*** त्याचे आगमन झाले ***❤
दवबिंदूंसोबत सकाळ उगवली आणि दवबिंदूचे पाणी होऊन मावळतीचे क्षण आले. आजचा दिवस हा असाच बाहेर पावसाच्या पावसाचे आगमन अवकाळी का होईना पण तो आला. त्याची प्रतीक्षा नव्हती.,तरीही तो आला. आपल्यासोबत खूप काही घेऊन गेल. सोबत गुलाबी थंडीची चाहूल देऊन आपल्यासोबत राहून गेला...💕 पण तो आला दवबिंदू सोबत सकाळी प्राजक्ता फुलली की नाही माहित नाही. कारण अंगणाचे दर्शन झालेच नाही. सूर्य उगवला की नाही माहित नाही, कारण सूर्याचे हे दर्शन झाले नाही. पण एक मात्र झाले की गरमागरम चहा सोबत भज्यांचा आस्वाद झाला. दिवाळीचा नुकता संपलेला फराळ आणि पावसाचे आगमन तेही अवकाळी पण तो का आला ????शेतातले पीक घेऊन जाण्यासाठी उन्हाळ्यात पावसाची कमतरता न भासावी म्हणून की आजूबाजूची परिस्थितीच इतकी भीषण होत आहे त्यावर पांघरून घालण्यासाठी की परत या मातीला हिरवीगार शालू चा दिवाळी गिफ्ट देण्यासाठी!!! काहीही असेल पण तो आला.... वातावरण गुलाबी थंडीत परिवर्तित करून गेला आणि मनात एका प्रश्नाचे उत्तर देऊन गेला ,"काही क्षण येतात - जातात तसेच काही व्यक्ती येतात जातात ....काही वेळ येते - जाते काही विचार येतात - जातात हे क्षण क्षणभंगुर आहे. या क्षणांना जितके कमी मनामध्ये साठविता येईल तितके कमी साठवा कारण आयुष्य हे घड्याळाच्या त्या काट्यांसारखे आहे ते फक्त फिरत असतात फक्त फिरत असतात.!!💕"
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .