savitalote2021@bolgger.com

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

***दिवाळी प्रकाशज्योत अंधाराची **** Diwali Light of Darkness ***

***दिवाळी प्रकाशज्योत अंधाराची ***

       घराघरात दिव्यांची प्रकाश ज्योत अंधाराला उजेडात उजेड देण्यासाठी....  प्रत्येक घराच्या दारात लागते हा प्रकाश...!
        अमावस्येच्या अंधाराला भेदून प्रकाशाची चाहूल देऊन जातो; पण खरंच हा अंधार आपल्या सभोवतालीच असते...? वातावरणातच असते....? असे नाही.
      कधी कधी हा अंधार नकारात्मक विचारसरणी मध्ये सुध्दा असतो. कधी कधी हा अंधार नकारात्मक शब्दांमध्ये असतो. कधी कधी हा अंधार अहंकारामध्ये असतो. म्हणतात दसऱ्याला रावण दहन झाला आणि खऱ्या अर्थाने एक प्रकाशमययुग निर्माण झाले. सुरक्षितता हा मुद्दा घेतला तर रावण अनेक प्रकारचे आहे.
     आता ती आपल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. रावण कुणाला म्हणायचे..... की स्वतः स्वतःला म्हणायचे.
     असो, इवल्याशा पणतीच्या प्रकाशात आपण आपला अहंकार जाळून टाका कारण तो प्रकाश त्या अंधाराला प्रकाशमय करतो. तो अंधार नैसर्गिक रित्या नैसर्गिक परंपरा रूढी प्रथा परंपरेने आपल्या भोवताली निसर्ग रचनेनुसार येत असतो.💕💕💕💕
       तसेच काही अंधार आपल्याभोवती आपल्या परिस्थितीनुसार येत असते म्हणून या अंधाराच्या अंधाराला प्रकाशित करण्यासाठी सकारात्मक विचारांचा एक दिवा मनात सुद्धा लावा. कारण हा दिवा कधीही न विजणारा आणि कधीही अंधारात न नेणारा असेल.
          बाजारात दिव्यांची खरेदी करताना एक दिवा त्या मनासाठी सुद्धा खरेदी करा, जिथे प्रकाश निर्माण होईल. या दिवाळीला त्या प्रत्येक घरात दिवा उजळू द्या ....ज्या घरात अंधाराला कायमचा आसरा असतो.
       त्या घरालाही तुमच्या खरेदीने त्यांच्या दिवाळीला दिवाळी होऊ द्या. दिवाळीच्या फराळांसारखे आपल्या मनातील शब्दांना गोड तिखट खारट अशा चवींची सुंदर मेजवानी द्या.
......💕 माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💕......!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************
 

*** Diwali Light of Darkness ***

 The light of the lamps in the house to light the darkness into light.... This light comes at the door of every house...!
 Penetrates the darkness of Amavasya and gives a glimpse of light;  But really this darkness is all around us...?  Is it in the environment?  Not so.
 Sometimes this darkness is also in negative thinking.  Sometimes this darkness is in negative words.  Sometimes this darkness is in the ego.  It is said that on Dussehra, Ravana was burnt and a veritable era of light was created.  When it comes to security, there are many types of Ravana.
 Now it depends on your situation.  Ravana used to call someone..... or himself.
 However, let us burn our ego in the light of this panati because that light illuminates the darkness.  That darkness naturally comes around us according to the structure of nature.💕💕💕💕
        Also, some darkness comes around us according to our circumstances, so put a lamp of positive thoughts in your mind to illuminate the darkness of this darkness.  Because this lamp will never go out and will never lead to darkness.
 While shopping for lamps in the market, also buy a lamp for the mind, where the light will be created.  This Diwali, let the light shine in every house....where darkness is a permanent shelter.
 Let that house too make their Diwali a Diwali with your purchase.  Treat your heart's words like Diwali snacks to a beautiful feast of sweet, spicy and salty flavors.
 ......💕 Happy Diwali to all my friends💕......!!


©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

******************************************************************************
 
(Picture :-google )
******************************************************************************
 


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...