savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता प्रासंगिक कविता सामाजिक कविता marathi kavita poem mi ani mi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता प्रासंगिक कविता सामाजिक कविता marathi kavita poem mi ani mi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३१ मे, २०२१

******मोक्ष *****

****  मोक्ष ****

आयुष्य कोणत्याही आकाराचे 
असू द्या 
त्रिकोण चौकोन... 
आयुष्य जगा सकारात्मकतेने 
ताठमानेने स्वाभिमानाने 
नव्या पहाटेच्या सूर्याप्रमाणे 
तेजस्वी ....
मोक्षधामापर्यंत जाताना !

आयुष्य कोणताही आकाराचे 
असू द्या 
काटकोन चौरस वर्तुळ 
आयुष्य जगताना जगू द्या 
इतरांनाही सरळ मानेने  
स्वसंस्कारासोबत आदराने 
अप्पर शांती लाभू द्या
महानिर्वाणापर्यंत जाताना !

जगणे खूप सोपे आहे 
जगताना जगण्याची भाषा 
फक्त कठीण... 
केंद्रबिंदू असू द्या 
आपले सुक्ष्म विचारसुद्धा 
अंतिम सत्याचा सत्याकडे 
उत्तम कर्माचा हिशोबाकडे 
स्वतःच्या विचार संस्काराकडे 
आयुष्य कोणत्याही आकाराचे 
असू द्या      

काटकोन त्रिकोण चौकोन... 
वर्तुळ लघुकोन षटकोन...
अंतीम सत्य  
एकच मोक्ष!!!!
  

        ©️✍️सविता तुकाराम लोटे 




/////////********////////*******/////////


त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...