फक्त चालत राहायचे
आपले घरटे सोडून
आपल्या जीवनाचा
श्वास वाचण्यासाठी
मानव निर्मित तुफानी
वादळाबरोबर संघर्ष
करीत...
येईल आपले घर
मायेचे !
पावलांना
सवय नसली तरी
थांबणे नाही
आता....
पुन्हा
मुक्त उडण्यासाठी
आनंदाने!
कदाचित
अंगात शक्ती नसेल
तरी
नवीन आलेल्या
संकटाला सामोर जाऊ
पुन्हा... घरटे बांधू
नवीन उमेदीने
मौन होऊन जाऊ
आपले घरटे सोडून
परतीच्या सुखद
आठवणींच्या स्वप्नहिंदोळ्यावर
फक्त चालत राहायचे!!!
सविता तुकाराम लोटे
----------------------------------