savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता निसर्ग कविता सामाजिक कविता संग्रह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता निसर्ग कविता सामाजिक कविता संग्रह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

** गुरफटलेली मी **

** गुरफटलेली मी **

गुरफटलेली मी 
अन्यायाने 
आता मात्र 
जागी झालेली 
कारण सोबतीला आहे 
फलकावरील तो रंग काळा(शिक्षण)... 
गात आहे कोकिळासारखे 
शब्दांचे सुरेलसुर घेऊन
 
गुरफटलेली मी 
बंधनाने 
आता मात्र 
स्वतंत्र मुक्त 
कोणत्याही रंगाची बांधिलकी 
नसलेली मनसोक्त 
फुलपाखरासारखी 
संचारकरीत.... 

गुरफटलेली मी 
अबोल होऊन 
आता मात्र बोलकी 
झालेली स्वतःच्या 
अन्यायाविरुद्ध आवाज 
उठविण्यासाठी 
आकाशात गरुड झेप 
घेत आहे 
स्वतःच्या स्वरक्षणासाठी..!!


              ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**** गुरफटलेली मी ****

          अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...


===========================

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...