savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २८ मे, २०२४

यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकांचा वेगवेगळ्या आहे..!

यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकांचा वेगवेगळ्या आहे...."

   विचारांच्या गुंतांमध्ये अजून एक विचार येऊन गेले. खरच आपण शब्द शब्दाने एक वाक्य तयार करतो आणि त्या वाक्याने संपूर्ण इतिहास ...!
      फक्त एकमेकांच्या सोबतीने कितीतरी वाक्यांची निर्मिती करतो. अ ब क ड..... बाराखडी म्हणजेच बोलण्याचे विश्व, रोज आपण साठवीत जातो. थोडे - थोडे शब्दांची भाषा थेंब थेंब साठवत हळुवारपणे ते शब्द आत्मसात करीत जात एक दिवस मोठा संचय होत आणि आयुष्य मध्ये ती भाषा कधी आपली होते कळत नाही असच आयुष्यही...!!
     ...... आयुष्याच्या पायरीवर रेंगाळत असताना, नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. कधी ते यशासोबत अपयश घेऊन येते. नव्या प्रयत्नांना परत आयुष्यात पेरावे लागते.
आयुष्याच्या जगातही असेच आहे. विविध भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारत असतो.
        मनाला बळ देऊन जाते. शब्दांचे अस्तित्व जसे आपले अस्तित्व टिकून ठेवते तसेच मनातील भावना आपले अस्तित्व टिकून ठेवते. अवघड असते प्रत्येक गोष्ट पण थेंबा थेंबा न तळ निर्माण होत तसच हळुवारपणे भावनेला  आत्मविश्वासाने समोरची परिस्थिती हाताळण्याची प्रेरणा मिळत असते. विचारांचा खूप मोठा प्रवास झालेला असतो. विचारांची गुंतवणूक असते. आकाशातील उधळत विशिष्ट ठराविक वेळेत येते. पावसाचा थेंब विशिष्ट वेळत उपयोगी पडतो. गुलाबी थंडी विशिष्ट एका भावनेशी केंद्रित असते. क्षितिजा पलीकडील जग जगणे जीवन नाही.💕💕
        जीवनाचे ध्येय लक्ष प्राप्ती हे आपले असते. आयुष्याची जगणे आपल्या असते. जीवनाचे खरे बंधन काय आहे हे माहीत नसते. पण व्यवहारवादी ज्ञानामध्ये अशी कितीतरी प्रश्न सहज येऊन जातात.... त्या तळ्यामध्ये साचलेल्या थेंबांसारखे !!
      जिथे बंधने नसूनही उत्तरे नसूनही प्रश्नांचा संच मात्र तयार होतच राहतो. आपण बघतो आपल्यातच आपल्यातील भ्रम विनाकारण संघर्षाची पायवाट आपल्या संघर्षाला विनाकारण काटेकोरपणे पालन करावे लागते. आयुष्याच्या नियमाचे अपूर्ण असे ध्येय आता संघर्षात पण सखोल पद्धतीने मनात साचले जाते, आणि ते टाळावे म्हणून कितीतरी उल्हासाने कितीतरी आत्मविश्वासाने त्या जखमांना टक्कर द्यावे लागते.💕
       तेव्हा आयुष्याचा रंगमंच सजना जातो विविध रंगांच्या पावडरने ज्या व्यक्तीकडून नियम आपल्या वाटेला येते त्या व्यक्तीला त्या नियमांना कदाचित आता काहीही अर्थ नसतो.  
       सर्व प्रश्नांचा अंत एकच तो म्हणजे समाधानाने जगणे हेच ...! शांतीचे स्वरूप समाधानाने जगणे म्हणजे जगणे चिंतामुक्त जगणे म्हणजेच जगणे. सतत सतत विचारांची होणारी पिळवणूक एका कालावधीनंतर पुसली जाते हे सत्य आहे म्हणून विचार नावाच्या झाडाला हिरवळ देऊ नका. त्याला मुळापासून सुकू द्या.
        कोणत्याही ऋतू कारण थेंबाथेंबाने तळ निर्माण होते तसेच विचारा विचाराने चिंतेच्या स्वरूपात चितेची पायवाट चालू होते आणि आयुष्य सांगते म्हणून आहे त्या परिस्थिती प्रश्नांना कुठेही थारा न देता चुकीच्या व्यसनधीन मार्गाकडे न जाता सशक्त मनाचा दृष्टिकोन मनात बाळगावा लागले तेव्हा काही काळासाठी का होईना आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेऊ.  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चटका लागून जाणाऱ्या गोष्टी घडून जातात. समस्याचे जाळे विणले जाते फक्त त्याला हाताळण्याची कल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्या समस्याला विशिष्ट एका पद्धतीने हाताळण्याचे कला त्यांच्याकडे असते. आपल्यामध्ये  ती कला आत्मसात करावी लागते, त्यासाठी आत्मविश्वास संयम ध्येय या गोष्टी आयुष्यात असाव्या लागतात.💕💕
        आयुष्याच्या विविध समस्या या फक्त अति आत्मविश्वासाने किंवा कमी आत्मविश्वासाने निर्माण होतात हे सत्य आहे. आपल्याला मजबूत बनवतात हे जरी खरे असले तरी ते आव्हाने कधी कधी नको त्या परिस्थितीत येतात आणि कमकुवत बनवून जातात. आपल्याच आत्मविश्वास असतो. दृढ निश्चय असते. कठोर परिश्रम करण्याची ताकद असते कारण आपण त्या समस्यांना एक एक पावले कमी करत असते आजपर्यंतच्या परिस्थितीपर्यंत येत असतो. आपल्यात  क्षमता असते पण नवीन ऊर्जा निर्माण करता करता कधी कधी काही गोष्टी दुर्लक्ष होत जाते.💕💕💕
       यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अहोरात्र मेहनत केली जाते. निरंतर आपले ध्येय त्या ध्येयाकडे असते पण अपयशाची चाहूल आत्मविश्वास कमी करत जातो आणि प्रकाश अंधाराकडे नेत जाते. नवीन क्षण आपले नसतात..... नवीन निर्मिती आपली नसते ....अडथळे खूप असतात, वळणावळणावर...., पावलोपावली...., तरीही हिम्मत हरायची नाही.
आपल्या स्वप्नाची दिशा आपण ठरवत राहायची. कारण अंतरात्म्याची आवाहन हे इतरांसाठी नसते ते आपल्यासाठी असते..!😂❤
       आपल्या संघर्षाची यशोगाथा असते.🌹 आपल्या संघर्षाची अपयशाची 💔यशोगाथा असते. म्हणून जगण्याची संधी कधीही हरवू नका. आज एक गोष्ट संपली म्हणून उद्या ती असेल हा विचार उज्वल भविष्याला अडवून ठेवते म्हणून यशाची साथ सोडू नका.  💕💕                   अपयशाच्या पायऱ्या कितीही आल्या तरी यशाच्या पायरीवर एक एक पायरी आपण चढणारच आहोत. कारण आपण कठोर परिश्रम करून अखंड ज्योत निर्माण केलेली असते. त्या ज्योतीचा प्रकाश हा सकारात्मक असतो. 
             सकारात्मक ज्योत आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेतच असते. म्हणून आयुष्याची चिंता करू नका. कारण चिंता कधी चितेत परिवर्तित होईल हे कळत नाही .संघर्ष हा यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे. तो भाग त्या भागाला आत्मविश्वासाने उत्साहाने मेहनतीने आपल्यामध्ये रुजू द्या. यशाचा  पायऱ्या  वास्तविकतेच्या दडपणाखाली नवीन स्वप्न जमिनीत रुजू द्या. जुने मरणा लागूनी..... असे म्हणुन आयुष्याच्या या मार्गावर आशावाद यात खूप काही अर्थ आहे.💕💕💕💕
        आयुष्याच्या नवनवीन रंगांच्या पावडर सारखी चेहऱ्यावरती लावत जा. जरा फुलवत जा. उडणारे पंख कधीही पिंजऱ्यात अडकून राहत नाही तसेच आयुष्यात आव्हाने खूप येते येत आहे सामोरी येते म्हणून जीवनात सकारात्मक शक्तीची पायवाट आपल्यापर्यंत येऊ द्या. निरागस आनंद चेहऱ्यावर असू द्या.
कारण माणसाची धडपड चालू असते जगण्याची सामाजिक आणि असामाजिक प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व टिकून ठेवण्याची.
          विशिष्ट वर्तनाने आपल्यामधील माणूस घडत असतो. हे ज्यावेळी माणसाला कळते त्यावेळी आयुष्य खूप सोपे होते.  प्रत्येक परिस्थितीत धडपड ही चालूच असते. ती धडपड चालूच असते माणसाचे विचार मांडण्याची पद्धत वेगवेगळी असते.💕💕💕
      ...... माणसाच्या विचारांची आयुष्य जगण्याच्या पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर ते म्हणून आपली पायवाट तीच असावी हट्टाहास नको प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.  यश - अपयशाची पायरी निवडणे हे आपले ध्येय नाही कारण एखादी कार्यशक्ती विशिष्ट एका वेळेसाठी मर्यादित असते असे जगजाहीर आहे पण असे काहीही नाही यशानंतर अपयशाने अपयशानंतर यश या ज्या पायऱ्या आहे त्या माणसाने निर्माण केलेल्या आहे.
        निसर्गचक्र हे एका वर्तुळासारखे चालत असते आणि वर्तुळ प्रत्येक वेळी पूर्ण होते तरच ते वर्तुळ असते म्हणून आयुष्यात थेंब थेंब का होईना सकारात्मक विचार जगण्याच्या वाटेवर येऊ द्या. नकारात्मक शक्तीला आपल्यापासून दूर करत जा. त्या होत नाही हेही तेवढे सत्य आहे पण आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या आयुष्यात समाधानाचे गणित मांडावे लागेल तरच विचारांचा या प्रवासामध्ये आपण यशस्वी होऊ आणि सकारात्मक विचारांची नवे झाड लावू.💕💕💕💕💕💕
       आयुष्य हे जगण्यासाठी आहे......😂💕 संपवण्यासाठी नाही. ही गोष्ट जगण्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्या सोबत असू द्या. विचारांचा गुंता एक एक करीत तुमच्या मनाला जेलबंद करीत असतो आणि इथे माणूस हरतो जगण्याची पायवाट संपवतो म्हणून विचारांचा गुंता वेळेनुसार मागे ठेवीत आयुष्याचा रंगमंच चालत राहा.
          समाधानाचे गणित मांडत राहा. परिस्थिती कशीही असेल मनात उज्वल भविष्याचे स्वप्न साकारत रहा. कारण श्वासापलीकडील आपले नाही विचारांचा गुंता तसाच कुठेतरी खोल समुद्राच्या आत सोडून द्या अंतर्मनाला खुल्या वातावरणात जगू द्या. जगण्यासाठी प्रेरित करा. यश आपलेच आहे. यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकांचा वेगवेगळ्या आहे..!❤

✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


--------------------------------------------------------------------------

"Everyone has a different view of success..."

     Another thought came in the confusion of thoughts.  Indeed we create a sentence word by word and with that sentence the whole history...!
        Forms many sentences just by pairing with each other.  A B C D..... Barakhadi means the universe of speech, we are stored every day.  Little by little the language of little words is slowly being absorbed and gradually the words are being assimilated, one day it becomes a big accumulation and in life we ​​don't know when that language becomes ours.
       ... crawling up the steps of life, new challenges are faced.  Sometimes it comes with failure along with success.  New efforts have to be planted back into life.
 It is the same in the world of life.  Various roles are played on the stage of life.

Strengthens the mind.  Just as the existence of words sustains our existence, the emotions of the mind sustain our existence.  Everything is difficult, but it builds up little by little, and slowly the spirit gets inspired to handle the situation in front of it with confidence.  Thoughts have traveled a long way.  Thoughts are invested.  Sky bursts occur at certain fixed times.  Raindrops are useful at certain times.  Pink chill focuses on a specific emotion.  Living the world beyond the horizon is not life.💕💕

   Attainment of the goal of life is ours.  Life is ours to live.  One does not know what is the real bond of life.  But in pragmatist knowledge, many such questions come easily.... like drops in that pool!!
        Where there are no constraints and no answers, a set of questions continues to form.  We see within ourselves the path of illusion in our struggle for no reason.  The unfulfilled goal of the law of life is now deeply embedded in the mind in conflict, and to avoid it, one has to confront the wounds with so much joy and so much confidence.💕

Then the stage of life is decorated with powders of different colors. To the person from whom the rules come his way, those rules may no longer have any meaning.  
         The only end of all questions is to live with satisfaction...!  Nature of Peace To live with contentment is to live, to live without worry is to live.  It is a fact that the constant churning of thoughts is wiped out after a period of time so don't give green to the tree called thought.  Let it dry from the roots.
          

In any season, because the bottom is formed drop by drop, and the path of the pyre is running in the form of anxiety with the questioning thought, and life tells us that the situation is so that the questions do not end anywhere, instead of going down the wrong addictive path, when we have to keep a strong minded attitude, why should we control our thoughts for a while.   In every person's life, sudden things happen.  A web of problems is woven only everyone has a different idea of ​​dealing with it.  They have the art of dealing with that problem in a particular way.  We have to acquire that art, for that we have to have confidence, patience and goals in life.💕💕
          
It is a fact that various problems of life arise only from overconfidence or underconfidence.  Although it is true that they make us stronger, those challenges sometimes come in unexpected situations and make us weaker.  We have our own confidence.  There is a strong determination.  Hard work is powerful because we reduce those problems one step at a time to the present situation.  We have potential but while creating new energy sometimes some things are neglected.💕💕💕
         To reach the pinnacle of success one works day and night.  Constantly we aim towards that goal but the prospect of failure diminishes confidence and leads light to darkness.  New moments are not ours..... New creations are not ours....Obstacles are many, turning...., steps...., still don't lose heart.
 We used to decide the direction of our dreams.  Because the appeal of the soul is not for others it is for us..!😂❤

Our struggle is a success story. 🌹 Our struggle is a 💔success story of failure.  So never miss the chance to live.  Don't give up on success because one thing is over today and it will be tomorrow prevents a bright future.   💕💕                No matter how many steps of failure, we are going to climb the steps of success one by one.  Because we have created an eternal flame by working hard.  The light of that flame is positive. 
               A positive flame always leads us to our goals.  So don't worry about life.  Because you never know when anxiety will turn into anger. Struggle is a part of the journey to success.  Let that part take root in you with confidence, enthusiasm and hard work.  Steps to Success Let the new dream take root under the pressure of reality.  As the old die..... Optimism on this path of life means a lot.💕💕💕💕

Apply on the face like a powder of new colors of life.  Bloom a little.  Flying wings are never trapped in a cage and life is full of challenges, so let the path of positive energy come to you in life.  Let innocent joy be on the face.
 Because the struggle of man is going on to survive in every sphere of life, social and non-social.
            The person in us is formed by certain behavior.  Life becomes very easy when one realizes this.   In every situation, the struggle is ongoing.  That struggle continues. People's way of expressing their thoughts is different.💕💕💕

.... It is our duty to try to be the same in the way of thinking of man in the way of living his life.   Choosing success-failure steps is not our goal because it is known that a work force is limited for a certain time but there is no such thing as success after failure success after failure steps which are man made.
          The cycle of nature runs like a circle and a circle is only a circle if it completes every time, so let positive thoughts in life, drop by drop, come in the way of living.  Keep negative energy away from you.  It is also so true that it does not happen but we have to ignore it and present the math of satisfaction in our life only then we will succeed in this journey of thoughts and plant a new tree of positive thoughts.💕💕💕💕💕💕


Life is for living......😂💕 not for ending.  May this story be with you every step of the way.  One by one tangles of thoughts imprison your mind and here a person loses the path of life so leave the tangles of thoughts behind in time and continue on the stage of life.
            Keep presenting the math of satisfaction.  Whatever the situation may be, keep dreaming of a bright future.  Because beyond the breath is not yours, leave the entanglement of thoughts somewhere inside the deep sea, let the inner mind live in the open environment.  Inspire to live.  Success is yours.  Everyone's approach to success is different..!❤

 ✍️©️®️Savita Suryakant Tukaram Lote
       Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

-----------------------------------------------------------------------------------------------💕💕💕💕💕💕

अस होत ना तुलाही!!

      अशा प्रेयसीची ही प्रेम कथा आहे, जी प्रेमात पडते आणि ती तिच्या प्रियकराकडून काय अपेक्षा करते...    ती हिशोब मांडते.                आताच्या क्षणापासून ते श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंतचा आणि त्यानंतरचा. त्याच भाव विश्वातून ही कविता.शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.
     एक स्त्री तिचे अस्तित्व आणि तिचे प्रेम किती नाजूक धाग्यामध्ये गुंतलेले असते हे या कवितेतून सांगण्याचा हा प्रयत्न.
         कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
धन्यवाद💕💕

**** अस होत ना तुलाही ****

हृदयाच्या आतल्या कप्प्याला 
आता तुझी सवय झाली आहे 
क्षणिक आठवणींची ओंजळ 
सुंदर शब्दाने सजली जाते 
मनात अस होत ना तुलाही 

माझा प्रवास माझे शब्द 
तुझ्यापर्यंतच तुझ्यासाठीच असतात 
तसेच तुझेही होत असेल ना 
भावना भिजविल्या जातात 
अस होत ना तुलाही 

आनंदाची झालर सुंदर 
नक्षीकामाने सजविली जाते 
हळव्या क्षणांना सांगावे वाटते 
उगाच उमटणाऱ्या आवेगाला 
नजरेचा बंद कपाटात ठेवावे वाटते 
अस होत ना तुलाही

हिशोब ठेवावा वाटतो सवयीप्रमाणे 
तुझ्या - माझ्या नात्यातला आठवणींचा 
कधी पश्चाताप झाला तर 
निराशेच्या सुरात का होईना 
सांगावा लागेल ठरलेल्या शब्दांना 
ओठांच्या साक्षीने कपाळावरच्या आट्या मोजाव्या वाटते 
अस होत ना तुलाही

दाटून येतात भावना आशावाद 
जागा ठेवावा तुझ्या गालावर आलेल्या 
सुरकुत्यांच्या साक्षीने देह नाजूक 
सरणावर हाताने ठेवावा वाटतो 
बहरलेल्या आठवणींना सोबत 
घेऊन जावेसे वाटते 
पाण्याच्या प्रवाहात 
अंतिम क्षण देतपर्यंत 
अस होत ना तुलाही

हृदयाच्या आतल्या कप्प्यात 
आता तुझी सवय झाली आहे 
आता तुझी सवय झाली
अस होत ना तुलाही!! 


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...