माझे तुझ्याकडे पाहणे
हसरा चेहऱ्यावरील ते भाव
कळलेच नाही
कधी काळीज चोरले
सुखावलेल्या वेडा जीवाला
वेडा मनाला
समजावीत होते
तरी आठवणीच्या सुखात
भिजवत होते
सोकावलेल्या वेड्या जीवाला
समजावीत होते...
सविता तुकाराम लोटे
एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मेसेज साठी वाट बघते आहे पण तो मेसेज आल्यानंतर त्याच्याकडून नात्यात मर्यादा आहे याची आठवण करून देणारी ही कविता...