savitalote2021@bolgger.com

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

आठवते मला

.
//// आठवते मला ////

आठवते मला 
तुझे हसणे 
माझे हसणे 
कातरवेळी झालेली 
ती भेट 
आठवते मला 
निसर्गरम्य वातावरणामध्ये 
घालविलेले मनसोक्त 
क्षण 
आठवते मला 
ढगाळलेल्या मावळतीच्या 
सावलीसोबत 
विरह मतभेदाचे 
आठवते मला 
माझ्या तुझ्यातील रेशीमबंध 
आठवणींसोबत
            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***   आठवते मला ***

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

////.....आठवते मला...////

                प्रेमाची व्याख्या करता येत नाही की तिला कोणत्याही शब्दात बांधूनी हि ठेवता येत नाही प्रेमात जगायला शिकत असतो जपायला शिकत असतो पण कधीकधी ते अंदाज चुकीचे ठरतात आणि सामोरे ते एक सत्य विरहाची या भावनेतून लिहिली गेलेली ही स्वरचित लिखित रचना आहे .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

** आठवते मला...**

आठवते मला 
क्षणाक्षणाला 
वेळी-अवेळी आलेली 
तुझी आठवण 

आठवते मला 
अजूनही लपून छपून ते भेटणे 
तुझा हात माझ्या हातात 
तुझ्याही नकळत घेणे 

आठवते मला ...
तुझे ते हसणे  
माझ्या गालावरील लाली 
कोंडलेल्या मन भावनेशी 
संघर्ष करताना स्वतःला 
दूर करीत हसणे

आठवते मला ...
तुझ्या मिठीत न येता 
मिठीत असल्याचे भास 
गुलमोहरासारखे सदाफुलीसारखे 
टवटवीत असणे 
तुझे ते निखळ हसणे 

आठवते मला 
तुझ्या आठवणीत 
रातराणीसारखी सुगंधित फुलणे 
जसेच्या तसे तुझ्या शब्दांवर 
प्रेम करणे 
नयनात प्रेमअश्रू आणि तुझ्या सोबत 
असलेला क्षणांचे बांधलेले 
सुखाचे आलेख 

आठवते मला  
अजूनही नवीन काही लिहिण्यासाठी 
तू सांगत असायचा  
बेभान होऊन ऐकत असायचे 
ते शब्द... आत्मविश्वास होते  
निखळ प्रेमाचे
माझे -तुझे प्रेम सकाळच्या 
रम्य सुर्योदयासारखे  

आठवते मला...
पावलोपावली तुझ्या शब्दांच्या 
शब्दसाखळी सोबत मनसोक्त 
रमताना ..अंधार दाटून येतो 
ढगाळलेल्या वातावरणासारखा  
प्रत्येक स्तरावर आठवणींच्या 
उत्तर शोधत असते देणा-घेण्याचे
तुझ्या माझ्या प्रेमातील दुराव्याचे
आठवते मला...

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे 


©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** आठवते मला...****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!!


*************************************

प्रयत्न

*** प्रयत्न ***

पुन्हा नवीन 
पहाट येण्यासाठी 
प्रयत्न सोडू नको 
उगाच डोळ्यात 
पाणी आले 
तरी 
वळून पाहू नको 
प्रयत्न सोडू नकोच 
जीवन प्रवासाचे..!!

       ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- **** प्रयत्न ****

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका!!! 

धमाल ऑलिंपिकची

*** धमाल ऑलिंपिकची ***

नजर रोखून पाहू 
आपल्या ध्येयांच्या 
कठोर अडचणींकडे... 
प्रवास आहे त्याच 
पावलांनावर!! 

सुवर्ण पदक जिंकण्याचे 
तिरंगा फडकविण्याचे 
स्वाभीमानाने खडतर प्रवासासाठी 
लढाई जिंकण्याची 
नजर रोखून !!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-***  धमाल ऑलिंपिकची **

             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!!

*************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...