***प्रवास संपणारा ***
संपणारा प्रवासाची सोबत माझी
तरी जगण्याचा प्रवास चालूच माझा
स्वप्ने विझली ध्येय संपले
तरी सावली सोबत माझी
चोहीकडे अंधार होता फक्त अंधार
आता समोर कुठलीही अंधार पायवाट नाही
उभी मी सूर्यासारखी मावळतीच्या त्या
वाटेवर अंधाऱ्या गडद काळा चादरीसारखी
तरी मावळतीच्या सूर्याची गोष्ट सांगत आहे
मला मावळतीचा सूर्य आणि आलेला चंद्र
माझे अस्तित्व इथे संपले असे जरी असले तरी उगवलो आहे कुठेतरी...
नव्या पहाटेच्या तेजस्वी रंगांनी नवआकाशी
नव्या जागी नव्या रूपात अस्तित्व माझे
विझणार कधी जन्म घेत नाही
नव्या प्रवासाची वाट शोधीत असते
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ***प्रवास संपणारा***
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .