स्मृतीच्या त्या आठवणी
मनी असावी सदा
त्याला सतत जोड असावी
प्रेमळ दोन शब्दाची
आठवणींना उजाळा देण्यासाठी किती छान काव्यपंक्ती आहे आपल्या मनामध्ये आठवणीची जडणघडण परिपक्व होऊन बसलेली असते कुठे रिकामा वेळ मिळाला की सर्व काही डोळ्यासमोर येत राहते पावसाच्या सरी प्रमाणे!
ओलेचिंब करून जाते अलगदपणे मनाच्या आठवणींचा पिंजरा खुला होऊन जातो नकळत आपल्याही जाणिवा अपयशाच्या.
प्रेमात केव्हा आणि आणि कशी पडले तुझ्या विषय आकर्षण का निर्माण व्हावे माहित नाही तरी तुझ्याकडे झुकते माप सांभाळता आले नाही. तू आलास वादळी वारा प्रमाणे; जीवनात. ते मी स्वीकार केला नसला तरी आपल्यातील प्रेम निस्वार्थ करीत राहिल्या आणि अचानक का गेलास माहित नाही? एक प्रश्नचिन्ह देऊन गेलास.
मनाच्या विशाल सागरामध्ये आठवणीचे रूपात थेंब थेंब साठवून ठेवले. अचानक एका पत्राने उजळा दिला त्या मांडलेल्या तुझ्या व्यथा प्रेमाबद्दलची आस्था, अस्तित्वाची जाणीव. तरीपण तुला माफ करणार नाही, मला हवी आहे तुझ्या मनातील प्रेम प्रेरणा साथ व्हवी होती
जीवन वेली फुलविण्यासाठी. निघून गेलास वेदनेचा पाऊस देऊन.
माझ्या अस्तित्वासाठी माझ्या ध्येयासाठी प्रेमाला मनाच्या खिडकीमध्ये कुलूप लावून ठेवले व त्या कुलपाची किल्ली कुठेतरी हरवून आला न उघडण्यासाठी. मनातील शब्द मनात न ठेवता उघड केले पत्राद्वारे. पण इतकी हिंमतवान नाही. तुझ्या प्रेमळ शब्दाची एक आठवणही प्रफुल्लित करून जाते मनाला शब्दांना भावनेच्या हिंदोळ्यावर प्रफुल्लित होऊन.
माझ्या आठवणींवर हक्क आहे माझा तुझा नाही तू कितीही दूर राहिला तरी प्रेम तुझ्यावर कमी होणार नाही करीत आहे करीत राहणार आहे त्या आठवणींसोबत उजाळा देत
प्रेमात जगायचं असतं
प्रेमात सर्व काही गमवायचं असते
त्यात फक्त शब्दांची साथ असते
फुलांचा बहर असतो
तुझ्या माझ्या नात्यातील
रेशीम बंध असते
15.10.2003
सविता तुकाराम लोटे
----------------------------------