savitalote2021@bolgger.com

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

कदाचित यश

कदाचित यश

...... यश हा शब्द आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा असतो. यश नसले की माणूस एकटा पडत जातो आणि रमत जातो स्वतःमध्ये. जसे एखादी वस्तू स्वतः स्वतःला परिपक्व करीत असते.
 
            एका विशिष्ट वळणावर तो स्वतः स्वतःचे अस्तित्व सिद्ध करीत असते. एवढेच असले तरी कधी कधी यश गर्वाची जागा घेत असेल तर बर पण गर्व हा अहंकारामध्ये परिवर्तन झाले की त्या पलीकडे काहीही उरत नाही.

             गोष्टी पण त्याची ऐपत, त्याची लायकी त्याची औकात यासारखा शब्दांचा भरीमार भाषेमध्ये खूप असतो. भाषा बदलते नियंत्रण सुटते शरीराचे हावभाव बदलतात. स्वतःच्या वागण्यावरील आणि माणूस म्हणून अधिक प्रगत होत जातो. प्रगत होता होता माणूस म्हणून अधिकाधिक प्रगतीच्या वाटा संकुचित होत जातात.
      फसविले जाते इतरांना आणि ते करता करता स्वतःला सुद्धा. असो," व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ".!

           प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे यश. पण अशामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. घड्याळाचे काटे जसे 24 तास चालू असतात तसे यशाचे गणिते चालू असतात. यशाची सर्व गणिते कदाचित आपल्यापर्यंत येत असते. फक्त आणि चालू होते नवीन गणित उध्वस्त झालेली स्वप्न परत आपल्या वाटेवर येतात.

             नवीन संधी हसत आपल्या जवळ येतात अपयशाने गळलेली प्रत्येक जागा ही आपली असते. यशाने मिळालेली प्रत्येक संधी ही आपलीच असते.आत्मविश्वास, स्वयंभू ,स्वविचार आणि असे बरेच काही मोठे शब्द त्या वाटेवर सहज पायदळी येऊन मेंदूपर्यंत जातात आणि यश नावाचे गणित फक्त मी सोडविले.

                अहंकाराच्या पायरीवर चढून राहतात. आपल्या या यशासाठी कदाचित कुणीही काहीही प्रयत्न केलेले नाही फक्त मी मी आणि मी या रंग बदलणाऱ्या माणसाच्या स्वभावाला परत एक रंग चढतो तो म्हणजे मी पणाचा आणि इथेच तो अपयशाच्या पायरीवर चालत असतो.

      कारण यश कधीही फक्त स्वतः पुरते असू शकत नाही कारण त्यासाठी आयुष्यातील एका अशा वळणावरून आपण चालत असतो तिथे आई वडील यांची भूमिका सर्वात जास्त असते. इतरांची नसली तरी..!!

             विशिष्ट एका व्यक्तीला या यशाचे भागीदार बनविले जाते आणि इथेच खेळ संपतो एक व्यक्ती म्हणून. एक माणूस म्हणून .
एक आत्मविश्वासू व्यक्ती म्हणून.

          एक यशस्वी यशोगाथा सांगणाऱ्या व्यक्तीची. कारण तो रंग बदलत असतो . यशाच्या या पायरी पर्यंत तो मागे खूप काही सोडून येत असतो. डोळसपणे  अज्ञानाची चादर घेऊनच. 

          स्वप्न कधीही कुणाचे संपून जात नाही पण कुणाच्या तरी यशा सोबत कुणाची तरी अपयशही जुळलेले असते ही गोष्ट जरी लक्षात ठेवले तरी यश कदाचित अशाच व्यक्तीच्या पदरी पडते जो आत्मविश्वासाने इतरांना गृहीत धरून चालत असतो.

                 यशापर्यंत जाण्यासाठी मेहनत करावीच लागते. आत्मविश्वास आपल्याच विश्वासावर प्रत्येक वेळी वजन काटा मध्ये मोजावेच लागतात. रात्र दिवस आणि दिवस रात्र यामध्ये वेळेचे गणित मांडावेच लागते. त्याला स्वतःला खूप त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो म्हणून हे आपण विसरू शकत नाही की या यशाच्या पायरीवर येण्यासाठी आपल्या सोबत खूप माणसे होती कदाचित आता असतीलही पण अशा या पायरीवरून बघताना त्या माणसांकडे त्याच दृष्टिकोनातून आपण बघत आहोत का की आपल्या भावना इथे आल्यावर वांझ निरर्थक तर झाला नाही ना हे तपासावे लागेल कदाचित.

        गळलेल्या जागा अधिक रिकाम्या झाल्या आहे का? रिकाम्या झालेल्या जागा आपण भरल्या आहेत का? या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण कदाचित यशाच्या पायरीवर पूर्णपणे काळा चद्दर मध्ये गुंडाळून ठेवत असतो आणि आपल्या सोबत असतात फक्त आपले फक्त आपली च माणसे.

            ती त्या यशाच्या पायरीवर आल्यानंतर मिळालेले.  असो, सांगण्याचे तात्पर्य इतकेच की आयुष्याच्या या पायरीवरचा आतला रावण आपल्याला कधीही दिसत नाही आणि याचे कारण म्हणजे कदाचित यश पहिल्या बाकावर बसल्यानंतर कधीही आपण मागे वळून पाहत नाही .
                          कारण आपल्या पाठीमागील विश्व आपल्याला कधीही दिसत नाही कारण आपण डोळस असतो आपल्या सामोरील विश्वामध्ये.  कदाचित यशही असेच.जसे गळलेले प्रत्येक पान हे अपयशाचे प्रतिनिधित्व करीत असते. कारण निसर्गचक्र नुसार ते उपयोग शून्य असेल पण एक गोष्ट कोणीही विसरू नये निसर्ग चक्र फक्त त्या व्यक्तीसाठीच नाही.

         निसर्गचक्राचा भाग तुम्हीही होणार आहात.  चला तर मग, आपण यशाच्या पायरीवर आपल्या सोबत असणारे .....आपल्या खडतड प्रवासात असलेल्या व्यक्तींना शोधूया. जे आपल्याही नकळत रिकाम्या जागा झाल्या असेल. आपण त्यांना आपल्या आत्मविश्वासाचा भाग बनवूया.

         यशाच्या या रंग बदलत्या माणसाच्या माणसाला परत कदाचित एक वेगळा यशाच्या मार्गावर घेऊन जाऊया. यश नावाचे सुंदर फळ सर्व मिळून जरी खाऊ शकत नसलो तरी ते फळ इतरांसोबत कधीतरी खाऊन बघा. रोज नाही कधीतरी !!!

      तुमचा आत्मविश्वास आहे त्यापेक्षा कितीतरी मोठा होईल आणि हेच गणित आयुष्याचे त्या क्षणापर्यंत सोबतच असेल ज्या क्षणापर्यंत तुम्हाला हवा आहे.


        तात्पुरता का होईना हा विचार कदाचित    यशस्वी माणसाच्या मेंदूमध्ये यायला हवा. कारण यश हे कोणाही एका व्यक्तीच्या प्रयत्नाने मिळत नाही. ते मिळविण्यासाठी खूप लोक मदत करतात आणि विशेषत: आई वडील. त्यांना वृद्धाश्रमाची जागा दाखवू नका. गाव पातळीवर त्यांना एकटे सोडून नका. सोबत ठेवू शकत नसलास त्यांना आर्थिक मदत तरी द्या ..!!!

                  कारण ज्या वयात आपल्याला त्यांनी आधार दिलेला असतो ज्या वयात आपल्यामध्ये आत्मविश्वास नसतो.या जगाची ओळख नसते आणि कदाचित ती ओळखच आपल्या या कदाचित यशाची पायरी असते.❤
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की नोंदवा.

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...