कविता शब्दांनी सजली जाते. शब्दांनी शृंगार केला जातो. प्रेम शब्दाने व्यक्त केले जाते. पण कधी कधी खूप प्रेम असते पण उन्हाळे पावसाळे त्यात अडथळे असतात, स्वभावांचे.
अशावेळी मुखवटे लावले जातात. अशाच एका प्रेयसीची ही भावना. त्या भाव विश्वातून त्या संदर्भसूचीतून घेतलेली ही भावना कविता स्वरचित व स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!
*** मुखवटा ***
करूनही पुसल्या जात नाही
इच्छा असूनही ओंजळीत
धरल्या जात नाही
दोन वाट्या वेगवेगळ्या
असल्या तरी
वेगवेगळ्या वाटत नाही
प्रामाणिक प्रयत्न
केले जातात पण
अपुरीच पडते
इथल्या अस्वस्थ वाटेवर
प्रयत्न करत राहते
क्षणाक्षणाला पण अपुरेच पडतात
ध्येय गाठायला
अपयश नाजूक सदाफुलीसारखे
हातात आले
तरीही तू म्हणतोस
अर्थ काय आहे...???
या नात्याला
या प्रयत्नांना
या अक्षरांना
उमगत नाही
अवगतही नाही
पचतही नाही
सुटतही नाही
आता काय झाले ...!!
इतकेच बोलून निघून जातो
मी प्रयत्न करत राहते
नको त्या गर्द हिरवळीतल्या
आठवणी
नको त्या आयुष्याच्या सुंदर
कल्पना चित्रविचित्र तूच
तरीही मुखवटा माझा
माझ्यातील न झालेल्या चुकांचा
आशावादी.....!!💕💔
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .