savitalote2021@bolgger.com

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

.कविता माझी....

.....कविता माझी....

 कविता माझी 
माझ्या शब्दांची 
अहंकाराच्या सावलीला 
अंधकारात सोडून देणारी  

कविता माझी 
माझ्या हुंदक्यांशी
घालमेल सततची संवादाशी
अगदी माझ्याच उजेडाची 
अलीकडील पलीकडील  

कविता माझी 
भेटत राहते 
आठवणींच्या झुल्यावर 
अगदी आनंदी प्रेमळ 
हसरी दुःखी व्याकुळ
झालेले माझ्याच 
संवादाशी 

कविता माझी 
माझी कविता 
कविता माझ्याशी 
माझ्याच विश्वशांतीची...!!! 
   
       ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** कविता माझी....  *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

......हल्ली एकटाच प्रवास ....

      जीवनात आपल्याला सर्व काही मिळते पण त्यासोबत एक शांतता सुद्धा आयुष्यात येते आणि ती शांतता आपल्याला आपल्यापासूनच दूर घेऊन जाते.  त्यावेळी एकही नातं आपले म्हणावे असे नसते.  त्या भावविश्वातून कवितेचा आशय घेतलेला आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

......हल्ली एकटाच प्रवास ....
          ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

हल्ली एकटाच प्रवास 
चालू आहे इथे
आता कोणीच नाही 
एक अलौकिक स्मशान  
शांतता.... 
शब्दांसोबत 
संवादसोबत 
व्याकूळ भावानेसोबत 
आनंदासोबत  
आपलेपणासोबत....

हल्ली प्रवास एकटीचाच 
होत आहे जगण्याचा 
प्रवासासोबत, सोबत मात्र 
स्मशान शांतता घेऊन 
कदाचीत 
आता मी एकटीच 
वाहत्या पाण्याबरोबर 
साचलेल्या पाण्याबरोबर 

हल्ली प्रवास एकटीचाच 
आपलेपणाच्या 
शांततेबरोबर 
दुःखी पण 
हळवेपणाने....!!!!



©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **  .....हल्ली एकटाच प्रवास ....****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=====!!!!!!!!===========!!!!!================!!!!!!!=========!!!!!!!!!!!!!!!==

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...