savitalote2021@bolgger.com

Online Marathi Charoli Collectionऑनलाईन मराठी चारोळी संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Online Marathi Charoli Collectionऑनलाईन मराठी चारोळी संग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

"शब्दांच्या साक्षीने",ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह




*****   शब्दांच्या साक्षीने     
            मराठी चारोळी संग्रह ऑनलाईन 
                सविता तुकाराम लोटे  *****

        चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणतात मनातील भावन संवेदना मनातील विचार संवेदना मनातील विचार आजूबाजूची परिस्थिती त्यातून मनात आलेले विचार मनातील चलबिचल मनातील प्रश्न अशा कितीतरी गोष्टी कमीत कमी शब्दात मांडण्याचे कविता प्रकार म्हणजे चारोळी.

        कमी शब्दात पण प्रभावी शब्दरूपी संवेदना मनात घर करून भाव प्रकट करणारी एक प्रभावी माध्यम म्हणजे चारोळी संग्रह...!!!

      नेमक्या शब्दात मांडणे... लिखाण करण्याचा हा थोडासा प्रयत्न माझ्याकडून होत आहे.  
 
      सोशल मीडियाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे  काम जागतिक माहितीचे केंद्र म्हणजे गुगल या माध्यमातून वाचक मित्रमैत्रिणी पर्यंत हे माध्यम करीत आहे. आपल्यातील दुवा हा गुगल माहितीचे महाकेंद्र होय. 
 
            नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, धन्यवाद..!!!

        शब्दाचं साक्षीने हा चारोळी संग्रह माझ्या सुरुवातीच्या काळातील लिहिल्या गेलेली शब्दरचना आहे. त्यावेळी फक्त शब्द मला त्यांच्या स्वतः होती गुंफून घेत होते.... जसा रोज सूर्य आकाशात उगवता आणि मावळतीचे दर्शन घेऊन येतो. तसे शब्द मला कवितेच्या एका नवीन विश्वात घेऊन जात होता आणि आजही घेऊन जाते.

       प्रेमाने फुलतो शब्द... शब्द प्रेमाने फुलतात मला..... माझ्या भावनेला आणि माझ्या संवेदनाला..!!! शब्दांच्या साक्षीने मी लिहिते ते शब्द मनाला बळ देतात. मनातील त्रासदायक भावना कुठेही प्रगट करता येत नाही त्या शब्दांच्या साक्षीने कोऱ्या कागदावर सहज उतरवता येतात. मिरवते मी ......त्यांच्यासोबत माझ्या माझ्यातील शब्दांसोबत. 

         ऑनलाईन शब्दांच्या साक्षीने हा मराठी चारोळी संग्रह गुगलच्या साक्षीने ब्लॉग द्वारे प्रकाशित करीत आहे. 

        काही सूचना असल्यास किंवा काही चुका असल्यास नक्की कळवा आणि लाईक करायला विसरु नका प्रत्येक व्यक्ती शब्दाच्या साक्षीने जगत असतो विचार करीत असतं आपल्या संवेदना मांडीत असतो तसाच हा माझा छोटासा प्रयत्न चारोळी या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आहे.

          साधी सरळ शब्द रचना असलेला शब्दांच्या साक्षीने ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह..!!

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- शब्दांच्या साक्षीने

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!


जीवनाचे सूरताल निर्माण 
करताना नव नवीन सुरता 
मिळत गेले उमललेल्या वळणावर 
विझुन गेले ताल सुरच

2
जीवनातील क्षणांना सोबत 
घेऊन जाताना अडथळे येती 
पण क्षण आपलेच असती 
अडथळ्यांना मागे  ठेवीत


3
मन बेधुंद आणि बेधुंद 
माझ्या तुझ्या प्रेम विरहासारखे 
क्षणात इथे आणि क्षणात 
तिथे... बेधुंद !!


4
झाडांची पाने आपलीच आहे 
पहिला सुगंध आपलाच आहे 
वेलीवरले फुल ही आपलेच आहे 
आयुष्याचे सुखदुःख आपलेच आहे


5
पाणवलेल्या नयनांनी तुझे पाहणे 
माझे हळवे होणारे मन 
आणि गुंफली जाणारे नाते 
आसवांच्या विरहाचे..!!


6
सोडून देतानी वाटतं 
कसे सोडावे तुला 
अन त्याच क्षणी हे
सुद्धा सोडून द्यावे

7
शब्द स्वरांच्या साखळीमध्ये 
मन हळवे झुलत आहे 
निशिगंधाच्या सुगंधीत  सुगंधाबरोबर 
दरवळणारे माझे वेडे मन


8
झरे संपतात तेव्हा 
हृदयातील स्वप्न आठवणीही संपतात 
आसांवाबरोबर न येती 
आठवणींचे संपणारे झरे..!!


9
विचारांच्या भ्रमात आपण 
विसरत जात असतो 
आपलेच हरवलेले क्षण अन 
गुंफलेल्या सुखद क्षण सुद्धा


10
वेदनामय आयुष्य आले असले 
तरी त्यातून एकटेपणा निर्माण 
करू नये केल्यास तर 
भावनामय क्षण निघून जातात

11
आपलीच शीतलता आपल्याला 
मनशक्ती देत असते जगण्याची 
सहन केलेल्या वेदनांना ऊब 
देत असते आपलीच शीतलता

12 

न बोलताच तू सर्वकाही 
बोलून गेला स्वतःच्या नयनांनी 
तुझ्यात असलेल्या हळुवार प्रेमाने 
अन माझं तुझं नात

13

यशस्वी जीवनाचा मार्ग निर्माण 
करताना नेहमी स्वतःला सांगावे 
यशस्वीतेसाठी आपलेपण सोडू नये 
आणि लहानपणापासून मिळलेले संस्कार


14
निराशेची लाट सर्वस्व घेऊन 
जात असते आपले आणि
देऊन जाते अंधारलेली वाट
दिशाहिन ध्येय लाट..!


15

मनातील अज्ञान उभे राहू
देत नसते कधीच प्रकाशाची
वाट म्हणून मनातील अज्ञानाला
स्वतःच्या ज्ञानाने दूर करावे नेहमीच

16
माझ्या नयनी आसवे असली 
तरी सुखाचे आहे प्रेमाने 
हळुवारपणे जपलेला आपल्या नात्यांची  
आज कडुत्व असले तरी

17
तू तर माझे जीवन 
होती दुनिया होती 
एका चुकीने निर्णयाने मनातील 
नाहीसे झाले जीवन दुनिया

18
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 
सुख दुखांचे अश्रू येत 
असतात आणि सुख दुखांचे 
समाधानाचे रस्तेही त्याच वळणावर

19
ओल्या सुगंधामध्ये जीवनाचे 
सत्य हळुवारपणे उमलंत असते 
जणू थरथरत्या हातांनी निर्माण 
केलेले आयुष्याची सुरुवातच जणू

20
वय वाढत जात असते 
येणारे अनुभव वाढत असते 
सुख - असुखाचे नियम वाढत असते 
तसेच प्रेमही वाढत जाते

21
सगळ्यांना वाटत असते 
आपल्यात आनंद प्रेम आहे 
पण विसरतो.. 
इतरांना द्यायचे असते तेव्हाच

22
गुलाब कितीही टवटवीत फुलला 
तरी काहीच कामाचा नसतो 
हृदयात प्रेमच फुलले नाही 
तर इतरांबद्दल..!!

23
शब्दांच्या जादूने जग जिंकू 
शकतो आणि त्याच्या जादूने सर्वस्व 
गमावू शकतो शब्द 
चुकीच्या अर्थानी वापरले तर

24 
वा-याच्या  वाहत्या दिशेबरोबर स्वतः ही 
वाहत रहावे त्याच दिशेने 
पण सुखाने गाणं म्हणत 
आणि असणाऱ्या संकटाला घेऊन

25
हदय कुठेही असले तरी 
हृदयात प्रेम मात्र तुझे 
आहे रेशीमगाठीचे धागे  
हृदयाच्या खोल तंरागत

26
अंधारलेल्या आयुष्याला तुम्ही 
प्रकाशाची लखलख प्रकाशवाट 
निर्माण करून दिली आणि 
मनमोकळ्या आनंदी असलेला स्वभावाने

27
आरशासमोर उभे राहताना आपले 
प्रतिबिंब खरेच असते त्यावर 
अविश्वास करू नये कधीच 
प्रतिबिंब खोटे बोलत नसते 

28 
इच्छांचा चिखलात आयुष्याचे 
सोनेरी क्षण दुःखमय करू 
नये इच्छांना चिखलातून 
काढावे स्वइच्छेने आणि हिमंतीने

29 
जीवन जगताना आयुष्याच्या 
खुणा बदलल्या तरी त्यासकट 
दुःखाला चैतन्यमय करावे 
आयुष्याच्या खडतर प्रवासात

30
यशाचे शिखर गाठण्याची 
धडपड चालू असतांना 
अचानक यश चालून आले 
तर धडपड विसरू नये

31
पावसाने दिली सोबत 
पिक आले भरभरून 
पण अकाली गारपिटीचा 
लागला जिवाला घोर 

32
करायची नसते आत्महत्या 
जिद्दीने जावे लागते समोर 
येणाऱ्या संकटांना जीवनात 
यशाचे शिखर गाठताना

33
जळणाऱ्या सरण्यापैक्षा 
हिंमतीचे सरण बरे 
पापण्यांच्या कडांवरील
आत्महत्याचे सरण नको

34
स्वतःच्या जीवापेक्षा काळजी 
कर त्या जीवाची तुझ्या... 
नंतर कोण असेल त्यांना 
मुखवटाच्या जगामध्ये !!!

35
पाण्याविना धरणी माझी 
पाण्याविना निळ्या निरभ्र आकाश 
उठता बसता का वाटते सारखे 
आत्महत्या करावी की नाही?

35
दुःखांचे घाव नाही 
सोसवत आता बाळा 
तरी जीवन राहणार आहे 
तुझ्या भविष्यासाठी!

36
वेगवान होत आहे भावना
आयुष्यातील सोपविलेली घावांमुळे 
डोळ्यांच्या कडेला आषाढांच आभाळ सुरकुत्यांचे स्वप्न चेहऱ्यात

37
अंधाराच्या पलीकडे नसते जग 
असे  मनी वाटत होते 
पण इच्छाशक्ती जागी झाली 
की अंधाराच्या पलीकडे असते जग

38

दगड मातीच्या भिंती 
उठतात माझ्या अंगावर 
छप्पर म्हणते मी आहे आणि 
क्षणात होताच नव्हतं होत ?!!

39
ओलीक्षार माती पायांना 
दिलासा देते मनाला 
प्रयत्नांसमोर कोणीही येत नसत 
परिस्थितीशी दोन हात करावे!!

40
डोळ्यांसमोर फक्त अंधार 
जेव्हा भावना मुक होतात 
आकाशातील चंद्र तारे 
साथ देत नसतात तेव्हा !!

41
दुःखांचे मूल्य करता करता 
अश्रूंना सांभाळता येत नाही 
उदासवाणे मन मात्र वादळात 
भटकत असते फक्त

42
घनघोर युद्ध आहे 
स्वतः च स्वतःशी 
भावनांना लपवीत प्याले 
विषाचे पीत आहे

43

धरती आभाळा आम्हाचे 
माय - बाप...
त्यांनी सोबत सोडली 
तर जायचे कुठे आम्ही?

44
काजवासारखे आयुष्य आम्हाचे 
क्षणात हातून निसटणारे 
तरीपण वादळामध्ये वटवृक्षाप्रमाणे 
उभा राहणार आहे..!!!!

45
हिरव्या मायसाठी 
जीवाचे केले रान 
तरी मायचा सोबतीसाठी 
चालू आहे दुबारा पेरणा..!!


46

अंधाराच्या पुरामध्ये 
बुडतो आहे मी 
हातात विषाचा प्याला घेऊन 
शोधते आहे भविष्य
 
47
का करावी आम्ही आत्महत्या? 
पैशासाठी कि न पिकणारा 
शेतजमिनीसाठी.... 
अंगावरील फाटक्या धोतंरायासाठी..!!!

48

पानगळती प्रमाणे आयुष्य 
वादळवा-याबरोबर उडत जाणार 
क्षणात शांत तर क्षणात अशांत 
आरशातील सत्य प्रतिबिंबासारखे


         ©️®️✍️Savita Tukaramji Lote
         शीर्षक :- ***शब्दांच्या साक्षीने ***
( Witnessing the words ", Online Marathi Charoli Collection..!!)


आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!


**** By witnessing the words
 Marathi Charoli Collection Online
 Savita Tukaram Lotte *****

 A four-line poem is called a charoli.

 Charoli collection is an effective medium to express feelings in a few words but with effective word-like sensations in the mind ... !!!
To put it in exact words ... I am making this little effort to write.

 Google, a global information hub, is reaching out to readers through social media.  The link between you is the Google Information Center.

 Don't forget to like and share.  If you have any suggestions, please let us know in the comment box, thank you .. !!!

 Witnessing the word, this charoli collection is a word composition written in my early days.  At that time, the only words I had were their own ... as the sun rises and sets in the sky every day.  Words like that took me to a new world of poetry and still do today.


Words bloom with love ... Words bloom with love for me ..... for my feelings and my feelings .. !!!  The words that I write with the testimony of words strengthen the mind.  Feelings of distress can be easily expressed on a blank piece of paper.  I walk with them ...... with my words in me.


This Marathi Charoli collection of online words is being published by Google's  Blog.

 Be sure to let me know if there are any suggestions or mistakes and don't forget to like.

 Online Marathi Charoli collection with simple word structure testimonials .. !!

 ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

         ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
        Title: - Witness the words

 Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share ... !!!

*************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...