savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता स्त्री कविता विद्रोही कविता vidrohi kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता स्त्री कविता विद्रोही कविता vidrohi kavita poem google लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १५ जून, २०२१

आत्मसन्मान

*****  आत्मसन्मान  *****

पायात अजूनही ताकत नाही 
या पुरुषी समाजव्यवस्थेला पायाखाली 
चिरडून टाकण्याची
मनात प्रश्न येतो खरंच आपण 
21 व्या शतकात  
प्रश्नालाही प्रश्न पडतो खरंच 
शून्यवत आहे का हे 
जग अजूनही त्याच समाजव्यवस्थेत? 
उत्तराची माळ गुंफत 
प्रश्नाच्या प्रश्नालाही उत्तर 
आहे ....!
बाबासाहेबांच्या संविधानाने 
दिली शक्ती, पायात... 
फुलांच्या शाळेने स्वाभिमान!! 
वेचीत आहो आम्ही स्वप्नाचेफुले 
अभिमानाने उच्चपदस्थ होऊनी...
सन्मानाची चाल चालती 
समाजव्यवस्थेच्या उंच झोका होऊनी 
हिरकणी कालची गुलामव्यवस्थेचे 
हिरकणी आजची...
मुक्त समाजव्यवस्थेची.... संविधानाने 
मानसन्मान उंचावती 
क्षणोक्षणी....
स्त्रीयांच्या आत्मसन्मानाची !!!


                      ✍️©️सविता तुकाराम लोटे 

©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- आत्मसन्मान
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you

----------------------------------


       





माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...