निसर्गाने माणसाला व्यक्ती म्हणून एका कुटुंबामध्ये वास्तवाला दिले जाते. ते वास्तव म्हणजेच आपले घर असते.
घर विटा माती सिमेंट छप्पर भिंतीचे असले तरी त्या घराला घरपण त्या घरातील व्यक्ती देत असतात. हेच घरपण त्या वास्तूचा आत्मा असतो. या संदर्भातली वास्तू ही कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
**** वास्तू ****
चार भिंती म्हणजे वास्तू
वास्तूला अभिमान असतो
त्या चार भिंतींचा
तिथल्या माणसांचा आशीर्वाद असते
ती वास्तू
त्या माणसांची माणसाला माणूस
म्हणून जगण्यासाठी हिम्मत देणारी
जागा म्हणजे वास्तू
वास्तु मनाला आत्मविश्वास देणारी
खूप साऱ्या आठवणी
जतन करून ठेवणारी
कानाकोपरात माणसाचे
अस्तित्व जपून ठेवणारी
घरट्यातून पिल्लू उडून गेले तरी
परतीची सर्वात जास्त वाट
बघणारी वास्तूच असते
अंगणातल्या हिरवळीला
शोभा असते
वास्तूचे मनमोकळ मनमुरात
बसून माणसांचे
वास्तू अनाथ बनवत नाही
कुणालाही त्या चार भिंतीच्या
आत स्वतःला मायेची उब
देणारी वास्तूच असते...!!💕
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
******************************************************************************