savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २१ मे, २०२१

सर


         ------सर -----
अवेळी आजही आला
झाडा पानांना भिजून गेला 
माझ्या मनाला भिजून गेला 
वाटत, जावे आता 
सोबतीला... 
पायात बळ आलेच 
नाही 
अंगावर सर झेलण्याचे 
कोसळणारा पाऊस 
कोसळत राहिला झाडांवर 
जमिनीवर आणि सोबत न भिजता 
कडेला नयनांच्या 
अबोल शब्दांच्या सोबतीला 
सप्तसुरांच्या सरीचा 
बेधुंद संगीतामध्ये!

   ✍️🏻 सविता तुकाराम लोटे 

  //////////////////////////////////

कुणीतरी असावं

कोणीतरी असावं आपलं ऐकणारा 
शब्दाला शब्द न देता हो ग 
हसतच हात हातात घेऊन 
बोलू का काही, ऐकणार... 
माझं 
म्हणून समजून सांगणार 
अधिकारवाणीने ...
कुणीतरी असावं आपल 
ऐकणार !!!

        ✍️ सविता तुकाराम लोटे 
-------------------------------
 

चारोळी

पाऊस

----पाऊस ----

यंदाचा पाऊस 
नको वाटतो 
आठवणीच्या बाजारात 
भिजणे 
नको वाटते 
ओल्या ऋतूचा 
सुगंधही 
नको वाटतो 
मनात रेंगाळत राहती 
ओला स्पर्श
अबोल 
क्षणांचा... 
नको वाटतो 

   सविता तुकाराम लोटे ✍️
----------------------------------

----ओघळणारा दवबिंदू ---

-------ओघळणारा दवबिंदू ---------

गुणा - गोविंदाने चालू आहे सर्व 
तुझे... पण माझे अजूनही 
घुटमळलेल्या क्षणात कैद  
त्यात हरवली माझी वाट 
आणि तुझी मिळालेले 

प्रत्येक क्षण माझा तुझा 
तुझा माझा आता वेगळा 
न राहिलेल्या अनामिक कल्पनेसारखा 
एकटा अनंत नसलेल्या रेषेप्रमाणे 
दोन बिंदू एकत्र येतात 

एका रेषेने पण 
हरवले आहे सर्व आता 
असलेला अनामिक आठवणींमध्ये 
तुझ्या; 

क्षणाचाही हिशोब शून्यात 
विरहात दाटलेल्या💔 मनाच्या 
कोपऱ्यात रुसलेल्या स्वप्नात 
ओघळणारा दवबिंदूत

     ✍️  सविता तुकाराम लोटे --

----------------------------------

देहबोली

        देहबोली 

काही शब्द आपले असतात 
काही अर्थ त्याचे असतात 
दोघांच्याही भाषेला, एक 
वलय असते 
आप - आपल्या प्रेमाची 
प्रेमात असेच होत राहते 
कधी शब्द तर कधी भावना 
कमी पडतात दोघांना 
बोलून जाते फक्त 
..........देहबोली!

       ---  सविता तुकाराम लोटे ---

--------------------------------------------------------------------

-----यात्रा-----

-------यात्रा-------

दुःखाच्या आकाशात धावून धावून 
थकलेल्या जीवा... 
थोडा मागे पहा 

सापडेल वाट सुखाच्या धावपट्टीची  
गगन भरारी घेण्यासाठी 
फक्त चालत राहा 

सहनशीलतेच्या कसोटीवर 
वेगवान होऊन कधीकधी 
शांत संयमाने भरारी घे! 

आत्मविश्वासाने तोल सांभाळत 
पाय असू दे जमिनीवर 
कमळासारखे चिखलात राहूनही 

बोलके हो मनसोक्त 
उडण्यासाठी सुखाच्या पायरीवर 
जीवन प्रवासाच्या यात्रेत!!

        सविता तुकाराम लोटे 
----------------------------------

सौंदर्य

सौंदर्याची कौतुक 
करता करता कळलेच 
नाही, शब्दात चंद्र चांदण्याची 
उपमा आली कधी 

नयनातील अश्रू तुझ्या 
कोणत्याही उपमा शिवाय 
हृदयाला घाव करीत राहिले 
एकत्र गुंफीत राहिले 

सौंदर्याच्या या भाषेला निरर्थक 
घायाळ होऊन!!!

  //////// सविता तुकाराम लोटे /////

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...