''बहर सकारात्मकतेचा"
काळोखाला भेटून रम्य सकाळ आपल्या भेटीला येते. काळोख ही माघार घेतो. तिच्या भेटीने चैतन्य चोहिकडे...!!
दमलेल्या काळोखाला बाय-बाय करत भल्या पहाटे रवी राजाच्या सोबतीने शहर गावे सह्याद्री पर्वत उंच उंच इमारती घरे दारे अंगण झाडे झुडपे, वेली दुधाळ केशरी रंगाने उजळून टाकते.
उजळतात दाही दिशा. गंध सुगंधी फुलांचा नवीन पहाटेला नवीन वाऱ्याची सोबतीने. सूर्यकिरणाच्या प्रकाशाच्या रंगछटा उंचच उंच आसमंतात. पावसाळा असेल तर रिमझिम सोबत येणारी सकाळ म्हणाला प्रफुल्लित करून जाते.
सोन्यासारखी सजलेले रूप घेऊन नव्या दिशांना शांतस्तब्ध करत; घरातल्या खिडकीतून घरात प्रवेश करते नवीन स्वप्नांना सोबत घेत. काळोखाला मागे सोडत. नवीन बहर सूर्यप्रकाशासोबत.
आपल्या स्वागतासाठी तयार असते, ती असते सकाळ...!!❤
सकाळ ,'चल उठ' म्हणायला आली की वाटत आता नको पाच मिनिट ...परत पाच मिनिट आणि परत पाच मिनिट.... पाच पाच मिनिटाचा वेळ कधी संपतच नाही.
सकाळी - सकाळी रम्य स्वप्नांची वेळ स्वप्नातून जागे व्हावे असे वाटत नाही पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकाळी उठावेच लागते.
सुवर्ण घागरीने आपले स्वागत करत सकाळ आपली वाट पाहत असते. त्या स्वप्नांना नव्या प्रवासासोबत पूर्णत्वास नेण्यासाठी मग ती वाट कासवाच्या गतीचे का असेना पण ती सुवर्ण पहाट दाही दिशा उजळून टाकते.
ऊन -सावलीचा संघर्षाचा खेळ खेळत नवीन प्रकाश नवीन दिशा देते. सकाळ ही आपल्यासाठी असते. आपल्या स्वप्नांसाठी असते. आपल्या जगण्यासाठी असते. आपल्या शब्दांसाठी असते. आपला स्वप्नांना चालना देण्यासाठी असते.
हिवाळ्यातील सकाळ म्हणजे अंधार आणि उजेडाचा एक खेळ असतो. ती अंधारातही नसते आणि प्रकाशातही नसते. सकाळचा गारवारा मन इतके प्रफुल्लित करून जाते की ती पहाट मनात घर करून राहते.
नवीन हिवाळ्यातल्या सकाळची वाट बघत...!! कोवळ्या उन्हाबरोबर लपंडावीचा खेळ खेळत.
उन्हाळ्यात तर सकाळ ही दुपारच वाटते. निसर्गचक्रानुसार नियम बदलतात पण सकाळ आपल्याच वेळेवर येते. आकाशात रंगांची उधळण करत.... फुललेला चैत्रासोबत.... स्वतःही फुलते..... कडुलिंबांच्या फुलासारखी.... कडूलिंबाला ती सजवते तिच्या रूपाने..... चैत्र फुलविते ....गुलमोहराच्या फुलासारखी.... मोगरा ही फुलतो सोबत गंधाळून सकाळी सकाळीच.....!!😄
नवीन संधी नवीन शक्यता
नवीन उत्साह नवीनच बहर
नवीन सुवर्णसंधी नवीन दिशा
नवा प्रवासासोबत नवीन स्वप्न
नवीन ऊन-सावली नवीन गंध
नवीन प्रकाशवाट
नवीन प्रकाशाची नवीनवाट
नवीन सूर्याचे पहिले किरण
नवा दिवस नवीन हवा
नवी वेळेचे नवीन अर्थ
नवीन पहाट सजलेली
नवीन प्रभात नवीन सूर्यप्रकाशाचा खेळ
नवीन मावळतीचा क्षण नवीन काळोखात
नवीन सोनेरी किरणांच्या पहाटेसाठी
सकाळ अशीच असते भल्या पहाटे सजलेली. सकाळ प्रत्येक दिवशी नवीन असते. ती नवीन स्वप्नांनी सजलेली असते. रंगाने सजलेली असते.
जुने ते मागे पडत जाते. नवीन ते चैतन्याने भरलेल्या हातातील असते. फक्त सकाळ सुंदर तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही सकारात्मक विचारणे त्या सकाळचे उत्साहात स्वागत करता. आता त्या सकाळचे स्वरूप बदलत चालले आहे. नकारात्मकतेची जागा आता तो सकाळचा सूर्यप्रकाश घेऊ पाहत नाही. स्वप्नाच्या दुनियेत जाऊ पाहत नाही. चैतन्याचा प्रकाश काळोखा सजलेल्या त्या अमावस्येच्या रात्री सारखाच वाटतो.
ती केशरी रंगाची उधळण सुवर्ण घागरीने भरून येत नाही. कारण आपल्या चारी बाजूने नकारात्मकतेचे इतके वलय आहे की रात्र आणि सकाळ यातील अंतर कमी होत चालले आहे. आपल्याला नवीन प्रकाश हवा असतो. तसाच प्रत्येकांना नवीन प्रकाश हवा आहे. हे जर प्रत्येकाने स्वतःला सांगितले तर या नकारात्मकतेची चाहूल कमी होईल तरीही आपण उत्साहाने समोर जातो.
शांतस्तब्ध झालेल्या मनाला परत उत्साहाने नवीन संधी देत राहतो. संघर्ष हा तर असतोच. तो न संपणारा...!! इच्छा खूप असतात पण संघर्ष संपतच नाही. जणू काही संघर्ष आपल्याला स्पर्शून गेला आहे त्याच्या नकारात्मकतेला सोबत घेत.
अंधार नकारात्मकतेची प्रतिक असेल तर सकाळ सकारात्मकतेची प्रतीक आहे. काळोखा दमलेल्या चांदण्या आता सूर्यप्रकाशात दिसत नाही. तसेच कालचे आजच्या सूर्यप्रकाशात दिसू नये असे वाटते.
विशेषता ते नकारात्मक दृष्टीकोनातले असेल तर...!
असो...,सकाळ खूप सुंदर असते. दाहीदिशा उजळल्या जातात. अंधाराची चाहूल दिसतच नाही. चैतन्याचा प्रकाश चौघीकडे असतो. भल्या पहाटे सकाळच सजते . आपल्याला नवा प्रकाशाबरोबर नवी पायवाट पाऊलवाट मग ती थोडीफार चिखलानी भरली का असेना पण ती दिसते. हेच महत्त्वाचे ..आणि सकाळ हेच आपल्याला दररोज सांगत असते.
मी तुम्हाला सूर्यप्रकाशाच्या दिशेने नाही सूर्यप्रकाशासोबत चालण्याची ऊर्जा देते. ती ऊर्जा सकारात्मक आहे. गती द्या स्वप्नांना. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करा. कारण हेच दिवस सोनेरी किरणांनी भरलेले आहे.
हेच दिवस सोनेरी पावलांनी तुमच्यासोबत चालणार आहे. म्हणून सकाळ शांतस्तब्ध पक्षांच्या किलबिलाटात फुलांचा सुगंधासोबत कडुलिंबाच्या झाडामागून अलगद आपल्या रूपाचे दर्शन केशरी रंग उधळत आपल्याला दर्शन देते.
"चल उठ, सकाळ झाली...!! हे शब्द कानावर पडतात की रात्रीचा काळोख पापणीआड होते आणि नवीन पहाट जगण्याची चालू देते.... सकाळी सकाळीच..... जीवनातील कोणतीही वाट चालू असले तरी सकाळ प्रफुल्लित ऊर्जावान शक्ती प्रधान आणि ब्रम्हांडातील सकारात्मक शक्तीचे सकाळ रूप असते.
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
** Morning **
"Blossom of Positivity"
A beautiful morning meets the darkness. Darkness retreats. With her meeting Chaitanya Chohi...!!
Saying bye-bye to the weary darkness, the early morning Ravi lights up the city, villages, Sahyadri mountains, high-rise buildings, doors, courtyards, trees, bushes, vines with milky orange color in the company of Ravi Raja.
The right direction lights up. The smell of fragrant flowers accompanies the new dawn of a new wind. The hues of sunlight are high in the sky. If it is rainy season, the morning that comes with the drizzle is said to be cheerful.
Calming the new directions with a form adorned like gold; It enters the house through the window of the house, taking with it new dreams. Leaving the darkness behind. New bloom with sunshine.
Ready to welcome you, it is morning...!!❤
When the morning came to say, 'Get up', you don't want five minutes... five minutes again and five minutes again... five five minutes time never ends.
Morning - the time of pleasant dreams in the morning, one does not want to wake up from the dream, but one has to wake up in the morning to fulfill the dream.
Morning awaits us, welcoming us with a golden pitcher. To fulfill those dreams with a new journey, even if the path is at the speed of a tortoise, the golden dawn illuminates the right direction.
New light gives new direction, playing the conflict game of sun and shadow. Morning is for you. For your dreams. It is for our survival. For your words. To fuel your dreams.
A winter morning is a play of dark and light. It is neither in darkness nor in light. The morning breeze makes the mind so happy that it stays at home in the morning.
Waiting for a new winter morning...!! Playing hide and seek with the young sun.
In summer, morning feels like afternoon. The rules change according to the cycle of nature but morning comes in its own time.
Bursting with colors in the sky....blossomed with Chaitra....blossomes herself.....like a neem flower....She decorates the neem with her form.....Chaitra blossoms....like a Gulmohra flower....Mogra It blooms along with smelling in the morning itself.....!!😄
New opportunities new possibilities
New enthusiasm blooms again
New golden opportunity new direction
A new dream with a new journey
New Sun-Shade New Smell
New light
New way of new light
The first rays of the new sun
A new day calls for a new air
New meaning of new time
A new dawn adorned
New Dawn New Sunshine Game
A new sunset moment in a new darkness
For the dawn of new golden rays
The morning is like this, decorated early in the morning. Every morning is new. She is adorned with new dreams. It is decorated with color.
The old recedes. The new is in the hands full of vitality. Mornings can be beautiful only when you greet the morning with positive asking. Now that morning is changing. He doesn't want morning sunlight to replace negativity. Not trying to go into the world of dreams. The light of consciousness feels like that dark new moon night.
That orange splash doesn't fill the golden pitcher. Because there is such a ring of negativity around us that the distance between night and morning is shrinking. We need new light. Likewise, everyone wants a new light. If everyone tells themselves this, the negativity will diminish, yet we still go forward with enthusiasm.
A calmed mind keeps giving new opportunities with enthusiasm. The struggle is there. It is endless...!! Desires are many but struggle never ends. It is as if the struggle has touched us, taking its negativity with it.
If Darkness symbolizes negativity while morning symbolizes positivity. The dark exhausted moon is no longer visible in the sunlight.
Also yesterday's should not be seen in today's sunlight.
If the attribute is in a negative perspective...!
Anyway..., morning is very beautiful. The directions are illuminated. There is no hint of darkness. All four have the light of consciousness. The morning is beautiful in the early morning. We see a new path with new light, even if it is a little muddy. That's what matters ..and that's what morning tells us every day.
I give you the energy to walk with the sunlight, not against it. That energy is positive. Accelerate your dreams. Make day night and night day. Because this day is full of golden rays.
This day will walk with you in golden steps. So the morning gives us a glimpse of his form behind a neem tree with the chirping of quiet birds and the scent of flowers, radiating orange hues.
Come on, it's morning...!! These words fall upon the ears as the darkness of the night falls behind the eyelids and a new dawn begins to live....morning is morning.....no matter what the path of life, morning is the morning of exuberant energy and positive energy in the universe.
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
============================
# Morning
"Blossom of Positivity"
मराठी कविता मराठी लेख ललित बंध ललित लेख मराठी चारोळी मराठी साहित्य विद्रोही साहित्य महाराष्ट्रातील विविध योजना उखाणे शुभेच्छा आणि बरच काही.
Marathi Poetry Marathi Lekh Lalit Bandh Lalit Lekh Marathi Charoli Marathi Literature Rebel Literature Various Schemes of Maharashtra Ukhane Wishes and many more.
=============================