पाठीवर हात ठेवणारा ,"मी आहे ना" हा शब्द आता हरवलेला आहे हा शब्द सगळ्यात जास्त आत्मविश्वास निर्माण करतो ती व्यक्ती म्हणजे "बाबा ",आणि तोच हरवला. हे दुःख कोणत्याही शब्दात मांडू शकत नाही पण ज्या आत्मविश्वासाने जगण्याचा प्रवासात 'मी आहे', ना हा शब्द सोबत चालत आहे त्याच भावविश्वातून हे काही शब्द.....!!!
*** मी आहे ना ***
मी आहे ना म्हणणारे शब्द
बोलणाऱ्या व्यक्तीच्या आता
आठवणीच मागे आहे
त्यांनी हाताला धरून चालण्याच्या वयात
ते हातच हरवून गेले
राहिले फक्त ते शब्द आत्मविश्वासाचे
प्रवास संपलेल्या नात्यांचे
मी आहे ना हा शब्द आता
इतिहास जमा झाला आहे
तरीही त्या शब्दाची ताकद अजूनही
संस्कारात आहे......
मी आहे ना हरवला असला तरी
सोबत मात्र आहे
त्याच जिद्दीने त्याच आत्मविश्वासाने
त्याच विश्वासने
मलाही कुणाला तरी म्हणावे लागेल
हे कधी ध्यानीमनी ही नसताना
तो शब्द माझ्याही तोंडून निघतो
कधीतरी
मी आहे ना ....
त्याच आत्मविश्वासाने
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
=============================
The hand on the back "I'm not" is now lost The word that inspires the most confidence is "Dad", and he is the one who is lost. This pain cannot be expressed in any words but these are some words from the spirit with which the word 'I am' is walking with confidence in the journey of living.....!!!
*** am I ***
Words that say I am not
Now of the person speaking
The memory is behind
At the age of walking they hold hands
They lost their hands
Only those words of confidence remained
Of relationships that have ended the journey
I am not the word now
History has accumulated
Yet that word still has power
It's in the tradition...
Although I am not lost
But with
With the same stubbornness and the same confidence
By the same faith
I have to tell someone too
When this is not meditation
That word comes out of my mouth too
sometime
Am I...
With the same confidence
✍️©️®️Savita Suryakanta Tukaram lote
The blog is my home of words. I express my feelings in such a way. Welcome to this God threshold of Shabda Swaras. If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
============================