savitalote2021@bolgger.com

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

*** कुणी ठरवावं ***

*** कुणी ठरवावं ***

कुणी ठरवावं 
हाती असलेला नियतीचा 
डावपुढच्या मिनिटाला कोणता 
असतो हे..!
कुणी ठरवावं 
त्याने तिने त्या नियतीने 
त्या मिनिटाने या साक्षी 
असलेल्या त्या प्रत्येक 
शब्दांनी... 
कुणी ठरवावं 
पायातील स्वप्नांची चाल 
चालताना ती सरळ मार्गाने 
व्हावी की आडमार्गाने करावी 
दगड धोंडे प्रत्येक मार्गावर 
तरी पण 
कुणी ठरवावं 
ती वाट... 
नियतीने साक्षी असलेल्या 
पायवाटेने..!! 
कुणी ठरवावं आपल्याच 
मनातील आपल्याच बद्दल 
असलेल्या भावनेला इतरांच्या 
शब्दांनी मांडलेली 
ती भावना (स्वार्थी )का?  
घ्यायची हे ही 
कुणी ठरवावं 
कुणी काहीही ठरवले असले 
तरी आपण ठरवायचे 
आपल्यासाठी काय योग्य ...!!

               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   कुणी ठरवावं 

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...