संध्याकाळच्या कातरवेळी मधून रात्र हळूहळू उलगडत असते. जन्मापासून प्रत्येक व्यक्ती ही रात्र अनुभवत असते. त्या अनुभवातून आपले नाते साखळीसारखे गुंफत जात असते... जणू सुखदुःखांच्या नात्यात बरोबर आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने आपल्याला भेटत असली तरी सावली प्रमाणे सोबत राहते. आपण जगत असतो; आपल्या आयुष्यातील जाळ्यामध्ये...
सुकलेल्या फुलातून जसा सुगंध शोधता येत नाही पण हळुवार येणाऱ्या रात्र मधून स्मृतीची आठवणी मात्र सुगंधित होऊन जाते. रात्र जगायला शिकविते सूर्य ती तिच्या पलीकडे जाताना सांगत असतो. आयुष्याचे स्वप्नक्षितीचे... सोनेरी संध्याकाळ रात्री तू उलगडत जाते. कधी कधी रात्र आपला अनोळखी सुद्धा करून जाते. तेव्हा आपण आपल्याला शोधत असतो. काळ्याभोर रात्रीमध्ये असंख्य कल्पना जन्माला येतात; तेव्हा पण साथ देत असते. रात्र रात्रीच्या पावलांनी हळूहळू काळ्याभोर आभाळात उठलेल्या कल्पनांच्या वादळे मध्ये स्वतः गुंफत जात असते.
रात्र होतांना निळा आभाळाला सोनेरी गडद तांबूस रंग सोडून जात असतो... झाडावरील पक्षांचा किलबिलाट सुद्धा कमी होत जाते. क्षणाक्षणाला मन सांगत असते ही कातर वेळची संध्याकाळ काहीतरी घेऊन जात आहे. अंधाऱ्या सावल्या बरोबर आपली स्वतःची ही सावली आपल्यामध्ये येऊन जाते. कणाकणाला आपली असते अशा जरी दिवसभर भास होत असला तरी मात्र कातरवेळची रात्र पायातील काटे आपल्याला काढण्यासाठी बळ देत असते; रात्र....
पायातील काटे काढताना रात्र बळ देत असली तरी मनाला तयार करावे लागते.. एक एक किरण गोळा करीत जगलेल्या आपल्या आयुष्यातील वादळ वा-यांना... वादळ वाऱ्याबरोबर उध्वस्त केलेल्या स्वप्नांना कधी ती रात्र आपल्या स्वप्नाची साक्षी होती .आवाज न करता येऊन गेलेली चुकून भरलेल्या आयुष्यात स्वप्न घायाळ करीत असतात. जुनं बदलत चाललेले असते पण रात्र घायाळ मनाला ओलेचिंब करीत असते भिजलेला प्रवास चालू असतो तरीही....
रात्रीचा काळाभोर काळोखात रानावनात जाताना अशी पायवाट चांदणी चंद्राच्या साक्षीने शोधावे लागते तसे मन सुद्धा शोधत असते. झुलणाऱ्या फांदीला भिजलेल्या प्रवाशांना नवीन संकेत देण्याचा प्रयत्न करीत रात्रीच्या अंधारामध्ये फुलत असले तरी दिवस उजाडेपर्यंत मनातील कुठल्याही कोपऱ्यात नामशेष होत असते. वाहत्या पाण्यावर झाडांच्या सावला नुसत्या थरथरत राहतात... पण पाणी जात असते. आपल्या शेवटच्या प्रवासाला. वाहत्या पाण्यातील तो तर खळखळाट मात्र जागे ठेवत असते रानाला. रानातील सजीव निर्जीव वस्तूंना त्यांनाही सोबत लागते.
अंधारमय रात्री वाहणाऱ्या पानाची स्वच्छ निर्मळ पाण्याच्या पण त्यांच्यासोबत सुद्धा असते. रात्र आपल्या जगासाठी रात्र बळ देत निर्मळ पाण्याच्या गोडवा बरोबर सुरक्षित सुद्धा तेथे हीच रात्र!
थंडगार वाऱ्याबरोबर उमलत असतात रंगबिरंगी फुले.त्यांच्या सुहासाने सुगंधाने धरणी सप्तसुहासीत होते. जीवनातील प्रत्येक रंग 'रात्र ', मनसोक्त मनमोकळेपणाने जगत असले तरी विचारांचा धो धो वाहत जातो कुठेतरी आणि आपल्यामध्ये घेउन जाते. वाटेतील दगड मध्ये येणारे अडथळे तशी रात्र घेऊन येते. भावनांना
भावनेबरोबर आपले मन मोकळे नाते निर्माण करते. जुन्या नवीन आठवणींना साता जन्माची नाते.
जीवनातील विविध नात्यांनी रंगून रात्र आपल्या जीवनाला अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या मनाचा भावविश्व मध्ये रांगते रात्र मन शांत असले तर रात्र हवीहवीशी वाटते .दिवसातील दुभंगलेले शांततेमध्ये एकत्रित गुंफीली जातात.
रात्र अंधारमय असली तरी नवीन दिशेला किरणमय ठरत असते .लहानपणी तील रात्र आठवण मनाला इतकी हवीहवीशी वाटते पण ती रात्र पुन्हा कधी न भेटण्यासाठी असते .अशा कितीतरी रात्री मनातील कोपऱ्यांमध्ये साठवून ठेवीत असतो. आपण आयुष्यातील पायलट म्हातारी होत असतांना बळ देत असते जीवनातील शेवटचा प्रवास सोपे करण्यासाठी जगण्यासाठी !
'रात्र,' तुझ्या माझ्या मनातील भावना निशब्द सांगून जात असते. शब्दावाचुन मनाला घोर लावून जाते; मात्र त्यावेळी वैरीण वाटतं जीवनातील सुखदुःखाची गोळाबेरीज मांडताना.
संपू नये असे सारखे वाटत असले तरी हातातील वाळूसारखी निघून जाते ' ती' ,चांदण्याच्या प्रकाशात.
निसर्ग ऋतूप्रमाणे जीवनाच्या वाटेवर भेटत असतात. असंख्य रात्री. प्रत्येक रात्र वेगवेगळे, नवीन भावविश्वात येणारी ,नवीन कल्पनांना आकार ,चित्रित करणारी ,अंधारमय वाटेवर दिवसाचे स्वप्न दाखविणारी ...
आपण झोपेत असलो तरी ती जगत असते चांदण्याच्या उजाडलेला स्वप्न किनाऱ्या बरोबर धुंद होऊन अशा असंख्य रात्री असंख्य कल्पनांना अंधारमय वेळी आकार देत ... दिवसाचे आशामय स्वप्न देऊन.आशामय स्वप्न जगत असते .या रात्री मुळे दिवस मावळता हळूहळू सांज गारवा मनाला हवा हवा वाटतो मनी येऊन जाते त्या गार वारा आभाळातून खाली यावा आणि सोनेरी किरणाला मिठी मारावी.
रात्र येत राहाते. नात्यांना नवीन अर्थ देण्यासाठी... आयुष्यातील वेगवेगळ्या रूपांना सुगंधित करण्यासाठी विणलेल्या स्वप्न जाळ्यां मधील कोडे सोडविण्यासाठी. सुगंधित फुलातील सुगंध फुलविण्यासाठी उत्कटपणे आपल्याला अनुभवायला मिळते ,एक रात्र..!
सविता तुकाराम लोटे
----------------------------------