// आयुष्य जगताना //
आयुष्य जगताना
फक्त आयुष्यच असावे
आपल्या वाटेला त्यात
कुणाचे रुसवे नको
फुगणे नको
आयुष्य जगताना
फक्त असाव्यात आठवणी
सुखद हसऱ्या फुलासारखे
टवटवीत...
आयुष्य जगताना
फक्त तळपायाखाली वेदनेचे
काटे नसावे त्यात काही
सुगंधाही असावा
मोगऱ्याच्या फुलांचा !!
आयुष्य जगताना
फक्त संघर्ष नको
यावे मावळतीच्या सूर्याबरोबर
उदयाच्या सूर्याची
पहाट.....!!
आयुष्य जगताना
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-**आयुष्य जगताना**
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!