savitalote2021@bolgger.com

रविवार, १२ जून, २०२२

*** लेक सावित्रीची ****

     वटपौर्णिमा यावर आधारित कविता आहे. कुणाच्याही श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता आजच्या,"सावित्रीच्या लेकी" दोन विरुद्ध दिशेने आपली वाटचाल करीत आहे. कारण स्त्री आधुनिक झालेली आहे ....विज्ञानवादी झालेली आहे.... तरीही काही रूढी प्रथा परंपरा आजही आपल्या सोबत घेऊन विज्ञानवादी स्वातंत्र्य मतप्रवाह घेऊन चालण्याचा प्रयत्न करतात.
हा विरोधाभास आहे आणि याच विरोधाभासाचा संदर्भ घेऊन ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.

         ही कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद...!!!

****  लेक सावित्रीची ****

माझ्यात तुझ्यात फरक इतकाच 
की तू वटाला पुजते मी पुस्तकांना वाचते 
मी शिकते त्यांच्या शब्दांपासून 
तू फक्त झाडाच्या खोडाला धागा गुंफते आयुष्यातील एका एका क्षणांचा हिशोब 
माहित नसतानाही तू साताजन्माचे 
भविष्य मांडून ठेवते... बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व काही 
श्रद्धेने,विश्वासाने आणि आपलेपणाने 
माझ्या तुझ्यात फरक एवढाच 
माझ्या मर्यादा या क्षणापुरता 
तर तुझ्या जन्मोजन्मीच्या 
श्रद्धा ठेव नशिबावर त्यातील 
विज्ञान ओळखून.... 
कारण आयुष्याचा थांगपत्ता  कुणालाही 
माहीत नाही... पण तू !!
शेवटी माझ्या तुझा श्वास एकच 
जशी तू सजते श्रद्धेने तशीच 
मीही सजते शब्दअलंकाराने 
कोणतीही अपेक्षा न करता आतासाठी उद्यासाठी नाही;येणाऱ्या भविष्यासाठी नाही शेवटचा श्वास घेतल्यानंतर येणाऱ्या 
सुखात काल्पनिक जीवनासाठी नाही 
माझ्या तुझ्यात फक्त फरक इतकाच 
फक्त फरक इतकाच इतकाच .....!!!

         ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!!


=========❤❤❤❤❤==========


सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 


*Marathi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 


संयम

***** सयंम ******

सयंम असावे शब्दांवर 
संयम असावे विचारांवर
सयंम असावे कृतीवर 
संयम असावे स्वतः स्वतःच्या 
सहनशीलतेवर....!

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका....!!

=============================



*** Moderation ******

 Sayyam asave syllables
 Sanyam Asave Vicharanwar
 Sayyam Asave Kritavar
 self-control
 Tolerant....!

 ️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Apalya yanyachi janiv apalya reaction.  Please don't forget to like and share your feedback in the comment box....!!

 ============================






सकारात्मक चारोळी आयुष्य चारोळी प्रसिद्ध चारोळी Marathi images in positive charolya motivation charolya 




*marathikavita Hindi kavita aayushavar kavita positive thoughts poem Marathi kavita collection Marathi

चारोळी  motivational charolya 
 kavita aayushavar kavita Inspirational kavita 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...