savitalote2021@bolgger.com

विदोही कविता सविता तुकाराम लोटे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विदोही कविता सविता तुकाराम लोटे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

मला ही लिहिता येते

मला ही लिहिता येते 
मला ही लिहिता येते र ला र स ला स
पण रस्त्याच्या लगत वसलेली वस्तीस पाहिले की कळते जगण्याची भीषण वास्तव संघर्ष आणि जगण्या अन्नासाठी ची तडफड 

मलाही लिहिता येते म ला म ग ला ग 
पण अंगावरची कपडे पाहिले फॅशन श्रीमंताची,कपडे म्हणायचे की चिंध्या... कपड्याच्या नावाखाली आणि रस्त्यावर फॅशनेबल फाटकी वस्त्रे 

मलाही लिहिता येते ट ला ट फ ला फ
पण इवल्याशा पायात बळ येईल का?शिक्षणाचे!  हसत-हसत जाईल का?
शाळा नावाच्या इमारतीमध्ये 
सावरेल का?आपले अंधारमय उघडे आयुष्य

मलाही लिहिता येते ध ला ध न ला न 
पण काय जगणं हे उघडावरले...गरिबीचे हसू की हसूच गरिबीचे श्रीमंतीचा शहरात लढायचे कुणाबरोबर आटलेल्या डोळ्यातील पाण्याबरोबर??

मलाही लिहिता येते ध ला ध छ ला छ 
पण थोपविता येणार का स्वच्छ भारताच्या नकाशात हरवलेले बालपण जगण्याची
आशा भिरकावून देणाऱ्या झोळीतील
अंधकार...

मलाही लिहिता येते ल ला ल श ला श 
पण त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल का 
भारतीय संविधान,मूलभूत हक्क समानतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार
संपेल का विश्वासातील आशावाद जगण्याच्या सरणावरील मरणयातना 
टिपेल का उंच भरारी यशाची 
                         जीवनाच्या लढाईत 
मला ही लिहिता येते स ला स,म ला म आणि बरच काही 
                       सविता तुकाराम लोटे

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...