savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता स्त्री कविता सकारात्मक कविताप्रेम कविताविशेष कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता स्त्री कविता सकारात्मक कविताप्रेम कविताविशेष कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

.कविता माझी....

.....कविता माझी....

 कविता माझी 
माझ्या शब्दांची 
अहंकाराच्या सावलीला 
अंधकारात सोडून देणारी  

कविता माझी 
माझ्या हुंदक्यांशी
घालमेल सततची संवादाशी
अगदी माझ्याच उजेडाची 
अलीकडील पलीकडील  

कविता माझी 
भेटत राहते 
आठवणींच्या झुल्यावर 
अगदी आनंदी प्रेमळ 
हसरी दुःखी व्याकुळ
झालेले माझ्याच 
संवादाशी 

कविता माझी 
माझी कविता 
कविता माझ्याशी 
माझ्याच विश्वशांतीची...!!! 
   
       ✍️©️®️सविता तुकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** कविता माझी....  *****

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...