savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता विरह कविता mi ani mi savitatukamajilote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता विरह कविता mi ani mi savitatukamajilote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ मे, २०२१

प्रीत

------प्रीत -----
प्रीत माझी तुझी 
काही वेगळीच 
जीवनात फुललेली
आणि उजळलेली
प्रीत माझी तुझी 
हसऱ्या एकत्र क्षणांची 
न संपणारा शब्द साखळींची 
भरकटलेल्या स्वप्नांची
प्रीत माझी तुझी 
अबोल शब्द ओठांचे
मनमोकळा हदयाची 
भाषा.... आयुष्याची 
प्रीत माझी तुझी 
वचनबध्द मर्यादेची 
बघू जमतंय का? बोलण्याची 
आणि हळूच 
तुझ्या मिठीत शिरण्याची
प्रीत माझी तुझी
भिजलेल्या धूंद प्रेमाची 
आस देणाऱ्या जगण्याची 
उजळलेल्या स्वप्नांची 
प्रीत माझी तुझी 
   काही वेगळीच!!!
           सविता तुकाराम लोटे 
      -------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...