savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

प्रश्न

प्रश्न
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे आवासून
वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जाते
प्रश्नचिन्हची साखळी 
आवासून
अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार 
गुरफटून टाकतात
मानगुटीला
प्रश्न चिन्हांची शांत जळत
असलेले सहवेदना 
आणि सूर्योदयाच्या 
किरणाचा
प्रश्नासह...
आवासून!! 
   सविता तुकाराम लोटे 


अचानक आज

अचानक आज 

अचानक आज 
आभाळ भरून आले
मातीला सुगंध आला 
कोमेजलेली झाडे वेली 
करू लागली नृत्य 
वाऱ्याच्या हळुवार 
स्पर्श सोबत 
     अचानक आज!!
            सविता तुकाराम लोटे 

आज अवेळी

       आज अवेळी 
आज अवेळी का असे झाले 
आकाशातील सूर्यकिरणे ही 
मनसोक्त घरात येऊन गेलीत नाही
चुकले का रे माझे
की, 
सूर्यकिरणे ही दिले नाही 
आज अवेळी का असे झाले 
दाटून आलेल्या सांजवेळी 
सोनेरी ऊन दिली नाहीत 
की हसरी सूर्यकिरणे दिली नाहीत 
आज अवेळी का असे झाले 
गतकाळातील जीवघेणा आठवणी  
हदयात माझ्या  दाटून येती 
असे काय झाले आज अवेळी
       सविता तुकाराम लोटे 
             

मी कोण

मी कोण 

दिवेलागण झाली
आणि कुणी नसताना घरात 
उफाळून येतात आठवणी 
मन सैरभैर होते 
विझलेल्या स्वप्नाची 
राखरांगोळी पाहताना 
अजून टवटवीत आहेत 
माझ्या मनातील
स्वप्न फुलांची राख 
मूक पापणीत आसवांचा संगे 
विझलेल्या स्वप्नात काय 
माझी चुक की नियतीची 
न निळे मज उत्तर 
विझलेल्या स्वप्नाच्या राखरांगोळी 
तुफानी लाटांशी लढण्याची 
हिम्मत असली तरी 
ते एक स्वप्नच 
अजूनही बंदिस्त आहे 
प्रगत समाजाची स्त्री 
स्वप्नांची राखरांगोळी डोळ्यांनी 
बघत 
अश्रू संगे 
           सविता तुकाराम लोटे 

उंबरठा ओलांडताना

उंबरठा ओलांडतांना 

उंबरठा ओलांडताना
बाईमाणसाने विसरून जावे 
बालपणातील भातुकलीचा खेळ 
राजा राणीचे स्वप्न फुले 
जीवनातील सुखद आठवणी 
उंबरठा ओलांडताना... 
धुंद भावना क्षणात 
वाऱ्यासंगे देऊन घ्यावा रेशीमबंध
मेघ दाटूनी आल्यावर 
गंधलहरी पसराव्यात
तसे उंबरठा ओलांडताना 
बाई माणसाने विसरून जावे 
मृगजळाच्या लहरी, 
जीवनातील!!
         सविता तुकाराम लोटे 


भीम माझा कसा होता

भीम माझा कसा होता 

काय सांगू तुम्हाला 
भीम माझा कसा होता 
अज्ञानी दगडाला ज्ञानगंगेच्या प्रवाहामध्ये 
नेणारा महाझरा होता
भीम माझा कसा होता 
चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता 
समानतेचा वारा होता 
भीम माझा कसा होता
भुकेलेला अन्न देणारा महाशक्तिमान होता 
भीम माझा कसा होता 
रूढी प्रथा परंपरेला मूठमाती देणारा 
नवविश्व निर्माता होता 
भीम माझा कसा होता
भारताला संविधान देणारा 
महाज्ञानसाठा होता 
भीम माझा कसा होता 
मनुवादी विचारवंतांना जागेपणी 
पडलेले स्वप्न होता 
भीम माझा  बुद्ध कबीर फुले 
यांच्या विचारांना पुर्वलोकन करणारा 
महान विचारवंत होता
भिम माझा प्रज्ञेचे शिखर होता
भीम माझा ज्ञानाचा महासागर होता 
भीम माझा दीनदलित समाजाला 
बुद्ध धम्माकडे नेणारा सूर्य होता 
भीम माझा असा होता
     सविता तुकाराम लोटे 

दीक्षाभूमी

        दीक्षाभूमी 

दीक्षाभूमी 
तुझ्या पहिल्याच भेटीत
हसली आणि 
टिपूर चांदणे 
झाले उन्हाचे
माझ्या शब्दांनी
सजवली 
काव्यरूपात ...

तुझ्या हसतमुख 
चेहऱ्याने प्राजक्ताचा
पसरविला गंध 
सृष्टीत 

तुझ्या हसण्याने 
अनामिक नाते 
निर्माण केले 
हृदयी ...

अखंड वाहत 
होता धारा 
तू हात दिलास 
आणि 
धाराचे फुल झाले
नयनी

मी ही हसले 
तू ही हसली
आम्हासंगे
कोवळ्या टिपूर चांदण्यातमध्ये!!
     सविता तुकाराम लोटे 

बळी

        बळी 
अजूनही तळहातावरील 
मेंदीच्या सुगंध दरवळत 
हळदीचा रंगही पिवळाच
हिरवा चुडा पायातील जोडवी
सांगत आहेत तीची कहाणी
किती सोसले असेल 
त्या नाजुक देहाने
गोरेपान शरीर झाले आहे 
अंधारातील गुढ रहस्य
काय झाले असेल 
हत्या की आत्महत्या हे ही 
कळत नाही तिच्याकडे पाहून 
चेहऱ्यावरील हसरी मुद्रा 
काहीच सांगत नाही 
तरीही पण सांगून जाती
मेहंदी भरल्या हातावरील खुणा 
हळदी भरल्या अंगाची व्यथा 
फुडलेल्या चुडयांची कहानी 
आणि काळयाक्षार जोडव्यांनी
न बोलता सांगून दिले 
पुन्हा एक बळी स्त्रीचा 
न संपणाऱ्या प्रथेसाठी!!!!
            सविता तुकाराम लोटे 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...