savitalote2021@bolgger.com

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

माझा - तुमचा गारवा..!! एक अनुभव माझा माझ्यासाठी..!!!

❤माझा - तुमचा गारवा..!!

         एक अनुभव माझा माझ्यासाठी..!!!❤



       नवीन दिवस...नवीन विचार आणि रोज नवीन गारवा, वाढणारा.  सभोवताली हवेत धुंद गुलाबी गारवा... मनाला हवेची नवीन ओळख करून जातो. 

         

साऱ्याच पावलांची आकृती 

मनातील सांजछाये सोबत

गुलाबी गारवा मनसोक्त 

सोबतीला...... 

नवीन ओळखीसोबत


         मनात नवनवीन आणि जुन्या सर्वच आठवणी घर करून जातात.फुललेला पहिला गुलाब मनात आठवणींच्या महापुरात घेऊन जातो. मनाला परत जुन्या आठवणींना; नवीन रूपात मनात फुल फुलवितो.


बहरली नाती मनमंदिरा मंदिरात 

उसवलेली नाती नयनात 

हा खेळ चालूच 

संगतीला गारवा 

मनसोक्त



        ओल्या मातीचा सुवास जसा, तसाच मनाला गारवा आठवणींच्या हिंदोळ्यावर मंद मंद सुखाद लांब प्रवासात घेऊन जातात. असहाय्य होणारा दुरावा थंडगार हवेच्या सानिध्यात मनाला स्पर्शून जात.... मनात नाविन्याचा  प्रेमाचे फुल उमलूनच गारव्याचा आस्वाद घेता घेता तन मन चिंब भिजून जाते.


फिरला परत मन चिंब करायला 

चिंब भिजलेला गारवा 

रुपेरी पडद्यामागील 

मिठीतला


       आयुष्याला नवीन अर्थ देत तुफान वाऱ्यासारखा वळतो. त्या गुलाबी आठवणींच्या मंदमंद गुलाबी गारव्यात.

           हिरव्यागार झाडांच्या पानावरील दवबिंदूच्या साक्षीने आठवणींच्या वादळात मनाला दळले जाते.  मळले जाते.  क्षणभर मनाला फुलविले जाते. मनातील भरलेल्या आठवणींना नयन दवबिंदूद्वारे शांत पण फितूर मनाने स्वतःच स्वतःशी बोलले जाते.


           गारवा तुफान मनातील आठवणींचा गारवा.... आठवणींना शांत पण मोकळी वाट देणारा!! गारवा झाडांची पाने गळून नवचैतन्याचे सुख अनुभवायला देणारा एक प्रवास..... तसाच मनाला शांत आणि नवीन नवचैतन्य फुलविणारा.


अखंड शोध 

नवपावलांसोबत 

जुन्याच पावलांचा 

कधी मनगळ होऊन 

तर कधी 

ओल्या मनाने 

पण कोरडा 

होऊन..!!


        निसर्गासोबत एकदम रम्य सहवास देणारा गारवा मनाला बेधुंद करतो. गारवा मनाला अल्लड बनवितो. गारवा मनाला खेळकर बनवितो. गारवा मनाला अवखळ आनंद देतो. गारवा मनाला धुक्यातून सोबत करीत जुनीच पण नवीन मोकळी पायवाट दाखवीत.

           मनातील गारवा कायम उधाणलेले खेळतो.गारवा माझा... गारवा आपला... गारवा खेळकर... गारवा खोडकर.... गारवा सूर्याच्या हलक्याच प्रकाशासोबत हवेची झुळूक घेऊन येतो आणि हलक्या उन्हातही आपले अस्तित्व खटाळ वाऱ्यासोबत दाखवून जातो. 

        ती वेळ मनात रेंगाळत राहते. थंडगार गारव्यासोबत ..!!!हलक्या सूर्यप्रकाशासोबत. अखंड कधीकधी काही क्षणांना परत फिरावे असे वाटून जाते आणि परत आठवणींच्या ओझरत्या सहवासा सोबत मनातील दाट धुक्यान सोबत मनातील पाना फुलांवर दवबिंदू ठेवून जाते.


तुफान उठलेल्या 

गारवासोबत 

लपाछपी आठवणींची 

थंडगार झालेल्या 

मनाला 

थंडगार फुलवितो  

खट्याळ गार वारा

हळूच हसून 


              मन अबोल क्षणाक्षणाला... गारवा सोबत!! मन अबोल मौन झालेल्या.... वाळलेल्या वादळ सोबत ओले झालेले...!!! मन अबोल एकांत श्वासात... एकांत वाढलेल्या श्वासांसोबत..!!! बहरलेली पांघरलेली स्वप्नांची घागर आनंदाने भरलेली फिरलेली लपवाछपवी केलेली सर्वच प्रेमाने सांभाळून ठेवलेली पण निसटलेले सर्वच.... आता, गारव्यासारखी अबोल....!!!


दुखावलेल्या मनाला गारवा झोंबतो 

क्षणाक्षणाला अगतिक करून जातो 

जिव्हाळ्याच्या शब्दांना 

आता, आतल्याआत शांत 

झालेला गारव्याला... 

रंग सारेच तरी शांत तरी हळूच 

सांगून जातो कानात 

मी गारवा तुझ्या आठवणींचा 

मी गारवा तुझ्या स्वप्नांचा 

मी गारवा तुझ्या प्रेमळ मिठीतला 

मंदा प्रकाशातील गोड आठवणींचा 

गुलाबी थंडीत रातराणीच्या फुलांच्या 

सुगंधी मंदमंद जिवापाड जपलेल्या 

अल्लड आठवणींचा...!!!!



       थंडीची लाट नवीन नसली तरी रुपेरी मात्र असते.कधी ती बोलून तर कधी शांत होऊन....लांबचा प्रवास करून येतो. कधी प्रवास चालूच असतो. वळणावळणावर अस्तित्वाच्या प्रत्येक छायामध्ये गारवा मनाला प्रश्नांच्या त्या उत्तरांपर्यंत घेऊन जातो; तिथे आपले प्रश्न संपतात आणि एक नवीन प्रश्नांच्या उत्तरांची पायवाट देऊन जातो.


            प्रवास कधीही न संपणारा, पण तो गारवा सोबत असेल तर पानगळ ही मनाला आपल्या व्यक्तिमत्वाला काही क्षणासाठी का होईना पण रम्या आठवणींचा खजिना देऊन जातो. उधाणलेला मनाला बहरलेल्या मिठीला पांघरलेल्या शालीला नावीन्याचा ध्यास घेतलेल्या मंद स्वप्नांना अबोल झालेला सुवासिक अखंड उजळत चाललेल्या पण मौन असलेला शब्दांना गारवा फुलवितो.

       लपाछपीचा खेळ हा साराच स्पर्शविनाही.... शब्दाविनाही.... नवीन दिवसाबरोबर नवीन विचार... नवीन व्यक्तीबरोबर..... नवीन रुपेरी आठवणींच्या संग्रहासाठी... गार वारा आपल्याला बळ देत जाते. तुफान गर्दीतही गार वारा मनाला थंडगार करीत जातो. फक्त आपल्याला ओळखावा लागतो. तो पण आयुष्याच्या नवीन वळणांचा हिरव्या हिरव्या पानांवरती जसा दवबिंदुंचे नाजूक थेंब..!!


मिणमिणता काजव्यांचा प्रकाशात 

गारवारा मनाला एक नवीन 

मंच देतो....

 हृदयातील मिणमिणत्या काजव्याला 

जगण्याची नवीन पायवाट 

देऊन जातो...

आयुष्याला नवीन धागा 

देऊन जातो.. 

थंडगार गारवारा....!!!


       चला तर, आस्वाद घेऊया... या थंडीचा. गारवा वाऱ्यासोबत!! जुन्या - नवीन आठवणींचा धागा सुईत टाकून विनुया नवीन पायवाट व्यक्त असलेल्या मंच्यावर आणि व्यक्त असलेल्या हृदयावर.

            शब्दांच्या पलीकडे आणि शब्दांच्या पलीकडे स्वभावदर्शनाच्या व्यतिरिक्त फक्त अनुभवूया सोबत असलेल्या नात्यांचा सोबत एक नवीन गारवा.

         माझ्या तुमच्या स्वप्नांच्या पलीकडले माझा - तुमचा गारवा..!!

              ✍️©️®️सविता तुकाराम लोटे

©️®️✍️Savita Tukaramji Lote

शीर्षक :-  माझा - तुमचा गारवा..!!

         एक अनुभव माझा माझ्यासाठी..!!!


                 आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपला अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤








माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...