savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

फुलांचे सामर्थ


फुलांचे सामर्थ्य
       फुलांचे सामर्थ्य अनुभवासाठी फुलच व्हावे लागत नाही तर त्यासाठी फुलाची कोमलता आणि त्यांच्या सारखेच जडत्व सुद्धा घ्यावी लागते ते जसा स्त्रियांच्या केसातील सौंदर्य वाढविते तसाच ते मंदिरातील देवत्वाचे देवपण म्हणजे जगातील  कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही घटनेसाठी वापरू शकतो 
    फुलांमध्ये सुगंधीपणा  असतो पण ते त्यापासून दूर राहू शकत नाही त्याच्या त्या सुगंधी सौंदर्यावर आपले सौंदर्य फुल होते त्याच्या सौंदर्यावर आपले मन टवटवीत होते हसरे होते पाऊल प्रत्येक क्षणी सुगंधी होते 
       कुठे ती मनाला फिरू देत नाही त्यांना आपल्या जवळी असलेले सर्व चांगल्या गोष्टी देऊन जाते आणि काट्यांचे घाव स्वतःजवळ ठेवतात जखमा स्वजवळ ठेवून चेहर्‍यावर हसु देऊन जातो . आपले आयुष्य दुसऱ्याला आनंदी देण्यासाठी असावे त्याला पाहतांना थोडे सामर्थ्य आपण आपल्याजवळ सुद्धा निर्माण करावे पण जखमांना दुर करीत फुलांसारखे मनात सामर्थ्य निर्माण करून वादळातही काट्यांना दूर करीत सत्याच्या गणितावर चालत. 
        आपल्यातील सामर्थ्य आपल्यातील फुल्लत्व आपल्यातील नाजूकपणा काट्यांना मागे सारत इतरांच्या नाजूक शब्द साखळी ने निर्माण करीत.
          फुलांची कोमलता अनुभवावी 
          सत्याच्या गणितावर आणि 
          स्वतःच्या नाजूक शब्द सामर्थ्यांने 
           फुलांची सामर्थ्य अनुभवण्यासाठीच !
                      सविता तुकाराम लोटे 

ओंजळ

     ओंजळ

         क्षणी फुललेल्या ओंजळीत भरतांना मनात किती आनंद आनंद होत असतो आणि तोच क्षण मनासारखं नसताना ओंजळीत भरतांना मनाला आनंद होईलच असे नाही. 
       ओंजळ आपली... पण ती किती भरलेली आणि किती रिक्त हे माहीत नसते. 
         ओंजाळ म्हणजे आपल्या दोन्ही हाताची एकत्र आलेली एक प्रतिक्रिया पण ती येते तेव्हा भरपूर काही आपल्या त्यामध्ये ओंजळी मध्ये येते त्याला किती मोकळे सोडायचे की जणू जपून ठेवायचे हे त्या क्षणावर अवलंबून  असते.                        वाकलेल्या त्या क्षणाला ओंजळीत
 ठेवण्यापेक्षा आनंदी क्षणाला सांजवेळी सुद्धा आपल्या ओंजळीत ठेवावे मनाला ते कळू सुध्दा न देता! मूक भावनेने आणि ओल्या श्वासाने व फुललेल्या स्वरबद्ध संगीताने.
                              सविता तुकाराम लोटे

प्रिये


   प्रिये
आकाशातील चमकते चांदणे 
तुझ्याकरिता तोडून आणणे 
चांदण्याचा गजरा केसात माळीन 
स्वप्न तुला दाखविणार नाही 
जे जीवनात उतरत नाहीत 
माझ्या मला मर्यादा माहित आहे
तरीपण 
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर 
साथ मात्र देईल 
हाताने मोकळा केसात 
लाल गुलाबाचे फुल माळीन
                    माझी प्रिये!!
    सविता तुकाराम लोटे 

प्रेमबिम

      
     प्रेमबिम 
मनाला धमकावून सांगत असते 
प्रेमबिम करायचं नसतं 
तरीही मन झुकत असते तिकडे 
डोळे शोधत असते त्याला 
त्याच्या चेहऱ्यावरील शांतमुद्रा 
पाहण्यासाठी..... 
तरीही,
मनाला धमकावीत असते 
प्रेम बिम करायचे नसते
प्रेम बिम करायचे नसते
       सविता तुकाराम लोटे 

गणपती

            गणपती 
गणपती गणपती 
आलास आमच्या घरोघरी 
नैवेद्याला मोदक आणि फक्त मोदक 
वाजत गाजत आला 
गणपती आला 
कुठे तर अडीच दिवसाचा 
तर कुठे अकरा दिवसाच्या 
सर्वकाही तुझ्यासाठी 
आला गणपती  
गणपती तुझे नाव अनेक
पण नावात आहे तुझे रूप 
राहतो आमच्या घरी 
जसजसे दिवस जातात 
तसतशी होते जीव घालमेल 
असाच येते तो दिवस 
तुझ्या जाण्याचा 
मन असते बेचैन 
पण मनाला माहित असते 
गणपती बाप्पा मोरया 
पुढच्या वर्षी लवकर या!

प्रेमाचा दिवस

       प्रेमाचा दिवस 
आयुष्यातील प्रेम दिवस तो
मनातील भावना व्यक्त करते तो
प्रियकर प्रियसीला देतो लाल फुल
त्यातच असते त्याचे प्रेम 
प्रेम तर नयनात असते 
फुल तर ते प्रतीक असते 
रुसलेल्या प्रियसीला व्यक्त 
करण्यासाठी असतो
तो दिवस 
आपल्यालाही कुणी द्यावे फुल 
अशीच आशा असते मनी 
तो दिवस म्हणजे प्रियकरांच्या
आनंदाचा दिवस
      सविता तुकाराम लोटे 

आठवण

        आठवण 
रातकिड्यांचा आवाजात 
आकाशात चमकणारे तारे 
अंगाला मोहून टाकणारा वारा 
आणि अशातच तू आली 
तुझ्या शृंगारानी झाले प्रफुल्लित 
तुझ्या केसातील मोगरा 
आनंदून गेला माझ्या मनाला 
तेव्हा आली मनी आठवण 
गेलेली तू दूर 
माझ्यापासून ....
मी सावरत होते स्वतःला 
तरी माझी एक वेडी 
आशा
होती
तू गेली असली तरी 
तुझे प्रेम माझ्याजवळी होते

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...