एक प्रियसी आपल प्रेम या शब्दात व्यक्त करीत आहे. कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!💕💕😀
💕तुझे - माझे💕
तुझ्या माझ्या नात्यात
ऊन सावलीचा खेळ
कधी रंगांच्या सोबतीने
तर कधी पहाटेच्या उगवत्या
सूर्यप्रकाशासारखे निर्मळ
जास्वंदीच्या फुलाला सुगंध
आपल्या प्रेमाचा
हळदी कुंकवाला प्रेम आपले
गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षाही
टवटवीत फुललेल्या
मनाच्या नात्याला...!!💕
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
--------------------------------------------------------------------------