savitalote2021@bolgger.com

बाबासाहेबांच्या कविता दलित साहित्य विद्रोही साहित्य मराठी काव्यसंग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बाबासाहेबांच्या कविता दलित साहित्य विद्रोही साहित्य मराठी काव्यसंग्रह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

सूर्य

     बाबासाहेब नावाचा सूर्य जर उगवला नसता तर अस्पृश्यांच्या आयुष्यात जो सूर्य दिसतो आहे तो सूर्योदय कधीच झाला नसता म्हणून बाबासाहेब आमचे दैवत आहे. नवीन जीवनशैलीचे मार्गदाता आहे.
        याच भावविश्वातून ही कविता. कविता  स्वलिखित  आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केला जाईल आणि त्या दुरुस्त केल्या जातील.

*** सूर्य ***

जळतील साऱ्या रूढी प्रथा परंपरा 
अशी कोणतीही आग नव्हती  
नवीन वाट पेटविले जातीयवाद्याची 
शहाणे झाले ते सूर्याची आग पाहून 
म्हणून इतिहास जमा असलेल्याही 
रूढी चालू केल्या अक्कल शून्य 
अमावस्येच्या लोकांनी 

आम्ही अस्पृश्यतेचे वाण घेऊन जगलो 
शिक्षेच्या रूपात आम्ही मूर्ख गाढवाचे 
पाय धुऊन पिलो 
पायरी नि पायरी झिजविली 
पण पावला नाही कुणास 
घोटभर पाण्यासाठी 
की बोलला नाही कुणास 
मुभा होती त्याला नशिबाच्या दाराची 
जीवन गाथा आमच्या कर्म फळाची 

म्हणूनच जाळल्या सर्व प्रथा मनुस्मृतीच्या झोपडीतल्या अंधाराच्या वाईटावर 
मात केली मानवतेच्या धम्माने 
एक घोट पाण्यासाठी 
परंपरा मोडीत काढत
क्रांती नवी धम्माची
पाण्याचा विटाळ नसलेल्या धम्माची 

आदर्श विश्वासाचा 
मुहूर्तमेढ नवीन समाजाची 
प्रहार नवीन क्रांतीचा 
नवीन सूर्याचा समानतेचा 
जळत्या रुढीला निखारा सूर्याचा 
कर्तुत्ववान समाजाची 
सूर्य तो ची निळा रंगाचा 
सम्यकक्रांतीचा सूर्योदयाचा 

आदर्श माणुसकीचा 
लढा तोची इतिहासाच्या 
सुवर्ण अक्षराचा शिदोरी देऊनी 
संविधानाची आचार विचार मुलतत्वे 
सांगून दिव्य तंत्र दिले 
दिव्य मूलमंत्र दिले 
तोची सूर्य क्रांती सूर्याचा 
महामानवाचा....❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
      If the sun named Babasaheb had not risen, then the sun that is visible in the life of the untouchables would never have risen, so Babasaheb is our god.  It is the guide of a new way of life.
          This poem is from this spirit.  The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.  If there are any errors, please let us know in the comment box.  It will be researched and corrected.

 *** Sun ***

 All customs and traditions will burn 
 There was no such fire  
 A new path has been lit for communalists 
 They became wise by seeing the fire of the sun 
 So even those who have accumulated history 
 Conventions turned on common sense zero 
 By the people of Amavasya 

 We lived under the spell of untouchability 
 As punishment we used silly donkeys 
 Wash your feet and drink 
 Worn step by step 
 But no one stepped 
 For a sip of water 
 He didn't tell anyone 
 He was open to the door of fate 
 The story of life is the fruit of our karma 


That is why all the customs burned in the hut of Manusmriti on the evil of darkness 
 Overcame by the Dhamma of humanity 
 for a sip of water 
 Breaking tradition
 Revolution of New Dhamma
 Dhamma that is untainted by water 

 of ideal faith 
 The era of new society 
 Strike a new revolution 
 Equality of the new sun 
 Coal to the burning sun 
 A responsible society 
 The sun is blue in color 
 Sunrise of Samyakkranti 

 of ideal humanity 
 History of the fight 
 By giving a gold letter shidori 
 Principles of Ethics of the Constitution 
 By telling and giving the divine technique 
 Divine Moolmantra given 
 His sun revolution of the sun 
 Of the great man....❤


 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

    The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poetry, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way.  Welcome to this human threshold of words.  If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...