savitalote2021@bolgger.com
सोमवार, ३१ मे, २०२१
आपलीच आपल्यासोबत असलेली!!!
आपलीच आपल्यासोबत असलेली
मोहात पाडणार्या स्वार्थी बनविणाऱ्या विचारांसोबत....
जिंकू आपण आपलाच भावनांना
ज्या अहंकाराच्या मार्गावरून जाताना
अपमानित करतात आपल्याच ध्येयांना
आपलेच युद्ध आपल्यासोबत
भीतीच्या पलीकडे पायाखाली चिरडून
जिंकू, लढाई अशाच विचारांसोबत...
कारण ती जिंकता येते
आपलीच आपल्यांसोबत असलेली
आपलीच आपल्यासोबत असलेली!!!
©️✍️🏻सविता तुकाराम लोटे
-------------@--@@@-----------
सकारात्मक चारोळी Marathi kavita charolya
सकारात्मक चारोळी
Marathi kavita charolya
जगण्याची सुंदर कलाकृती कोणती
असेल तर ते आपले सामर्थ्य
©️✍️🏻 सविता तुकाराम लोटे
----------------------------------
मराठी चारोळी Marathi charolya
Marathi charolya
जिंकण्यासाठी ओळखावे लागतात
चित्रविचित्र चेह-यामागील सत्य अनावश्यक
कुठल्याही वेळी कुठल्या ही घटना प्रसंगात जिंकतो आपण त्याच क्षणाला जीवनात
©️✍️सविता तुकाराम लोटे
----------------------------------
******मोक्ष *****
**** मोक्ष ****
आयुष्य कोणत्याही आकाराचे
असू द्या
त्रिकोण चौकोन...
आयुष्य जगा सकारात्मकतेने
ताठमानेने स्वाभिमानाने
नव्या पहाटेच्या सूर्याप्रमाणे
तेजस्वी ....
मोक्षधामापर्यंत जाताना !
आयुष्य कोणताही आकाराचे
असू द्या
काटकोन चौरस वर्तुळ
आयुष्य जगताना जगू द्या
इतरांनाही सरळ मानेने
स्वसंस्कारासोबत आदराने
अप्पर शांती लाभू द्या
महानिर्वाणापर्यंत जाताना !
जगणे खूप सोपे आहे
जगताना जगण्याची भाषा
फक्त कठीण...
केंद्रबिंदू असू द्या
आपले सुक्ष्म विचारसुद्धा
अंतिम सत्याचा सत्याकडे
उत्तम कर्माचा हिशोबाकडे
स्वतःच्या विचार संस्काराकडे
आयुष्य कोणत्याही आकाराचे
असू द्या
काटकोन त्रिकोण चौकोन...
वर्तुळ लघुकोन षटकोन...
अंतीम सत्य
एकच मोक्ष!!!!
©️✍️सविता तुकाराम लोटे
/////////********////////*******/////////
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)
*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने अश्रूचे सोने झाले देहाचे मंदिर झाले सुकलेल्या शरीर...
-
थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह) " संपला आहे माझ्यातला" Drops of Rebellion (Anthology) "I'm done" थेंब...
-
उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) "एक विचारधारा समानतेची" Light in the Light (Anthology) "An Ideology of Equality"...
-
दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age" काव्यसंग्रह शीर्षक :- द...