savitalote2021@bolgger.com

विरह कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता Savitalote Internet लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता Savitalote Internet लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १ मे, २०२१

सांज गेली

-------सांज गेली -------
सांज होती 
मी बसले होते 
सागर किनारी... तुझाच 
हात - हातात माझ्या 
...मोबाईल सोबत 
अलगद,
अश्रुधारा नयनात 
निशब्द, सगळ्या 
भांडकुदळ भावना 
आता 
जाणवू लागला 
वेदना ...सरसकट
वा-यांचा सोबतीने
मनापासून! 
पायाखालील 
वाळू...  सरकलेली 
अधिक सांज आली  
रुसलेल्या प्रेमाची 
हसणाऱ्या ओठांची
कोसळणाऱ्या लाटांची 
भिजलेल्या पापण्यांची
अलगद 
तुझे हात बाजूला करून 
अमावस्येच्या रात्रीसारखे 
मन हरवून.... 
दूर कुठेतरी बघत!
हात हातात घेऊन
हात सोड ना !
नको राहू दे 
मनात गुंतलेला... 
नेहमी स्वच्छ आठवणीसंग
पण; 
ढगाळलेले क्षण ठेवून ज्या
शांत लाटेसारखे... मुके 
आणि 
हळूच सांज गेली
हाता -हातात ठेऊन
मनमोकळा मनाने! 
      सविता तुकाराम लोटे 
    


---------------------------------

राहूनच गेले ( प्रेम कविता )

एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...