"मी शिकतो आहे", ही कविता अस्मिता जागविणारी कविता आहे. मोकळी संवेदना आणि मोकळा भावना सांगणारी आहे. इथे कुठेही विद्रोह सांगत नाही तर विद्रोहावर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तेवढा संयम इथे ठेवावा लागत आहे. दलित साहित्य /विद्रोही साहित्याचा प्रवाह हा फक्त विद्रोहासाठी नाही तर इथल्या समाज व्यवस्थेने जे कुंपण परिस्थितीनुसार घातलेल्या आहे त्या कुंपणात राहून त्याला तोडून तो आपला भविष्य घडवणार आहे ही सांगणारे कविता...!!
मी शिकतो आहे तरी या ढोंगी स्वार्थी प्रवृत्तीच्या समाजव्यवस्थेविरुद्ध आत्मसन्मानाने भविष्याचे गणित आणि त्यासाठी बळ ही शाळा देत आहे.
शांत संयमी समजूतदार जाणीव आक्रोश शांत विद्रोह या कवितेत दिसतो.
कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन करून योग्य तो न्याय दिला जाईल...!!
सर्व काही पुसले गेले असले तरी
सुंदर खडूंच्या अक्षरांची आता
शाळा पडकी झाली आहे
माझ्या स्वप्नांची प्रत्येक वाट तिथूनच निघणारी आता शाळा हरवली आहे
भली मोठी इमारत आता तुंबली आहे
काय सांगू, माझ्या शाळेची कहाणी
माझ्या शाळेची छत हरवली आहे
सूर्य तळपतो त्या छतातून वारे वाहतात ओरडून ओरडून तरी मी जाते शाळेत
कारण ती शाळा समानता पेरते
आयुष्याच्या चढउताराची माहिती देते
सांगते समानतेचे गणित पाखरांच्या थव्यांना बंधन नसते शाळेत
छाटलेल्या पंखांना तुमचे अधिकार
थरथरणाऱ्या ओठांना आत्मसन्मान देते
मोडकी छत सांगते महागाईच्या सरणावर चालत असलेला भारत बाजी मारलेल्या सर्व
त्या लाटांना गिळंकूत करीत आहे
जहाल प्रस्थापित समाजव्यवस्था
मला जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा मोकळ्या करून गेलेल्या
ती पेटून उठविते प्रबोधनासाठी चालण्यासाठी विकल्या गेलेल्या त्या प्रत्येक बाप माणसासाठी तिथे लढा हा बंदिस्त झाला आहे
तिथे लढा हा थकलेला आहे
ग्रहांची दिशा वारांची हिंमत
सावलीचा विटाळ खेळ याच खेळासाठी बाबासाहेब वर्गाबाहेर शिकला
आणि मी ....??छत नसलेल्या मोडक्या
शाळेत तरी पण मी शिकतो आहे...!!
उगवत्या सूर्या सोबत मला पेटविते
रोज स्वप्नांची चिंद्या होताना भक्तांची
पेटून उठण्यासाठी आत्मसन्मान देते
वास्तविक विचारावर चालण्याचे बळ देते
या अती हुशार समाजव्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी हातात बळ देते
क्रांतीचे रोपटे लावून तुटलेल्या मनाला
पालवी देते ती मोडकी तोडकी असली तरी
ती माझी असते, व्यवस्थेविरुद्ध प्रस्थापित समाजाविरुद्ध शिक्षणाचे भ्रष्टाचारीकरण करणाऱ्या विरुद्ध मी एकही शब्द काढत नाही कारण मला माहित आहे
ती छत फक्त गरिबांच्या वाटेला आली आहे फाटक्या तुटक्या गणवेशातला हा विद्यार्थी
बाजी मारणार आहे भविष्यात
तो वर्तमान जगतोया विषमतेत
तो सांगणार आहे या समाजाला
या समाजव्यवस्थेच्या त्या प्रत्येक काळोखाला कोमेजलेल्या वाऱ्याला आणि दगडाची मूर्ती
.......ठेवलेल्या त्या सोनेरी व्यवस्थेला
मी हरणार नाही मावळणार नाही
शब्द विद्रोहाचे पेरणार नाही
भेटते रोजच पावसात भिजलेली शाळा
थंडीत कुडकुडणारी शाळा
उन्हात माझ्या स्वप्नांना अंकुर देणारी शाळा मोडक्या - तोडक्या छताची माझी शाळा
माझा अभिमान आहे
अजूनही अस्पृश्यतेच्या त्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढत आहे
जिथे मला सुविधा नाही
मी वंचित आहे अजूनही
पेटता निवडुंगावर
गोठलेल्या दुःखासोबत
समानतेच्या वाऱ्याचा पाऊस
त्या छतातून टपकत आहे
कारण मी शिकतो आहे
वर्गात बसून...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹