आवाजही न करता हसू घेऊन येईल माझ्यासाठी तुमच्यासाठी माझ्यातील अस्तित्वासाठी आणि आणि आणि माहित नाही कुणा कुणासाठी.

       पण मी घेऊन येईल हसू. पत्ता द्या!!! मला त्या गावचा ...त्या शहराचा.... त्या  वाळवंटाचा... त्या हिरवळीचा त्या दगड धोंड्याच्या रस्त्यांचा .... लपून ठेवलेल्या विस्मरणात गेलेल्या त्या शब्दवाटेचा .....त्या डोंगरदऱ्या असलेल्या कोणत्याही पायवाटेचा.

      हसू घेऊन येईल. माझ्यासाठी! तुमच्यासाठी !!कुणालाही परत प्रश्न पडणार नाही.माझे  हसू कुठे गेले? माझे  हसू कुठे गेले? 

       असेल ते माझ्याजवळ .असेल ते तुमच्याजवळ. बँकेत ठेवावे इतके मूल्यवान वस्तू सारखे...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
      आपल्या येण्याची जाणीव आपले विचार. कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



... smile ...

         Many people wonder where the smile has disappeared.  Questions are asked why the beautiful morning is not beautiful anymore.  Does a blooming peony bloom without fragrance...?


     Why is it still evening even if it is dawn?  No matter how hard you try, the smiley code will not be deciphered.  Don't know where to smile?  I look for him on the cheeks... on the lips... in the eyes... in the mind... even in the mirror and in the tears of the eyes.

 But it is not visible.  don't know  Lost. Smile, but why?  The answer to this question is also unanswered.  If anyone can find it, find it.

Give me the address of the village where it is.

 But I will bring a smile.  Give the address!!!  I miss that village...that city....that desert...that green grass those cobblestone roads....that word trail hidden away in oblivion....any footpath in that mountain range.

 Will bring a smile.  For me!  For you !!No one will question back.Where did my smile go?  Where did my smile go?

 I will have it, you will have it.  Like a valuable thing to keep in a bank...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
        
 The awareness of your arrival is your thoughts.  Do register your opinion in the comment box.  Don't forget to like and share if you like.

 

========❤❤❤❤❤❤❤======

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...