savitalote2021@bolgger.com

Marathi kavita सामाजिक कविता प्रासंगिक कविता सकारात्मक कविता प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi kavita सामाजिक कविता प्रासंगिक कविता सकारात्मक कविता प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ मे, २०२१

मुक्तपणे

--------मुक्तपणे --------
             
               ©️ Savita TUkaram Lote

पंख फुटले कि झाले 
गगन भरारी घेण्यासाठी  
आपल्याच स्वप्नाला 
भरारी घेण्यासाठी 

उंच उंच जाताना 
पावले जमिनीवर ठेवावी 
असे वाटत होते पण 
पंख फुटले होते ना 
उंबरा ओलांडतान!!

मायेची सावली 
बंधने वाटली 
आकाश खुणावत 
होते ना स्वप्नांचे 
अहंकाराचे 
पंख फुटले होते ना 
संचार करण्यासाठी 

स्वातंत्र्याची... 
आपलीच परिभाषा 
मुक्तपणाचे आपलेच गणित 
संगीत बेसूर सुर 
पंख फुटले होते ना 

आपल्याही 
पायाला हाताला तोंडाला 
डोळ्यातील स्वप्नांना 
वेड लागले होते ना ....
स्वकर्तुत्वाच्या अहंकाराचे 
पंख फुटले होते ना 
मुक्तपणे
सावलीच्या छायेमध्ये!

     ✍️ सविता तुकाराम लोटे ©️

_---------------------------------

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...